स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल एका भारतीय भावाने बहिणीला लिहिलेलं पत्र

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


भारतात वात्सायनाच्या काळी वेदांत “काम” हा “धर्म, अर्थ ,काम आणि मोक्ष” ह्या चार पुरुषार्थांपैकी एक सांगितला आहे. याच भारतात “काम” ह्या पुरुषार्थावर ते करण्याच्या काय पद्धती आहेत ह्यावर एक अख्खा ग्रंथ लिहिला गेला आहे.

त्याच भारतात शेकडो वर्षांपासून “काम” ही चार भिंतींच्या आड गुपचूप उरकून टाकण्याची एक गोष्ट उरली आहे. ह्या विषयाची साधी चर्चाही उघडपणे करणे म्हणजे निर्लज्जपणा समजला जातो.

निरोधांची जाहिरात टीव्हीवर लागली की, पटकन टीव्हीचा आवाज तरी बंद केला जातो किंवा चॅनेल बदलून टाकले जाते. कदाचित म्हणूनच आज आपली लोकसंख्या इतक्या भयावह प्रमाणात वाढली आहे.

लहान बालकांवर लैंगिक अत्याचार होऊ नयेत, त्यांना आपल्याबरोबर काय होते आहे हे कळावे, त्याविरोधात त्यांनी पालकांकडे तक्रार करावी म्हणून शास्त्रशुद्ध लैंगिक शिक्षण देणे आवश्यक आहे.

पण, “ह्याची काय गरज आहे? वेळ आली की आपोआप सगळं कळेल!”असा विचार करून वेळीच मुलामुलींना हे अत्यावश्यक शिक्षण दिले जात नाही. म्हणूनच आज गुगलच्या जमान्यात सुद्धा बायोलॉजी हा विषय न शिकलेल्या कित्येक मुली लग्नाला उभ्या राहतात.या मुली “सेक्स” म्हणजे नेमके काय ह्यापासून अनभिज्ञ असतात.

 

Indian-Bride-Crying-inmarathi
daveshay.com

केवळ किस केल्याने प्रेग्नन्ट राहू ह्या चिंतेखाली कितीतरी तरुण वावरत असतात. तर बायोलॉजी न शिकलेल्या कित्येक मुलांना स्त्रीची मासिक पाळी का येते ह्याबद्दल काहीही माहिती नसते.

दुर्दैवाने आपल्याकडे सेक्सबद्दल फक्त मित्रामित्रांत चवीने चर्चा किंवा नॉनव्हेज जोक्सपुरताच संवाद होतो. कित्येक नवरा बायको सुद्धा ह्याबद्दल एकमेकांशी बोलत नाहीत. ही अशी परिस्थिती असताना पुरुषांप्रमाणे स्त्रियांच्याही लैंगिक गरजा असतात हे तर कित्येकांच्या गावीही नसते.

सेक्स म्हणजे पुरुषाने किंवा नवऱ्याने डिमांड करणे. बायकोने फक्त त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला जवळ येण्यासाठी आडकाठी न करणे. तो जे करतो ते त्याला करू देणे इतकाच अर्थ घेतला जातो.


ह्यात स्त्रियांनाही इच्छा असतात हे कोणी लक्षातच घेत नाही. स्त्रीने ह्याविषयी बोलणे, ह्याची डिमांड करणे म्हणजे शिव! शिव!

पार्टनर नसेल किंवा पार्टनर इच्छा पूर्ण करत नसेल किंवा तसे करण्यात असमर्थ असेल तर अशा वेळी पुरुष हस्तमैथुनाचा आसरा घेतात. ही अतिशय नैसर्गिक असलेली क्रिया आपल्याकडे विकृती समजली जाते.

ही जर पुरुषांबद्दलच विकृती समजली जात असेल तर, स्त्रियांच्या हस्तमैथुनाविषयी बोलणेच खुंटते. मुळात किती स्त्रिया ह्याचा आधार घेत असतील ही सुद्धा शंकाच आहे. कारण ह्याबाबतीत कोणीच कोणाशी उघडपणे बोलत नाही.

