आपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपल्या प्रेयसीचा किंवा प्रियकराचा वाढदिवस असला की त्याला भेट म्हणून सर्वाधिक काय दिलं जातं? तर टेडी बेअर!

आपल्याकडे या गुबगुबीत बाहुल्याला प्रेमाचं प्रतिक समजलं जातं ही वस्तुस्थिती आहे. पण असंच काही नाही की टेडी बेअर केवळ प्रेमात पडलेलेचं एकमेकांना देतात, तर लहान मुलांना देखील टेडी बेअर तितकाच आवडतो. त्यामुळे ते देखील तो हक्काने मागून घेतात. लहान असताना एकदा का टेडी बेअरवर जीव जडला की मरेपर्यंत त्याचा मोह सुटणे कठीण! त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच हा टेडी बेअर लाडका. त्याचं मऊ आणि लोभसवाणं स्वरूप मनाला इतकं भुरळ घालतं की त्याला अगदी मिठी मारूनच रहावेसे वाटते.

teddy-bear-marathipizza00

स्रोत

बरं तर तुम्ही कधी विचार केलाय का की हा टेडी बेअर नेमका आला कुठून? तो बनवला कसा गेला? ही कोणाची कल्पना होती? तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर तुम्ही ही टेडी बेअरच्या जन्माची गोष्ट नक्कीच वाचली पाहिजे.

teddy-bear-marathipizza01

स्रोत

अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुजवेल्ट एकदा शिकारीला गेले होते. त्यांच्या सेवकांनी जंगलात एक अस्वल पकडलं, ते झाडाला बांधलं, आणि राष्ट्राध्यक्षांना त्या अस्वलाला गोळी मारण्यासाठी बोलावण्यात आलं. रुजवेल्ट आले, पण बांधलेलं अस्वल त्यांनी काही मारलं नाही. त्या अस्वलाला नंतर सोडून देण्यात आलं.

Theodore-Roosevelt_-marathipizza

स्रोत

या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली आणि १९०२ साली मॉरिस मिचटम यांनी पहिल्यांदा एक कापडी अस्वल तयार केलं. त्या अस्वलाला त्यांनी नाव दिलं- Teddy’s Bear. या नावाचं कारण म्हणजे, राष्ट्राध्यक्षांचं टोपण नाव टेडी होतं.

 

richard_steiff-teddy bear-marathipizza

स्रोत

नंतर मॉरिस मिचटम यांनी स्वतः राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहून त्यांचं नाव वापरण्याची परवानगी मागितली आणि त्यांना ती मिळाली सुद्धा ! आणि तेव्हापासून टेडी बेअर बाजारात आले.

firs-tedy-bear-marathipizza

स्रोत

१९०३ साली पहिला टेडी विक्रीसाठी ठेवण्यात आला. पुढे टेडी बेअरची क्रेझ वाढली आणि जगात सगळीकडेच टेडी बेअरची विक्रमी विक्री सुरु झाली जी आजतागायत सुरु आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “आपल्या आवडत्या “टेडी बेअर” च्या जन्माची कथा

  • February 11, 2017 at 10:00 am
    Permalink

    कालपासून हि माहिती शोधत होतो .आज सापडली…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?