' ए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं!” – InMarathi

ए आर रहमान होताहेत ऍव्हेंजर्स थीम गाण्यामुळे ट्रोल.. लोक म्हणतात “अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालं!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

मार्व्हल स्टुडियोजच्या ऍव्हेंजर्स सिरीजमधील “ऍव्हेंजर्स -इन्फिनिटी वॉर” हा चित्रपट आला आणि लोकांना तो मार्व्हलच्या इतर चित्रपटांप्रमाणेच आवडला. मार्व्हलच्या कॉमिक्सवर आणि त्यातील सुपरहिरोजवर आधारित असलेला हा मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा एकोणिसावा चित्रपट होता.

ह्यात नेहमीप्रमाणे कॅप्टन अमेरिका पासून तर थॉर, हल्क आणि ब्लॅक पॅन्थरपर्यंत जवळजवळ सगळेच मार्व्हलचे सुपरहिरो होते. ही सिरीज २००८साली आयर्न मॅन पासून सुरु झाली. नंतर नवे नवे सुपरहिरो येत गेले आणि लोकांनीही ते डोक्यावर घेतले.

डीसी आणि मार्व्हलमध्ये लोकांनी मार्व्हलच्या सुपरहिरोंना जास्त पसंती दिली. आयर्न मॅन , हल्क , कॅप्टन अमेरिका, थॉर, डॉक्टर स्ट्रेंज, स्पायडरमॅन,अँटमॅन, ब्लॅक पॅन्थर, गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सी ह्या सुपरहिरोजच्या सिनेमांची सीरिजच आली.

तसेच मध्ये मध्ये हे सर्व सुपरहिरोज मार्व्हल्स -द ऍव्हेंजर्स , ऍव्हेंजर्स -द इज ऑफ अल्ट्रॉन ह्या चित्रपटांत सुद्धा एकत्र आले. आता मागच्या वर्षी जो अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर हा चित्रपट आला तो सर्वांनीच डोक्यावर घेतला.

ह्यात जगाचा बॅलन्स कायम राहावा म्हणून अर्ध जगच मिटवू पाहणाऱ्या थॅनोस ह्या सुपरव्हिलन विरुद्ध सगळे सुपरहिरोज एकवटले होते. झॅन्डर ह्या ग्रहावरून “पावर स्टोन” हा सहा अनंतमणी म्हणजेच इन्फिनिटी स्टोन्सपैकी एक स्टोन मिळवल्यावर थॅनॉस आणि त्याचे सहकारी कसेबसे वाचलेल्या ऍसगार्डीयन्सच्या यानावर कब्जा करतात.

त्यानंतर थॅनॉस टेसरॅक्टवरून स्पेस स्टोन सुद्धा मिळवतो. थॉरला पराभूत करतो, हल्कला जुमानत नाही आणि थॉरच्या भावाला लोकीला मारून टाकतो.

 

The-Avengers-Movie-inmarathi
scriptmag.com

इकडे हल्क पृथ्वीवर येऊन डॉक्टर स्ट्रेंज आणि वोन्गला थॅनॉसच्या योजनेची माहिती देतो की थॅनॉस ब्रह्माण्डाचा समतोल राखण्यासाठी अर्ध्या जनतेला मारून टाकण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी तो सगळे इन्फिनिटी स्टोन्स मिळवतो आहे.

डॉक्टर स्ट्रेंज मग टोनी स्टार्कला परत बोलावून सगळी माहिती देतो. थॅनॉसची माणसे डॉक्टर स्ट्रेंजकडून टाइम स्टोन मिळवण्याचा प्रयत्न करतात पण ते यशस्वी होत नाहीत.

इकडे व्हिजनकडे असलेला माईंड स्टोन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात. व्हिजनला ब्लॅक पँथरच्या राज्यात म्हणजे वाकाण्डाला नेण्यात येऊन त्याच्या कपाळातील माईंड स्टोन काढण्याचे प्रयत्न सुरु असतात.

गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सी ऍसगार्डीयन्सची मदतीची हाक ऐकून थॉरला वाचवतात. थॉर त्यांना सांगतो की थॅनॉस रियालीटी स्टोन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

रॉकेट आणि ग्रूट थॉर बरोबर Nidavellir येथे जाऊन स्टॉर्मब्रेकर तयार करतात. स्टॉर्मब्रेकर हे थॉरचे हत्यार असते ज्याने थॅनॉसला मारून टाकणे शक्य असते. नोव्हेअर येथे गार्डीयन्स ऑफ द गॅलॅक्सी जाऊन पोहोचतात तेव्हा त्यांना कळते की थॅनॉसने रियालिटी स्टोन मिळवला आहे.

 

mathod crafts the Nidavellir InMarathi

 

थॅनॉस गमोराचे अपहरण करून तिच्याकडून सोल स्टोन कुठे आहे ह्याची माहिती मिळवतो आणि त्याठिकाणी जाऊन गमोराचा बळी देऊन सोल स्टोन सुद्धा मिळवतो.

वाकाण्डा येथे थॅनॉसचे सैन्य व ऍव्हेंजर्स व वाकाण्डाचे सैन्य ह्यात युद्ध होते. त्यांना मदत करण्यासाठी थॉर, ग्रूट आणि रॉकेट सुद्धा तेथे येतात. व्हिजनच्या कपाळातील माईंड स्टोन काढून त्याला ठार मारून तो स्टोन थॅनॉसला मिळतो.

थॉर थॅनॉसवर हल्ला करतो पण थॅनोस तिथून टेलिपोर्टींगद्वारे निसटतो आणि आपल्याबरोबर ब्रह्माण्डातील अर्धी जनता गायब करून टाकतो. आणि इथे हा चित्रपट संपतो.

