सर्व खंडांची टक्कर होऊन भविष्यात उदयाला येणार एक नवा खंड: शास्त्रज्ञांचे अविश्वसनीय भाकीत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भविष्याबद्दल ही शास्त्रज्ञ जमात काय भाकीत करेल सांगता येत नाही. आपल्या संशोधनाच्या जोरावर ते निरनिराळे निष्कर्ष पुराव्या सकट जगासमोर आणीत असतात आणि आपल्याला अचंबित करून सोडतात. आता नुकताच एक दावा करण्यात आला आहे की भविष्यामध्ये भूगर्भीय बदलांमुळे एका नव्या खंडाची रचना होईल आणि मुख्य म्हणजे या नव्या खंडाची रचना अतिशय आश्चर्यकारक पद्धतीने होणार आहे.

amasia-marathipizza

स्रोत

भविष्यात ५० ते २०० दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीवरील सर्वच खंडांची एकमेकांशी टक्कर होऊन एका नव्या विशाल महाखंडाची निर्मिती होईल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या नव्या विशाल महाखंडाला अमाशिया असे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेतील येल विद्यापीठाच्या भूवैज्ञानिकांच्या संशोधनानुसार,

अमेरिका आणि आशिया खंड उत्तरेच्या दिशेने सरकतील. त्यामुळे आर्क्टिक आणि कॅरेबियन महासागराचे अस्तित्व संपुष्टात आणत उत्तर ध्रुवावर हे दोन्ही खंड एकमेकांमध्ये विलीन होऊन ‘अमाशिया’ नावाचा एक विशाल महाखंडच तयार होईल.

हे संशोधन म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील प्लेट्स सातत्याने सरकत असल्याचेच ज्वलंत उदाहरण असून प्लेट्सच्या सततच्या सरकण्यामुळे एक दिवस आज असलेले जग एक दिवस दुस-याच ठिकाणी वसलेले दिसणार आहे. पृथ्वीच्या गर्भातील या प्रक्रियेमुळे सध्याच्या उत्तर ध्रुवाच्या थोड्याफार अंतरावर युरोप आणि आशिया खंडाची टक्कर होईल, असे भूवैज्ञानिक रॉस मिशेल यांचा अभ्यास सांगतो.

amsia-marathipizza01

स्रोत

आमच्या अभ्यासपूर्ण संशोधनानुसार ऑस्ट्रेलियाची उत्तरेकडे सरकत जाण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असून एक दिवस तो भारताला अगदी खेटून वसलेला असेल असा या भूवैज्ञानिकांचा दावा आहे.

अन्य उपखंड एकत्र येऊन विशाल महाखंडाच्या अस्तित्वात येण्याची प्रक्रिया लक्षावधी वर्षे चालणार असून हे खंड 90 अंशांमध्ये एकमेकांपासून दूर गेलेले असतील, असा विश्वास भूवैज्ञानिकांना वाटतो. अस्तित्वातील महाखंड एकमेकांमध्ये विलीन होऊन महाखंड स्थापन होण्याच्या बदलला येलच्या भूवैज्ञानिकांनी ‘ऑर्थोव्हर्जन’ असे म्हटले आहे.

यापूर्वी असा बदल दिसून आला होता. त्याला ‘इंट्रोव्हर्जन’ नाव दिले होते. हे बदल खंडाचे सरकत जाणे आणि त्याच ठिकाणी एकत्र येण्यातून महाखंडांची निर्मिती होते, असे दर्शवतात.

amsia-marathipizza02

स्रोत

या नव्या बदलानुसार महाखंडाच्या निर्मितीनंतर अटलांटिक महासागर अस्तित्वात येईल आणि जेव्हा हे खंड परस्परांपासून वेगळे होऊन मूळ जागेवर जातील, तेव्हा अटलांटिक गायब होईल, असा हा बदल सांगतो.

300 दशलक्ष वर्षांपूर्वी पँगिया नावाचा महाखंड अस्तित्वात आला होता. त्यापाठोपाठ अन्य तीन महाखंड अस्तित्वात आले होते. सरपटणारे प्राणी आणि डायनासोर असलेला पँगिया महाखंड रॉडिनिया महाखंडाच्या 90 अंशांवर अस्तित्वात आला होता. त्यापूर्वी रॉडिनिया महाखंड न्यूना महाखंडाच्या 90 अंशांमध्ये अस्तित्वात आला होता.

rodonia-marathipizza

स्रोत

शास्त्रज्ञांचे हे भाकीत जरी खरे असेल तरी तसे होण्यास अतिशय मोठा काल बाकी आहे. तोवर या दोन खंडावरच्या जीवनमानाला धोका नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?