चिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ऑलम्पिकमध्ये सहभागी होऊन पदक मिळवण्यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत करतात. पदक मिळालेच तर तितक्याच जीवापाड ते जपतात देखील! पण तुम्हाला कोणी सांगितले की एखाद्या खेळाडूला ऑलम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळाले आणि त्याने त्या मेडलचा लिलाव केला तर तुमचा देखील विश्वास बसणार नाही ना?

silver-medal-auction-marathipizza02

स्त्रोत

पण असं घडलंय…!

३ वर्षीय ओलेक नामक मुलगा गेल्या दोन वर्षांपासून डोळ्यांच्या कॅन्सरने त्रस्त आहे. परंतु पैश्याच्या कमतरतेमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया होत नव्हती.

silver-medal-auction-marathipizza01

स्त्रोत

हे समजताच पोलिश थाळीफेक खेळाडू Piotr Malachowski ने लहानग्या ओलेक साठी रियो ऑलम्पिक २०१६ मध्ये पदक मिळवण्याची प्रतिज्ञा केली, कारण त्यामार्फत मिळालेल्या पदकाचा लिलाव करून त्याला ओलेकच्या उपचारासाठी पैश्याची जुळवाजुळव करता येणार होती.

सुवर्णपदकाची आशा मनात ठेवून स्पर्धेत उतरलेल्या पीयोट्रला ‘रौप्य पदकावर’ समाधान मानावे लागले. पण त्याने ज्या भावनेने हे पदक मिळवले होते ते पाहता मिळवलेले सिल्वर मेडल पीयोट्रसाठी गोल्ड मेडल पेक्षा कमी नव्हते.

 

त्याने फेसबुकवर व्यक्त केलेल्या भावनेतून त्याच्या कनवाळू आणि दानशूर वृत्तीचे सहज दर्शन होते.

मी रियो मध्ये गोल्ड मेडलसाठी लढलो. आज मी तुम्हा सर्वांना त्यापेक्षा मौल्यवान गोष्टीसाठी लढण्याकरिता पुढे येण्याचे आवाहन करीत आहे. जर तुम्ही मला आज मदत केलीत तर मी मिळवलेले हे सिल्व्हर मेडल लहानग्या ओलेक साठी गोल्ड मेडलपेक्षाही मौल्यवान ठरेल.

Piotr ची फेसबुक पोस्ट :

त्याची ही पोस्ट संपूर्ण जगभर व्हायरल झाली. जगभरातून त्याच्या मेडलसाठी बोलींचा पाऊस पडू लागला. अखेर त्याने आपल्याच देशातील ‘डोमिनिका आणि सॅबेस्टीयन कुलझ्याक’ या श्रीमंत भावा बहिणीच्या बोलीला मान दिला. आणि हे सिल्व्हर मेडल त्यांना विकले. ही दोन्ही भावंडे फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत समाविष्ट असून त्यांची संपत्ती सुमारे ४.१ बिलियन डॉलर इतकी आहे.

silver-medal-auction-marathipizza04

स्त्रोत

प्रतिक्रिया देताना सॅबेस्टीयनने सांगितले :

आम्ही दिलेली किंमत उघड करू इच्छित नाही परंतु आम्ही दिलेली रक्कम ओलेकच्या शस्त्रक्रिसाठी आणि उपचारांसाठी मुबलक आहे.

समाजकार्यासाठी काम करणाऱ्या ‘सियेपोमागा’ नामक पोलिश संस्थेने ओलेकच्या उपचारांसाठी यापूर्वीच १,२६,००० डॉलरचा निधी जमावला आहे. न्युयॉर्कमधील डोळ्यासंबधी कर्करोगतज्ज्ञ डेव्हिड अॅब्रमसन यांच्या क्लिनिकमध्ये ओलेकवर केल्या जाणाऱ्या पुढील उपचारांसाठी हा निधी वापरला जाईल.

silver-medal-auction-marathipizza05

स्त्रोत

Piotr त्याच्या चाहत्यांना संबोधताना म्हणतो:

मी त्याला नेहमी सांगायचो की आपण एकत्र मिळून चमत्कार घडवून आणू शकतो. एका आठवड्यापूर्वी केवळ पदक म्हणून ज्याकडे पाहिलं जात होत त्या माझ्या सिल्व्हर मेडलची किंमत आज कित्येक पटीने वाढली आहे. त्याची किंमत म्हणजे लहानग्या ओलेकचा पुनर्जन्मच आहे जणू! हा माझा आणि ओलेकचा आजवरचा सर्वोत्तम विजय आहे.

 

silver-medal-auction-marathipizza06

स्त्रोत

दानशूर कर्णाच्या कथा आपण केवळ ऐकून आहोत, पण Piotr सारख्या व्यक्ती कर्णाची प्रतिकृती आपल्यासमोर उभी करतात. ज्यांना ना कोणत्या गोष्टचा मोह असतो, न स्वार्थ असतो. त्यांच्यासाठी महत्वाचा असतो एका गरजूच्या  चेहऱ्यावरचा आनंद आणि तीच त्यांच्या दृष्टीने मौल्यवान संपत्ती असते…!

silver-medal-auction-marathipizza07

स्त्रोत

ओलेक तुझ्या हिंमतीची देखील दाद द्यावी लागेल…असाच खंबीर राहा…

“गेट वेल सून ओलेक…!”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 55 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?