आता पुढे काय असा विचार करत असताना मागच्या महिन्यात कॅप्टन मार्व्हलचा चित्रपट आला. तसेच ऍव्हेंजर्स एन्ड गेमचे ट्रेलर देखील आले. त्यात कॅप्टन मार्व्हल आणि थॉरला बघून लोकांनी भरपूर अंदाज लावले. काहींनी तर त्यांचे लग्न लावून त्यांच्या पोरांची नावे देखील ठरवून टाकली. आता सगळे आतुरतेने एन्ड गेमची वाट बघत आहेत.

 

inmaratrhi

थॅनॉसला हे सगळे… नव्हे.. उरलेले अर्धे ऍव्हेंजर्स कसे हरवणार, गायब झालेली माणसे आणि सुपरहिरोज परत येणार का ह्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आता २६ एप्रिलला एन्ड गेम प्रदर्शित होतो आहे. आणि मार्व्हल स्टुडियोज हळूहळू एक एक गोष्ट रिलीज करीत आहेत. नुकतेच त्यांनी ऍव्हेंजर्स थीम सॉंग प्रदर्शित केले आहे.

हे गाणे आपल्या ऑस्करविजेत्या ए आर रहमान ह्यांनी संगीतबद्ध केले आहे. पण ह्यावेळी मात्र रहमान ह्यांच्या संगीताची जादू काही फारशी चाललेली दिसत नाही.

लोकांना गाणं आवडणं तर लांबच! उलट हे गाणं बघून आणि ऐकून लोक रहमान ह्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. मार्व्हल इंडियाच्या फेसबुक पेजवर हे गाणे अपलोड करण्यात आले आहे. त्यावर अनेक लोकांनी प्रचंड क्रिएटिव्ह आणि पोट धरून हसायला येईल अश्या एक से एक कमेंट्स केल्या आहेत.

हे हिंदीतले गाणे बघून रेमी नावाच्या व्यक्तीने असे म्हटले आहे की “ह्यापेक्षा तुम्ही थॉर आणि कॅप्टन मार्व्हल ह्यांचे एक आयटम सॉन्ग का बनवून टाकत नाही?” ह्या कमेंटला तब्बल पाच हजार लोकांनी लाईक केले आहे. तर अमेय नावाच्या एका व्यक्तीने थेट रहमान ह्यांनाच “का ?रहमान…का?” असा कळवळून प्रश्न विचारला आहे.

मयांक नावाच्या व्यक्तीला तर असा दाट संशय आहे की हे नक्कीच कुठल्यातरी जुन्या गाण्याचे रिमिक्स केले आहे.

ह्या पोस्ट वर लोक एकमेकांना टॅग करून “ये क्या बवासीर बना दिया बे” असे मीम टाकत आहेत. तर राजकुमार नावाची व्यक्ती म्हणते, “थॅनॉस प्लिज स्नॅप वन्स मोअर”.. तन्वीर नावाच्या व्यक्तीने तर थॅनॉसला पाठिंबा देत “धिस इज व्हाय थॅनॉस किल पीपल” अशी कमेंट केली आहे.

काही लोकांनी “हे गाणं बघताना स्पायडरमॅन मरताना बघून जितका त्रास झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास होतोय” असे म्हटले आहे. ही पुढची कमेंट वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

“News Alert : Thanos has given back the stones to Avengers and eliminated himself after listening to this song.” किंवा “A.R Rahman will defeat Thanos with this song.”

 

youtube.com

अंबरी नावाच्या व्यक्तीने धोक्याचा इशारा दिला आहे की ,

“थॅनॉस टाइम स्टोन वापरुन हे गाणे नाहीसे करेल आणि नंतर ह्या गाण्याचा बदला घेईल!” तर अनेक लोक मार्व्हल स्टुडियोजला विचारत आहेत की “हा एप्रिल फूलचा जोक तर नाही ना?” लोक तर ह्या गाण्यासाठी थॉर आणि स्टार लॉर्डला जबाबदार मानत आहेत.

त्यांचे म्हणणे असे की, “जर थॉरने तेव्हाच व्यवस्थित नेम धरून थॅनॉसच्या डोक्यावर मारले असते तर आज आपल्याला ह्या गाण्याचा अत्याचार सहन करावा लागला नसता.” काही लोक तर अशीही भीती व्यक्त करत आहेत की ,”चुकून थॅनॉसने ही गाणं ऐकलं तर तो उरलेल्या अर्ध्या लोकांना सुद्धा गायब करून टाकेल.”

तर एक व्यक्ती असे म्हणते की ,”हे गाणे ऐकल्यावर थॅनॉस स्वतः हे ब्रह्माण्ड सोडून, ते इन्फिनिटी स्टोन परत करून निघून जाईल.”

ह्या पुढच्या कमेंट वाचून तुम्हालाही कल्पना येईलच की हे अँथेम लोकांना अजिबातच आवडलेले नाही.

*,”Latest news report – Thanos gone deaf and dies in stress. Thank you secret marvel hero rehman saab”

*So this is how Avengers defeat Thanos? By playing this song in full volume? Okay I get it then..”

*”That’s why Avengers don’t come India..”

 

 

*What’s next Captain Marvel and Black Widow doing a dance off like “Dola re?”

*”Thank Thanos at least half the world didn’t have to listen to this.”

“It just killed the remaining half of the universe.”

आणि सगळ्यात खतरनाक कमेंट म्हणजे ,”अर्ध जग ह्याच गाण्यामुळे गायब झालंय..”

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?