जिथे नवरा बायकोचा संसार ह्याविषयी न बोलता होतो, तिथे भावाने ह्याविषयी बहिणीला काही सांगणे किंवा शास्त्रशुद्ध भाषेत ह्याविषयी बोलणे म्हणजे तर धर्मच बुडाला म्हणायचे!

 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

बहिण भावाने एका मर्यादेत राहावे, एका विशिष्ट वयानंतर एकमेकांच्या अंगचटीला जाऊ नये असे संस्कार आपल्यावर आहेत.

अनेक लोक आजही मोठया बहिणीने भावाला प्रेमाने मिठी मारली किंवा मोठ्या भावाने लहान बहिणीला मायेच्या हक्काने जवळ घेतले तर त्या मुलींना “छचोर किंवा चवचाल” अशी विशेषणे लावतात.

ह्या सगळ्या परिस्थितीत भावाने जर बहिणीला स्त्रियांचे हस्तमैथुन ह्या विषयावर पत्र लिहिले तर? बापरे! हे म्हणजे अशा ऑर्थोडोक्स लोकांचे सगळ्यात भयंकर “नाईटमेयर” आहे. कारण ह्या भावा बहिणीने सर्व मर्यादाच तोडून टाकल्यात.

माणिक रेगे ह्या व्यक्तीने इंटरनेटवर वादळ निर्माण केले आहे.

ज्या गोष्टीबद्दल भावाशी उघडपणे बोलतही नाही, त्या गोष्टीबद्दल त्याने चक्क बहिणीला पत्र लिहिले आहे. तो बहिणीला सांगतो की, हस्तमैथुन करून स्वतःची इच्छा शमवणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, ह्यात काहीही ऍबनॉर्मल नाही.

या पत्राचे भाषांतर देत आहोत.

===

प्रिय ईशा,

तू १५ वर्षांची झाल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन! आणि आता नरकात म्हणजेच पौगंडावस्थेत तुझे स्वागत आहे. हे कायम लक्षात ठेव की, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि तुझ्या ह्या प्रवासात तुझा हा भाऊ कायम तुझ्याबरोबर आहे.

आईबाबांखेरीज मी सुद्धा मला तुझा पालक समजतो. म्हणूनच मी तुला काही नाजूक गोष्टींची योग्य वेळी माहिती करून देणे माझे कर्तव्य समजतो. ह्या विषयावर प्रत्येक पालकाने आपल्या वाढत्या वयाच्या मुलांशी उघडपणे चर्चा करायला हवी.

तुला आईने आणि शाळेतल्या शिक्षकांनी तुझ्या शरीरात घडणाऱ्या बदलांबद्दल कल्पना दिली असेलच. आता दर महिन्यात तुला “मासिक पाळी” ला सामोरे जावे लागेल. हार्मोन्समुळे शरीरात अनेक बदल घडतील. ह्याचा तुझ्या शरीरावर तसेच मनावर सुद्धा परिणाम होईल.

तुला ह्या सगळ्याची व्यवस्थित कल्पना आहे, हे गृहीत धरून दुसऱ्या एका संवेदनशील  विषयावर मी तुझ्याशी बोलणार आहे.

लैंगिक आरोग्य ह्या विषयावर चर्चा करताना हा विषय एकतर मागे पडतो किंवा ह्याबद्दल कोणी कोणाशी बोलतच नाही. मी तुझ्याशी हस्तमैथुन ह्या विषयावर बोलणार आहे. हो! हस्तमैथुनच!

 

shh-female-inmarathi
yogapedia.com

हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाय अशी प्रतिक्रिया प्लिज देऊ नकोस. तू आणि तुझ्या मित्रमैत्रिणींनी ह्या विषयावर अनेकदा चर्चा केली असणार, ह्याविषयी जोक्स ऐकले असणार.

म्हणूनच मला वाटते की,

याविषयी जी माहिती तुला मिळाली आहे किंवा ज्या घाणेरड्या शब्दांत तुला मिळाली आहे ती अर्धवट आहे. म्हणूनच कदाचित एका बाजूला तुला “त्या जागी” स्वतःला स्पर्श करणे किळसवाणे वाटू शकेल. पण दुसऱ्या बाजूला तुला स्वतःला स्पर्श करून बघावा असेही वाटत असेल.

