या स्त्रीने इतक्या मुलांना जन्म दिलाय की आकडा ऐकून लोकांनी तोंडात बोटे घातली!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण बघितले असेल की, आपल्या आजी-आजोबांना किंवा त्यांच्या पूर्वजांना आजच्या तुलनेत जास्त मुलं होते. त्याची अनेक करणे असू शकतात.

 

birth-inmarathi
BABY CLONES

 

तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, १७२५ आणि १७६५ दरम्यान मॉस्को येथील Feodor Vassilyev ह्यांच्या पहिल्या पत्नीने ६९ मुलांना जन्म दिला होता. सांगितलं जातं की त्यांनी १६ जुळ्या मुलांना, सात Triplets, चार Quadruplets असे एकूण ६९ मुलांना जन्म दिला. हे खरंच खूप आश्चर्यकारक आणि तेवढेच रंजक देखील आहे.

 

birth-inmarathi02

 

ह्याबाबत Johns Hopkins University च्या Reproductive Science and Women’s Health Research च्या डायरेक्टर James Segars ह्यांना जेव्हा ह्याबाबत त्यांना विचारलं गेलं की, कुठली स्त्री ६० पेक्षा जास्त मुलांना जन्म देऊ शकते का? तर ते म्हणतात, की ही बाब आश्चर्यचकित करणारी आहे.

४० व्या वर्षापर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता असते. Mrs. Vassilyev ह्यांना १८ वर्ष वयापासून ते ४० व्या वर्षापर्यंत ६९ मुलांना जन्म देणे शक्य आहे. पण काय आजच्या जगात हे शक्य आहे? Stanford School Of Medicine मधील Obstetrics And Gynaecology च्या असोसिएट प्रोफेसर Valerie Baker ह्यांच्या मते Menopause च्या आधी महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊन जाते, म्हणून ४५ व्या वर्षीपर्यंत महिलेला मासिक पाळी येत असेल तरी तिच्या गर्भधारणेची शक्यता ही १ टक्का एवढीच असते.

 

birth-inmarathi01

 

तर ह्यावर Segars म्हणतात की, ४२-४४ वयापर्यंत स्त्रिया प्रेग्नंट नाही होऊ शकत. पण ४० च्या दशकादरम्यान हे शक्य होतं. प्रत्येक गर्भावस्थानंतर महिलेची गर्भवती होण्याची क्षमता कमी होत जाते. मग अश्यात जर तिच्यावर शारीरिक ओझं असेल तर ती शक्यता आणखी वाढते. Baker सांगतात की, निसर्गाची स्वतःची एक मर्यादा असते आणि गर्भावस्था शारीरिकदृष्ट्या सर्वात त्रासदायक असते.

 

birth-inmarathi03

 

विकसित देशांबाबत बोलायचं म्हटलं तर, आधुनिक उपकरणांमुळे सिजेरीयन केल्याने महिलांचा त्रास थोडा कमी झाला आहे. पण आजही डिलिव्हरी दरम्यान जीव गमावणाऱ्या महिलांचा आकडा काही कमी नाही.

Segars सांगतात की, Vassilyev यांचे २७ वेळा गर्भधारण करणे हे जरा कठीण वाटत. कारण त्या वेळी गर्भवती असणे खूप धोकादायक असायचे. तसेच गर्भावस्था आणि प्रसूती क्रिया ही खूप किचकट होती.

 

birth-inmarathi04.jpg

 

मुलांच्या जन्मावर केलेल्या ह्या शोधात असे देखील दिसून आले की, पुरुष आपल्या संपूर्ण आयुष्यात दररोज जवळपास लाखो शुक्राणू निर्माण करतात. म्हणजे त्याच्या बाळाला जन्म देण्याला कुठलही सीमा नाही.

स्त्रोत : BBC

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?