महाराष्ट्राची ‘दंगल गर्ल’ : मराठमोळी ‘कोमल जाधव’!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अभिनेता अमीर खानचा दंगल सध्या देशभरात धुमाकूळ घालतोय. महावीर फोगाट आणि त्यांच्या मुलींची कुस्तीमधला प्रेरणादायी प्रवास चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. कुस्तीसारखा खेळ आणि त्यातही मुलींना उतरवायचं क्रांतिकारी पाउल केवळ महावीर फोगाट यांच्यासारखं काळीज असणारे वडिलचं उचलू शकतात. त्यांच्या मुलींनी देखील वडिलांनी त्यांच्यावर घेतलेल्या अपार मेहनतीचं चीज करत कुस्ती क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

अशीच एक कथा आपल्या महाराष्ट्रातल्या मातीत आकार घेत आहे. इथेही आहे महावीर फोगाट सारखा बाप आणि गीता फोगाट सारखी कुस्तीला वाहिलेली ‘मुलगी’!

दंगल चित्रपटात दाखवलेला प्रवास खऱ्या आयुष्यात जगत आहे इंदापूरचे दत्तात्रय जाधव आणि त्यांची कन्या कोमल जाधव!

 

komal-jadhav-marathipizza

स्रोत

महाराष्ट्राच्या मातीत आपल्या वडीलांकडून कुस्तीचे धडे घेणारी कोमल गीता फोगाट सारखी भल्याभल्या मर्दांना हा हा म्हणता चीतपट करते.

तशी कुस्तीमध्ये कोमल काही जाधव कुटुंबातील पहिली नाही. जाधव कुटुंबाच्या घरी पदकं आणि पारितोषिकांचा ढीग आहे. दंगल चित्रपटात दाखवल्याप्रमाणे महावीर फोगाटांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलगा हवा होता. अगदी त्याचप्रमाणे दत्तात्रय जाधवांना देखील पहिला मुलगा हवा होता, जो कुस्तीत नाव कमावून देशासाठी पदक आणेल. परंतु त्यांना पहिली मुलगी ‘कोमल’ झाली.

मुलगी झाली म्हणून निराश न होता महावीर फोगाटप्रमाणे त्यांनी देखील मुलीमध्ये आपल्या मुलाला पाहिले आणि तिच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करायचे निर्धार करून त्यांनी तिला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली.

दत्तात्रय जाधवांना देखील समाज विरोधाचा सामना मोठ्या प्रमाणावर करावा लागला. पण आज तोच समाज त्यांच्या निर्णयाचे कौतुक करत आहे.

तालीमच्या दरम्यान सारखा घाम येत असल्याने त्यांनी कोमलचे अनेक वेळा केस कापले होते. कोमल सोबत तालीम करण्यासाठी मूलगी मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या दूसऱ्या मुलासोबत तिच्या कसरती करून घेतल्या.

 

komal-jadhav-marathipizza01

स्रोत

मुख्य म्हणजे त्यांच्या पत्नीने देखील मुलीला कुस्ती शिकवण्यास पाठींबा दिला नव्हता. पण दत्तात्रय जाधव आपल्या निर्णयावर ठाम होते.

कोमल नंतर त्यांना दोन मुले झाली. त्यांना देखील त्यांनी लहानपणापासूनच कुस्तीचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. तिन्ही मुलांना स्वत:हून कुस्तीमध्ये रस असल्याने तिघही पहाटे चार वाजता उठून पाच वाजता व्यायाम करण्यासाठी तयार होतात.

२०१५ साली यंगून म्यानमार एशियन गेम्समध्ये, तर किरगीजस्थान येथे वर्ड नोमाड गेम्स मधील बेल्ट रेसलिंग स्पर्धांमध्ये कोमलने सहभाग घेतला आहे. दुसरा मुलगा रोहित हा दोन वेळा कुस्तीत नॅशनल जिंकला आहे, तर धाकटा तब्बल सहा वेळा बेल्ट रेसलिंग स्पर्धेत नॅशनल जिंकून आला आहे.

मारकड कुस्ती केंद्राने या मुलांच्या कुस्ती प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मॅटवरील सर्व अवघड कसरती या कुस्ती केंद्रात करण्याची सोय आहे.

भारतासाठी पदक मिळवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोमल प्रचंड मेहनत घेत आहे. आपल्या मराठमोळ्या ‘दंगल गर्ल’चे हे स्वप्न पूर्ण होवो यासाठी तिला खूप खूप सदिच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?