विमानात love at first sight झालंय? मग तुमचं प्रेम ही वेबसाईट शोधून देईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रवासात पहिलीच भेट. नजरानजर झाली आणि प्रेमही झाले. पण त्या प्रिय व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता काहीच माहिती नाही मग तिला शोधायचे कसे, कुठे असे अनेकांच्या बाबतीत घडले असेल, घडतेही, पण त्या प्रिय व्यक्तीला शोधणे आता फारसे अवघड जाणार नाही. अर्थात ही सुविधा सध्या तरी विमान प्रवास करण-यांसाठीच उपलब्ध आहे.

we-met-on-plane-marathipizza00

स्रोत

एका ऑस्ट्रेलियन उद्योजकाने ही शक्कल लढविली आहे. त्याने ‘वुई मेट ऑन प्लेन.कॉम’-  wemetonaplane.com नावाची वेबसाईट काढली असून प्रियजनांच्या शोधात असलेल्या लव्ह बर्डस्साठी ही उपयोगाची ठरणार आहे.

विमानात भेटलेल्या त्याचे किंवा तिचे नाव, गाव, पत्ता काहीही माहिती नसले तरीही त्या आवडत्या व्यक्तिला शोधणे या वेबसाईटव्दारे शक्य होणार आहे.

आपला संपर्क जास्त असेल तर प्रियजनाची भेट होणे अधिक सोपे कारण सोशल नेववर्कींगमध्ये ती व्यक्ती कुणाची तरी फ्रेंड असेल अथवा कनेक्ट असणारच त्यामुळे आपली अजनबी प्रिय व्यक्ती शोधणे या वेबसाईटव्दारे शक्य असल्याचे त्याचे निर्माते विल स्कली पॉवर सांगतात.


we-met-on-plane-marathipizza03

स्रोत

विल स्कली पॉवर हे ३६ वर्षांचे आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांची जिवलग मैत्रिण विमान प्रवासातच भेटली होती. त्यावरूनच त्यांना ही कल्पना सुचली. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते या प्रसंगावरून सिध्द होते.

गुगल सर्च इंजिनवर दर महिन्याला मेट ऑन प्लेन सर्च करणारे सरासरी 4 हजार 400 लोक असतात.त्यामुळे माझ्या या वेबसाईटसाठी ही माहिती खूपच महत्वाची ठरली. खरे म्हणजे आपल्यासारखे बरेच जण आहेत हे मला कळले.

या वेबसाईटचा वापर कसा कराल?

we-met-on-plane-marathipizza01

स्रोत

अजनबी प्रियेला शोधणार कसे असा प्रश्न पडला असेल तर हे करा. वेबसाइटवर लॉग ऑन केल्यानंतर आपला फ्लाइट नंबर, वर्ष, महिना, तारीख, ठिकाण आदी माहिती फिड करायची. या विमानात असलेल्या इतर प्रवाशांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले असतील तर लगेच ते तुमच्यासमोर डिस्प्ले होतील, पण यातही तुमच्या त्या व्यक्तीचा शोध लागला नाही तर ? तर मग शेअर युवर स्टोरी वर क्लिक करून आपला किस्सा लिहायचा. कुठे भेटली किंवा भेटला. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट कसे झाले वगैरे वगैरे.

we-met-on-plane-marathipizza02

स्रोत

आपला हा किस्सा फेसबुक अथवा ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटद्वारे शेअर केला की हे पोर्टल तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत करेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *