एक अशी भारतीय स्त्री जिने स्वत:चे स्तन कापून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारताच्या इतिहासामध्ये अश्या कितीतरी घटना आहेत, जिथे स्त्रियांचा अपमान झाला आहे. अगदी देवांपासून ते राजे-राजवाड्यांपर्यंत सर्व काळांमध्ये स्त्रियांवर अन्याय झाला होता. प्रत्येकवेळी स्त्रियांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झटावे लागले.

जातीवादाचा जास्त तोटा हा स्त्रियांनाच झाला होता. उच्च जातीतील स्त्रियांना मान आणि खालच्या जातीतील स्त्रियांचा अपमान हे चित्र खूप वेळा दिसून आले आहे.

१९०० च्या दशकाच्या दरम्यान भारताचा एक भाग स्त्रियांच्या विरुद्ध अमानुष व्यवहाराने प्रभावित झाला होता.

त्रावणकोर येथे एक प्रचलित परंपरा होती, ज्यानुसार स्त्रियांना त्यांच्या शरीराचा वरचा भाग (स्तन सुद्धा) झाकण्याची अनुमती नव्हती. खासकरून हा नियम कनिष्ठ जातीच्या स्त्रियांसाठी होता.

हा नियम पुरुष आणि स्त्रिया या दोघांसाठी होता. त्रावणकोरमध्ये फक्त उच्च जातीच्या स्त्रिया आणि पुरुषांना शरीराचा वरचा भाग झाकण्याची अनुमती होती.


नाम्बूदिरी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि नायर घराण्यातील स्त्री आणि पुरुषांना स्तन झाकण्याची परवानगी होती.

तेव्हाच्या प्रथेनुसार स्तन झाकणे हा गुन्हा मानला जात असे.

१९ व्या दशकाच्या मध्यापर्यंत हा नियम लागू राहिला.

जर नियम मोडला तर खूप भयानक शिक्षा मिळत असल्याने घाबरून स्त्रिया देखील निमूटपणे आपल्या शरीराचा वरचा भाग उघडा ठेवून वावरत असत.

 

Breast Tax.marathipizza1
qph.ec.quoracdn.net

छाती कापण्याचा आदेश

एकदा जेव्हा राणीने एका दलित महिलेला राजवाड्यामध्ये आपले स्तन झाकून ठेवलेले पाहिले, तेव्हा राणीने त्या महिलेचीचे स्तन कापून टाकण्याचा आदेश दिला होता.

स्तन कर

ब्रिटीश राज्यकर्त्यांनी देखील येथील स्त्रियांवर ‘स्तन कर’ लागू केला होता. कनिष्ठ जातीमधील ज्या स्त्रियांना आपले स्तन झाकण्याची इच्छा आहे, अश्या स्त्रियांना स्तन कर भरावा लागत असे.

 

नंगेली नावाच्या महिलेने या विरुद्ध बंड पुकारले.


 

Breast Tax.marathipizza
media.indiatimes.in

नंगेली ही केरळमधील समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या चेरथळा शहरामधील होती. ती स्तन कराच्या विरुद्ध लढली होती. तिला मुल्क्क्रम म्हणून सुद्धा ओळखले जात असे.

 

तिने छाती न झाकण्यास आणि करही देण्यास नकार दिला.

त्यामुळे तिला छाती न झाकण्याबद्दल आणि करही न भरल्याबद्दल शिक्षा देण्यात आली.


 

काहीतरी धक्कादायक

जेव्हा नंगेलीला उरलेला कर भरण्यासाठी सक्ती केली, तेव्हा तिने संतापून स्वत:हून आपले स्तन कापले आणि जमिनीवरील केळ्याच्या पानावर ठेवले.

 

Breast Tax.marathipizza2
theladiesfinger.com

यामुळे तिचा मृत्यू झाला.

खूप रक्त वाहिल्यामुळे त्याच दिवशी नंगेलीचा मृत्यू झाला. तिला पाठिंबा देण्यासाठी तिचा नवरा कंदापन याने तिच्या चितेमध्ये उडी घातली.


त्यानंतर राजाने कर रद्द केला.

नंतर ते ठिकाण “मुलाचीपा राम्बू” म्हणून ओळखले जाऊ लागले. या मल्याळम शब्दाचा अर्थ ‘स्त्रीच्या स्तनाची जमीन’ असा होतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 
One thought on “एक अशी भारतीय स्त्री जिने स्वत:चे स्तन कापून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता..!

  • November 17, 2019 at 8:58 pm
    Permalink

    अशा स्त्रिचा आपल्या अभिमान वाटला पाहीजेय

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?