हे सगळे वाचून तू घाबरण्याआधी मी तुला सांगू इच्छितो की, मला तुला ऑकवर्ड किंवा अनकम्फर्टेबल करायचे नाहीये. मला तुझी लैंगिक शिक्षणावर शिकवणीही घ्यायची नाहीये. मी तुझ्या पर्सनल स्पेसचा आदर करतो म्हणूनच तुला हे पत्र लिहितो आहे.

मला तुला हे सांगायचे आहे की, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा तुला मित्राची किंवा आधाराची गरज पडेल, तेव्हा मी तुझ्याबरोबर नक्की असेन. मला तुला हेच सांगायचेय की, अशी इच्छा मनात निर्माण होणारी ह्या जगात तू एकटीच नाहीस.

पाच वर्षांपूर्वी मी ही ह्या सगळ्या परिस्थितीतून गेलो आहे. त्या क्षणी माझ्या मनात हजारो प्रश्नांनी, हजारो विचारांनी गर्दी केली होती. पण दुर्दैवाने मला योग्य उत्तर देणारे, मला समजून घेऊन ह्या सगळ्याची योग्य माहिती देणारे कोणीही नव्हते.

म्हणून माझे मलाच समजून घ्यायला, सगळी परिस्थिती हाताळायला थोडा वेळ लागला. तुझीही अशीच अवस्था होऊ नये, तुझ्या मनात कुठले संभ्रम तयार होऊ नयेत हीच माझी इच्छा आहे. म्हणूनच मी तुला सांगतो आहे की “इट्स ओके”, हे अगदी नैसर्गिक आहे.

तुला स्वतःला स्पर्श करण्याची इच्छा होणे अगदी नैसर्गिक आहे. वेगळीच स्वप्ने आणि विचित्र फेटीशेस तयार होणे ह्या वयात अगदी नैसर्गिक आहे. खरे तर हस्तमैथुन करण्यात काही चुकीचे नाही.

उलट हे करणे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याने तुम्हाला तुमचेच शरीर जवळून माहिती होते. तुम्हाला तुमच्या इच्छा कळतात. तुम्हाला कळते की, कशाने तुम्हाला सुख मिळते व कशाने त्रास होतो. याने तुमचा स्वतःच्या शरीरावर ताबा राहतो.

हस्तमैथुन, त्यातल्या त्यात स्त्रियांचे हस्तमैथुन हा अजूनही समाजात मोठा टॅबू आहे.

 

female-musterbation-inmarathi
india.com

स्त्रियांनाही लैंगिक इच्छा असतात. त्या तुमच्या परवानगीशिवाय किंवा तुमच्या मदतीशिवाय स्वतःची इच्छा पूर्ण करून घेऊ शकतात. ही भावना पूर्वीपासून पुरुषसत्ताक समाजाच्या इगोला धक्का पोचवते. कारण सुरुवातीपासूनच ह्या समाजाने स्त्रीला एक उपभोग्य वस्तूचाच दर्जा दिला आहे.

पुरुषाने हस्तमैथुन केले तर ते चालते. कारण त्यातून तो आपल्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करत असतो. पण हेच जर स्त्रियांनी केले तर ते कृत्य लज्जास्पद, गलिच्छ ठरते व त्यावर चर्चा होते. जर हे खरंच चुकीचे असेल आणि हा खरंच नरकाचा, सैतानाचा मार्ग असेल तर, मी तुला एक सल्ला देईन.

जर तुझे सुख ह्या सो कॉल्ड नरकाच्या मार्गावर असेल तरी ह्या मार्गाने नक्की जा! मी तुला सांगेन की, ह्या मार्गावर चालल्याने तुला शिक्षा मिळाली तरी हे करून जे सुख मिळेल ते शिक्षेच्या तुलनेत मोठा व चांगला अनुभव देणारे असेल.

एक सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेव, ह्या जगात असेक्शुअल लोक म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारची लैंगिक भावनाच नसते, ते लोक सोडल्यास प्रत्येक व्यक्ती हे काम करते. मग ते लोक हे मान्य करोत अथवा न करोत.

कारण? आपण सगळेच मानव आहोत व मानवाला ह्या भावना निसर्गदत्त असतात. प्रत्येकाच्या ह्या शारीरिक गरजा असतात आणि शरीर त्या गरजा पूर्ण करण्याची मागणी करत असते.

दुसरी व महत्वाची गोष्ट अशी की, हे करण्यासाठी किंवा न करण्यासाठी तुला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. ही तुझी निवड व तुझा निर्णय आहे की, हे करावे किंवा करू नये. तुला हे करण्याचा चॉईस आहे व हा तुझा हक्क आहे.

जर याचे व्यसन लागत नसेल किंवा तुझ्या महत्वाच्या कामात या गोष्टीचा अडथळा निर्माण होत नसेल तर, ही गोष्ट केल्याने तुला कुठलाही त्रास होणार नाही. तुझे कसलेही नुकसानही होणार नाही.

तिसरी गोष्ट अशी की, ह्याने तुमचे नाते टिकून राहण्यात मदत होते. तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या गरजा सांगू शकता व त्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या पार्टनरने काय करायला हवे हे ही सांगू शकता.

चौथी व शेवटची गोष्ट ही की, ह्याने ताण कमी होतो, इन्फेक्शन्स पासून आपण लांब राहतो व असे केल्याने आनंद मिळतो. मग हे का करू नये?

५० वर्षांपूर्वी ह्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नव्हती. आता मात्र ह्या विषयावर अनेक पुस्तके, लेख व व्हिडीओज सुद्धा उपलब्ध आहेत. तू एकटी असताना हे वाचून, बघून ह्यावर अधिक माहिती मिळवू शकतेस.

तुला एक गंमत सांगतो, ह्या गोष्टीसाठी एक ऍप सुद्धा उपलब्ध आहे जे तुम्हाला ह्यात गाईड करतं! 

 

HAPPYPLAYTIME-inmarathi
huffpost.com

आपण फार योग्य काळी जन्माला आलो आहोत असे म्हणायला हरकत नाही. कारण माहितीचा प्रचंड स्रोत आपल्याला उपलब्ध आहे. माझा मुद्दा हा आहे की,

आपल्या आजूबाजूला माहिती मिळवण्यासाठी अनेक माध्यमे आहेत. म्हणूनच तू ह्याविषयी माहिती मिळवावी. तुला जेव्हा जेव्हा ह्याबाबतीत प्रश्न पडतील तेव्हा तेव्हा ते तू योग्य व्यक्तीला विचारून शंकांचे निरसन करून घ्यावे.

मोठी माणसे म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पण मला असे वाटत नाही. कारण ह्या काळात लहान मुलेसुद्धा एका क्लिक मध्ये हवी ती माहिती मिळवू शकतात. म्हणूनच योग्य वय वगैरे आजच्या काळात राहिलेले नाही.

लहान मुले प्रश्न विचारतात तेव्हा मोठी माणसे त्या प्रश्नांना अर्धवट उत्तरे देतात किंवा प्रश्नच उडवून लावतात. मग मुले मित्र मैत्रिणींना विचारून कशीबशी उत्तरे मिळवतात. पण ती माहिती बऱ्याच वेळा अर्धवट किंवा चुकीची असतात. त्यामुळे बऱ्याच मुलांचे आयुष्यभरासाठी नुकसान होते.

त्यामुळेच तुला एक सांगू इच्छितो की,

जेव्हा तू आई होशील तेव्हा तुझ्या मुलांचे प्रश्न दुर्लक्षित करू नकोस. त्यांना व्यवस्थित व योग्य उत्तरे दे. तुझ्या मुलांना जेव्हा एक मित्र म्हणून तुझी गरज असेल तेव्हा त्यांच्या पाठीशी उभी रहा. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा त्यांना आपोआप कळेल असे म्हणून आपली जबाबदारी झटकून टाकू नकोस.

