' आणीबाणी आणि “एका चित्रपटामुळे” संजय गांधीं गेले थेट तुरुंगात! – InMarathi

आणीबाणी आणि “एका चित्रपटामुळे” संजय गांधीं गेले थेट तुरुंगात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

२५ जून १९७५ ला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या झाली.

राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांच्या एका सहीने इंदिरा गांधी यांनी भारतीय लोकशाही हुकुमशाहीत परिवर्तीत केली.

नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आले, सरकारच्या विरोधी बोलणं हा गुन्हा मानला जाऊ लागला, एवढंच काय किती तरी चित्रपट, सिने कलाकारांनाही आणीबाणीच्या अन्यायाला सामोरे जावे लागले.

अनेक विरोधकांना जेलमध्ये डांबण्यात आले.

ज्या लोकशाहीचे आपण पोवाडे गात होतो, ते सूर आता भेसूर वाटू लागले होते.

 

emergency-1975-inmarathi
businessworld.in

 

१९७५ साली आणीबाणीच्या काळात संजय गांधींवर अनेक आरोप लावण्यात आले.

जसे बळजबरी, नसबंदी सरकारी कामात दखल, मारुती उद्योगाचे वाद आणि असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते.

आणीबाणीनंतर जेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली तेव्हा त्यांना एका चित्रपटामुळे जेलची हवा खावी लागली.

१९७५ साली निर्माण करण्यात आलेल्या “किस्सा कुर्सी का” या चित्रपटावर संजय गांधींकडून खुप अन्याय झाला होता. या चित्रपटाचे निगेटिव्ह आणि प्रिंट्स संजय गांधींच्या सांगण्यामुळे जाळून टाकण्यात आले.

त्यांनी असे का केले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. हा चित्रपट म्हणजे त्यांच्यावर बनवण्यात आलेला स्पूफ होता.

निर्माता आणि माजी खासदार अमृत नाहटा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. अमृत नाहटा यांचे सुपुत्र राके नाहटा या पुन्हा चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे सूत्र आहे.

राकेश नाहटा असा दावा करतात की संजय गांधी आणि तत्कालीन सूचना-प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्या आदेशानुसार काम करण्यार्‍या एका टीमने धाड टाकून चित्रपटाचे निगेटिव्ह आणि प्रिंट्स जाळून टाकल्या.

या संबंधित एक आरटीआय टाकल्यामुळे हे सत्य समोर आल्याचे समजते.

 

kissa-kursi-ka -inmarathi
indiatimes.com

 

१९७८ साली “किस्सा कुर्सी का पार्ट – २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला अनेक कट्स मिळाले. म्हणून त्यांना त्यांचे मत व्यवस्थित मांडता आले नाही.

आता त्यांचे सुपुत्र राकेश निहाटा “किस्सा कुर्सी का – पार्ट ३” बनविणार आहे व या चित्रपटात ते आणीबाणीच्या काळातील अत्याचार आणि राजकीय भ्रष्टाचार याविषयी पोल खोल करणार आहेत.

पण याबाबतीत अधिक माहिती मिळालेली नाही.

किस्सा कुर्सी का या चित्रपटासोबत शोले चित्रपटांपासून अनेक चित्रपटांना आणीबाणीमुळे धक्का बसलेला आहे.

आणीबाणीनंतर शाह कमीशनने यासाठी संजय गांधींना दोषी ठरविले आणि कोर्टाने त्यांची रवानगी तुरुंगात केली.

या चित्रपटात संजय गांधी आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे स्पूफ दाखवण्यात आले होते.

ह्या चित्रपटात शबाना आजमी मुक्या जनतेच्या रुपात दाखवल्या होत्या, उत्पल दत्त गॉडमॅन बनले होते आणि मनमोहन सिंह राजकीय नेत्याच्या भूमिकेत दाखवले होते, जे एक जादुचे औषध घेऊन विचित्र निर्णय घेत असतात.

जरी १९७८ साली हा चित्रपट पुन्हा बनवण्यात आला असला तरी हा चित्रपटाबद्दल केव्हा प्रदर्शित झाला हे सुद्धा लोकांना कळलं नाही.

पण या चित्रपटामुळे संजय गांधी जेलमध्ये गेले होते हा इतिहास नाकारता येत नाही.

 

sanjay-gandhi-inmarathi
newsworldindia.in

 

याबरोबर १९७८ साली आयएस जोहर यांनी “नसबंदी” या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट संजय गांधींनी केलेया नसबंदीचा स्पूफ होता.

या चित्रपटात अनेक मोठ्या कलाकारांच्या डुप्लिकेट्सने काम केले होते. या चित्रपटातील एक गीत,

“कितने ही निर्देोष यहाँ मीसा के अंदर बंद हुए,

अपनी सत्ता रखने को जो छीने जनता के अधिकार,

गांधी तेरे देश में ये कैसा अत्याचार…”

हे गीत किशोर कुमार यांनी गायले होते. महत्वाचे म्हणजे ते आणीबाणीमुळे नाराज होते.

कॉंग्रेसच्या एका रॅलीमध्ये त्यांना गाण्यास सांगितले होते तेव्हा त्यांनी नकार दिला व मुलाखतीत “मैं किसी के आदेश पर नही गाता” असं स्पष्ट मत मांडलं.

याचा परिणाम काय झाला हे तुम्हाला माहितच आहे. किशोर कुमार यांची गाणी ऑल इंडिया रेडियोवर बॅन करण्यात आली होती.

आणीबाणीमुळे शोले चित्रपटही धोक्यात आला होता. शोलेतील शेवटच्याव सीनमध्ये ठाकूर खिळ्यांच्या बुटांनी गब्बरला मारतो.

पण त्या काळच्या सेन्सॉर बोर्डला वाटलं की कुणीही कायदा हातात घेऊ शकता असा संदेश या सीनमुळे जातो, म्हणून बोर्डाने सुचवलं की गब्बरला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे.

पण रमेश सिप्पी आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

त्यांच्या वडीलांनी समजवलं की, आणीबाणीत कोर्टात जाण्याने सुद्धा फायदा होणार नाही.

१५ ऑगस्ट १९७५ हा चित्रपट रीलीज करण्याचा दिनांक ठरला होता.

म्हणून संजीव कुमार यांना सोवियत संघा येथून तत्काळ बोलवण्यात आले व शेवटचा सीन पुन्हा सूट केला, डबिंग आणि मिक्सिंगही करण्यात आला.

 

dev_anand-inmarathi
outlookindia.com

 

गुलजार यांच्या आंधी चित्रपटालाही असाच धक्का बसला होता. या चित्रपटाला सुद्धा आणीबाणीच्या वेळी बॅन करण्यात आले होते.

देव आनंद साहेब तर इतके नाराज होते की त्यांनी ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ हा राजकीय पक्ष सुद्धा स्थापन केला होता.

देव आनंद आपल्या आत्मचरित्रात लिहितात,

-“मैं समझ गया था कि मैं उन लोगों के निशाने पर हूँ जो संजय गांधी के करीब हैं.”

थोडक्यात काय तर आणीबाणीमुळे सिने जगतही धोक्यात आले होते. आज आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो.

पण त्या काळी अशा घटना घडल्या होत्या, ज्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला होता.

इतके चित्रपट आणि कलाकार आणीबाणीमुळे धोक्यात आले असले तरी “किस्सा कुर्सी का” या चित्रपटाने संजय गांधींना जेलमध्ये पाठवले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?