ह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हे फार महत्वाचं असतं. आपलं लग्न हे खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण परिस्थितीमुळे ते काही शक्य होत नाही, आणि त्यांचं लग्न हे कधीकधी अगदी साधारण पद्धतीने पार पडतं.

 

theindiantelegraph.com.au

प्रत्येक बापासाठी आपल्या मुलांचं लग्न हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखद अनुभव असतो. आणि प्रत्येक बाप आपापल्या परीने तो दिवस आपल्या मुलांसाठी स्पेशल कसा करता येईल ह्याची पुरेपूर काळजी देखील घेतो. त्यातच जर आपल्या लाडक्या मुलीचं लग्न असेलं तर मग काही बघायलाच नको.


सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. सोशल मिडीयावर तर ह्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओजचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. फेसबुक-इंस्टग्राम उघडलं की निव्वळ हे लग्नाचे फोटोज दिसतात. आणि आपले भारतीय लग्न म्हटलं तर सर्वकाही जरा काकणभर जास्तच असतं.

 

marriage-inmarathi
theindianfeed.in

पण ह्याच सर्वांत एका बापाने आपल्या मुलीचे लग्न अविस्मरणीय आणि खास बनविण्यासाठी काही असं केलं जे प्रत्येकाला जमणार नाही. पाटण जिल्ह्यापासून ७ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अजीमना गावात अमृत देसाईने आपल्या मुलीच्या लग्नाच्या मुहूर्तावर वाल्मिकी समाजाच्या म्हणजेच दलित समाजातील ७ मुलींचा विवाह करवला आहे.

 

marriage-inmarathi02
timesofindia.indiatimes.com

ह्या आगळ्यावेगळ्या सामुहिक विवाहात जवळजवळ ३ हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शविली. एवढेच नाही तर अमृत ह्यांनी नव्या जोडप्यांना आशीर्वाद म्हणून घरात कमी येणारे काही समान देखील दिले.

ह्या बाबत बोलताना अमृत ह्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की,

दलित मुलींचा विवाह माझ्या मुलीच्या लग्नावेळी एकाच ठिकाणी करून मी पूर्वापारपासून चालत आलेली जाती प्रथा तोडण्याचा प्रयत्न केला. दालीतांप्रती होणारे दुर्व्यवहार, अन्याय, प्राचीनकाळापासून चालत असलेल्या परंपरा संपविण्याचा आमचा हा एक प्रयत्न होता. म्हणून मी मुली आणि त्यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली, आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर माझा हा प्रस्ताव मांडला. ज्याला गावकऱ्यांचा होकार लाभला आणि हे शक्य झालं.

अमृत ह्यांनी उचललेलं हे पाउल खरंच कौतुकास्पद आहे. कारण आज आपल्या देशाला, समाजाला अश्या लोकांची नितांत गरज आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




One thought on “ह्या पित्याने आपल्या मुलीच्या लग्नमंडपात ७ दलित मुलींचे लग्न लावून देत आदर्श घडवलाय !

  • October 7, 2018 at 11:02 am
    Permalink

    लेख छान वाटला.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?