प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागचे तुम्हाला माहित नसलेले कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपण भारतीय उत्सवप्रिय माणसे आहोत, म्हणूनच इतर धार्मिक सणांप्रमाणे आपण राष्ट्रीय सण आणि उत्सव साजरे करतो. तसाच २६ जानेवारी- आपला प्रजासत्ताक दिन!

 

Celebration-and-flag-hosting-on-26january-at-school-marathipizza
rockswallpaperhd.com

 

ह्या दिवसाशी निगडीत आपल्या शाळेच्या दिवसाच्या खूप आठवणी असतात. आपण शाळेत झेंडावंदनासाठी पांढरा गणवेश, पांढरेशुभ्र शूज घालून जायचो, देशभक्तीपर गीतांवर नाच करायचो, समूहगीते म्हणायचो. काही उत्साही कार्यकर्ते भाषण द्यायचे.

सगळा कार्यक्रम झाला की शाळेतून तिळगुळाची वडी मिळायची. मग घरी आल्यावर टीव्हीवर आपण पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावरचे झेंडावंदन आणि भाषण बघायचो.


मग २६ जानेवारीची राजपथावरील भव्य दिव्य परेड बघायचो. सेनेची अद्भुत प्रात्याक्षिके बघायचो. टीव्हीवर देशभक्तीपर चित्रपट आवर्जून दाखवला जायचा. तर एकूण २६ जानेवारी हा दिवस निदान लहानपणी तरी मस्त जायचा.

पण मोठे झाल्यावर मात्र आपण २६ जानेवारी ह्या दिवसाकडे एक सुट्टी ह्याच दृष्टीने बघतो. २६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, ह्या दिवसापासून भारताची राज्यघटना अंमलात आली इतकेच आपल्याला माहित असते.

पण २६ जानेवारी हि भारतासाठी एक ऐतिहासिक तारीख सुद्धा आहे हे बऱ्याच लोकांना माहित नसते.

 

republic-day-marathipizza
medium.com

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण देशाचा कारभार अजूनही ब्रिटीशांच्याच नियमानुसार चालत होता. ह्या आधी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या भगत सिंग ह्यांनी १९२७ मध्येच कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये वक्तव्य केले होते की

देशाला जर पूर्ण स्वराज्य हवे असेल तर देशाचे स्वत:चे संविधान असायला हवे.

भगत सिंग ह्यांचे हे विचार कॉंग्रेसचे युवा नेते नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनाही पटले.

म्हणूनच कॉंग्रेसने ब्रिटीश सरकार समोर पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि देशाचे संविधान लागू करण्याविषयी सूचना केली. पण १९२८ मध्ये ब्रिटीश सरकारने हे अमान्य केले व ह्याचे कारण असे दिले की हिंदुस्थान हे सध्या स्वातंत्र्य मिळण्यायोग्य झाले नाही.

 

jawaharlal-neharu-marathipizza
pinterest.com

१९२९ रोजी पंडित नेहरू ह्यांना कॉंग्रेसच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष घोषित करण्यात आले. तेव्हा त्यांनी परत पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि १९३० मधील जानेवारीच्या एका रविवारी लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि योगायोगाने तो दिवस २६ जानेवारी हा होता.

हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्यदिनासारखा साजरा करण्यात आला.

 

republic-day-marathipizza01
india.com

ह्यानंतर ब्रिटीशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध ह्यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ लढा द्यावा लागला आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.

पण ते अंमलात कधीपासून आणायचे ह्यावर नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या मनात २६ जानेवारी ही तारीख आली, कारण पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोरच्या अधिवेशनामध्ये लाहोरच्या रावी नदीच्या तटावर तिरंगा फडकवला होता तसेच तेव्हाच त्यांनी पूर्ण स्वराज्याची घोषणा सुद्धा केली होती.

 

Independence-day-indian-national-congress-marathipizza
goaprism.com

त्या दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारी हाच दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडला आणि २६ जानेवारी 19५० पासून भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *