एका ‘खोट्या’ मायकल जॅक्सनची गोष्ट !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
माईकल जॅक्सन म्हणजे डान्सर्सचा देव ! ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सचिन तसा डान्समध्ये एकच देव तो म्हणजे माईकल जॅक्सन ! काही वर्षांपूर्वी आपण या महान डान्सरला कायमचेच गमावून बसलो. असा डान्सर पुन्हा होणे नाही असेचं सगळे जण म्हणत होते. परंतु आता हे विधान खोटं ठरतंय की काय अशी परिस्थिती आहे, कारण जगासमोर एक असा व्यक्ति प्रकट झालाय तो अगदी सेम माईकल जॅक्सन सारखा दिसतो. माईकल जॅक्सनचे कट्टर चाहते देखील त्याचा फोटो पाहून म्हणतील हा ओरिजिनल माईकल जॅक्सनचं आहे.
या डुप्लीकेट माईकल जॅक्सनचे नाव आहे – Sergio Cortes !
जेव्हा तो रस्त्यांवर फिरायला लागला तेव्हा लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले. त्याचा केवळ चेहराच नाही तर त्याची देहबोली, चालण्याची पद्धत, लकब आणि डान्स देखील अगदी अक्षरश: माईकल जॅक्सन सारखाचं आहे. अर्थात त्याने माईकल जॅक्सनला कॉपी करण्यात बरीच वर्षे मेहनत केली असणार, तेव्हा कुठे आज तो ज्युनियर माईकल जॅक्सन म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे.
त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटचे काही फोटोज आम्ही येथे देत आहोत म्हणजे तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल…!
या डुप्लिकेटचा अस्सल मायकल जॅक्सन स्टाईल डान्स पाहण्यासाठी हा व्हिडियो जरूर बघा !
—
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.