एक पत्र- प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या Ex-Boyfriend साठी लिहिलेलं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजकालच्या प्रेम प्रकरणात  मनं कधी जुळतात आणि कधी विलग होतात हे कळायला मार्ग नाही. रोज काही न काही नवीन बघायला मिळतं. कुणी कुणाला दुखावतं तर कुणी कुणाच्या प्रेमाचा गैरवापर करतं. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय. आजकालची युगुलं कधी दूर जातील आणि कधी जवळ येतील काहीच सांगता येत नाही. म्हणूनच काहींचा प्रेमावरचा विश्वास उडत चाललायं. प्रेम ही एक भावना राहिली नसून एक व्यवहार, एक देवाण घेवाणीचं नातं झालंय असं वाटतंय.

पण नाही, जगात भलाई अजून बाकी आहे म्हणतात ना, तसं खरं प्रेम करणारे लोक सुद्धा आहेत ह्या जगात..! त्यांना प्रत्येक गोष्ट तितकीच महत्वाची वाटते. आपल्या जोडीदाराच्या सुखात आणि दुःखात ते नेहमी त्याच्या सोबत असतात.

असाच एक अमेरिकेचा रहिवासी रायन मार्च ह्या टॅटू आर्टिस्टने आपल्या होणाऱ्या बायको -कार्ली राईट हिच्या जुन्या प्रियकराला फेसबुकवरून पत्र लिहिलंय, आणि ते awesome आहे. सोशल मीडिया वर हे पत्र भन्नाट viral होतंय!

 

rayan-march-letter-marathipizza02

 

या पत्रातील मजकूर खाली वाचा..

 

ज्याने तिला अर्ध्यावर सोडलं,
त्या माणसाला धन्यवाद,
तिच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी, तिच्यापासून दूर होण्यासाठी धन्यवाद!
तिच्यावर प्रेम करण्याची संधी दिल्याबद्दल,

तिला आनंद देतील अश्या गोष्टी करण्याची संधी दिल्याबद्दल,

तिला खरंच माझ्या जवळ ठेवू दिल्याबद्दल धन्यवाद!
तिला त्रास, दुःख दिल्याबद्दल धन्यवाद!
तू तसं केल्यामुळेच तर तिला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
मी कधीच तिच्या दु:खाचं कारण बनणार नाही,
कारण तिला रडताना बघून मला जास्त त्रास होतो!
तू तिच्यासाठी जे करू शकला नाहीस ना, ते सगळं मी करणारे.
तिला एकटं वाटेल तेव्हा तिच्या बाजूनं उभा राहणार, तिलाच प्राधान्य देणार,
तिला ती एक ‘पर्याय’ आहे अशी जाणीवसुद्धा नाही होऊ देणार,
तिच्या गप्पा, रडगाणे, गोष्टी सगळं कितीही अतर्क्य असलं ना तरी मी ऐकणार आहे.
तिला प्रेम आणि वेळ देण्यासाठी ते तिने मागण्याची वाट बघत बसणार नाहिये मी!
जिची किंमत ओळखायला तू चुकलायस ना, तिची काळजी घेणार आहे मी!
जिला तू गृहीत धरलंस तिच्यावर जीवापाड प्रेम करणार आहे मी!
तिला माझ्या आयुष्यात ठेवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे!
ती जशी आहे तसाच जीव लावेन आणि तिला जे हवंय ते बनण्यात मी मदत करेन
जो भागीदार बनणं तुला नाही जमलं तो मी बनून दाखवेन!
तुझ्याकडून झालेल्या चुका मी माझ्याकडून कदापि होऊ देणार नाही!
मी तिला माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही!

 

– रायन मार्च

 

असं काहितरी बघितलं की प्रेमावरचा विश्वास अजूनच वाढतो, नाही का?

 

हे असं प्रेम करावं, चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा मेळ घालून!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 51 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?