मी मान्य करतो की, ते त्यांच्या परीने माहिती मिळवतील सुद्धा! पण जेव्हा ते मोठे होतील तेव्हा त्यांचा तुझ्यावरचा विश्वास कमी झालेला असेल. तू त्यांचे प्रश्न व समस्यांकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केले तर, ते मोठे झाल्यावर त्यांच्याकडून चुका झाल्यावर त्यांना बोलण्याचा, रागावण्याचा हक्क तुला राहणार नाही.

आताचे जग खूप वेगवान आहे. मुले १८ वर्षाची झाल्यानंतर त्यांच्याबरोबर लैंगिक भावनांविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. कारण ते १८ चे होईपर्यंत त्यांना सर्व माहिती झालेले असते. त्यांच्या मनात अर्धवट व चुकीच्या माहितीचा भरणा झालेला असतो.

म्हणूनच मुलांना जेव्हा जेव्हा प्रश्न पडतील, तेव्हाच त्यांना त्यांची योग्य उत्तरे द्यायला हवीत. मुलांची उत्सुकता झटकून टाकू नये तर, ती व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. त्यांना योग्य व चांगली माहिती देऊन त्यांची ह्या वयातली नैसर्गिक उत्सुकता शमविली पाहिजे. त्यांच्या ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

 

indian-parents-marathipizza
news18.com

प्रिय ईशा, मी तुला व तुझ्या पिढीला एक फ्रेंडली गाईड म्हणून सांगतो की,

घरातल्यांना प्रश्न विचारण्यात काहीही चुकीचे नाही. प्रश्न विचारण्याची लाज कधीही वाटून घेऊ नकोस. आपल्या शरीराची रचना, त्यातील बदल, त्याचे परिणाम ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा तुला हक्क आहे. आणि आम्ही मोठे म्हणून तुला ती सर्व माहिती योग्य प्रकारे देणे आमचे कर्तव्य आहे.

तुझ्याप्रमाणेच शारीरिक गरजा असलेला एक तरुण म्हणून मी तुला आणखी एक सल्ला देऊ इच्छितो. स्वतःच्या गरजा आधी पूर्ण करण्यात काहीही चुकीचे नाही. ह्याबाबतीत अपराधी वाटून घेण्याचेही काही कारण नाही. स्वतःला आनंद मिळेल, छान वाटेल असे काही करावेसे वाटण्यात काहीच चूक नाही.

हे केल्याने तू काहीही वाईट करणार नाहीस. आणि जरी तू कुठे चुकलीस तरीही एक लक्षात ठेव की, तुझ्यावर विश्वास ठेवणारा, तुझी स्पेस जपणारा आणि तू व्यक्त न करू शकणाऱ्या भावना समजून घेणारा कोणीतरी तुझ्याबरोबर कायम राहील.

तुला माहितेय? मी आईला वचन दिले आहे की, ती आणि बाबा तुझे मित्र बनू शकले नाहीत तरी मी कायम तुझा मित्र बनून राहीन. तुझ्या डोक्यात हे कायम राहावे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय की, प्रिय ईशा तू एकटी नाहीस. तुझ्या पाठीशी मी कायम असेन. आणि तुझ्या सर्व निर्णयांना मी पाठिंबा देईन ह्याबद्दल १०० टक्के खात्री बाळग.


म्हणूनच रिलॅक्स हो! लाईट बंद कर आणि गुगलवर ख्रिस हेम्सवर्थ सर्च करून तुझ्या आयुष्यातला एक क्रेझी अनुभव घे.

Happy play time, my dear lady!

तुझ्यावर कायम विश्वास असणारा तुझा भाऊ,

माणिक रेगे.

===

माणिक रेगे, तुझ्या ह्या धाडसाला आणि विचारांना सलाम! बहिणीची ह्या बाबतीत सुद्धा काळजी करणारे भाऊ कमीच असतील..कदाचित नसतीलही..


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
One thought on “स्त्रियांच्या हस्तमैथुनाबद्दल एका भारतीय भावाने बहिणीला लिहिलेलं पत्र

  • September 21, 2018 at 5:32 pm
    Permalink

    it’s natural

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?