' ....म्हणून मार्लन ब्रांडो ने प्रतिष्ठित "ऑस्कर" पुरस्कार नाकारला होता!

….म्हणून मार्लन ब्रांडो ने प्रतिष्ठित “ऑस्कर” पुरस्कार नाकारला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखादी गोष्ट पटली नाही तर आपण विरोध करतो. जेव्हा हा विरोध सामुदायिक होतो तेव्हा त्याला #boycott हे नाव देऊन तो विरोध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असा प्रयत्न केला जातो. या विरोधात खूप ताकत असते.

परवा रिलीज झालेल्या सडक २ या सिनेमाचं उदाहरण देता येईल. सुशांत सिंग राजपूत च्या आत्महत्येनंतर भट्ट कॅम्प ला होणारा विरोध आपण सर्वांनी बघितलाच आहे. तो विरोध इतक्या पराकोटीला पोहोचला होता की तो आजपर्यंत सर्वात जास्त Dislikes मिळालेला सिनेमा ठरला.

 

sadak 2 inmarathi 2

 

अर्थात, त्यामध्ये सिनेमाच्या दर्जाने अधिकच भर पडली. सामुदायिक विरोध हा प्रत्येक वेळी यशस्वी ठरतो.

पण, काही व्यक्तींच्या मताला समाजात इतका मान असतो की, त्यांच्या विरोधाला त्यांचे फॅन्स सुद्धा तितकाच सपोर्ट करतात आणि त्यांचं कौतुक सुद्धा करतात.

मुंबई वर २६/११ चा हल्ला झाल्यानंतर भारताचे सन्माननीय उद्योगपती श्री. रतन टाटा यांनी पाकिस्तान कडून आलेली टाटा जीप ची मोठी ऑर्डर नाकारली होती. हा विरोध लोकांना खूप आवडला होता.

बॉलीवूड चा आघाडीचा अभिनेता आमिर खान हा सुद्धा फ्लिमफेअर किंवा कोणत्याही अवॉर्ड ला असलेल्या विरोधामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तो कधीच कोणत्याही अवॉर्ड इव्हेंटला येतच नाही.

त्याबद्दल तो कधी भाष्य सुद्धा करत नाही. कोणत्या तरी कारणावरून हा विरोध असावा असा अंदाज लोक बांधत असतात.

आपल्याकडे काही पुरोगामी साहित्यिक, कलाकार सुद्धा आहेत जे की सरकारचा कोणताही निर्णय आवडला नाही की त्यांना मिळालेला सरकारी पुरस्कार परत करण्याची भाषा करत असतात.

 

award wapsi gang inmarathi
thequint.com

 

तसं करत कोणीच नाही. पण, ट्वीट ट्वीट खेळ हा नेहमी सुरू असतो. कारण, पुरस्कार न घेण्याला किंवा परत करण्याला उच्च कोटी चं कलाप्रेम असावं लागतं. ते म्हणतात ना, ‘Love your Art & not the audience.’

हॉलीवूड मध्ये असा एक कलाकार होऊन गेला आहे ज्याने त्याला घोषित झालेला ऑस्कर पुरस्कार नाकारला होता. होय, हे खरं आहे. कलाकाराचं नाव आहे मार्लन ब्रँडो आणि सिनेमा होता ‘द गॉडफादर’ आणि पुरस्कार होता ‘बेस्ट एक्टर’.

जो मिळवण्यासाठी कलाकार मंडळी आपलं पूर्ण आयुष्य पणाला लावतात. तो अवॉर्ड असो द्या किंवा आपला फिल्मफेअर असू द्या.

बेस्ट एक्टर चा पुरस्कार घोषित झाल्यावर त्या कलाकाराची त्याच्या जागेवरून स्टेजवरच्या निवेदकापर्यंत जाण्याची स्टाईल ही सुद्धा बघण्यासारखी असते. मार्लन ब्रँडो यांनी या सर्व अनमोल क्षणांचा त्याग केला होता.

५ मार्च १९७३ ची ती ऑस्कर अवॉर्ड ची संध्याकाळ बेस्ट एक्टर ला स्टेज वर येऊन पुरस्कार घेताना बघण्यासाठी तरसलेली होती.

४५ व्या अकॅडेमी अवॉर्ड च्या त्या संध्याकाळी मार्लन ब्रँडो यांनी ऑस्कर पुरस्कार नाकारला होता आणि त्यांचा संदेश वाचून सांगण्यासाठी त्यांनी Sacheen Littlefeather या कलाकाराला स्टेजवर पाठवलं होतं.

त्यांनी मार्लन ब्रँडो यांच्या या विरोधाचं कारण सर्वांना सांगितलं होतं. ‘द गॉडफादर’ हा त्या वर्षीचा आणि ऑलटाईम यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे.

 

marlon brando inmarathi
businessinsider.com

 

शिवाय, १९६० च्या दशकात मार्लन ब्रँडो यांचं करिअर हे अवघड परिस्थतीतून जात होतं. ‘द गॉडफादर’ च्या आधीचे तीन चित्रपट बॉक्स ऑफिस वर आदळले होते. त्यानंतर मिळालेल्या ऑस्कर अवॉर्ड ला नाकारणं हे सर्वांसाठी आश्चर्याची गोष्ट होती.

Liv Ullman आणि Roger Moore यांनी मार्लन ब्रँडो यांच बेस्ट एक्टर म्हणून घोषित केले आणि स्टेज वर एक मुलगी येताना दिसली. निवेदकांना वाटलं की, काही कारणास्तव मार्लन ब्रँडो हे येऊ शकत नसतील म्हणून कोणीतरी त्यांच्या वतीने अवॉर्ड घ्यायला आलं आहे.

Roger Moore हे Sacheen Littlefeather यांच्याकडे अवॉर्ड द्यायला गेले. पण, त्यांनी हात दाखवून त्यांचा नकार दर्शवला आणि त्या माईकवरून बोलण्यासाठी डायस जवळ गेल्या.

त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि त्यांनी लोकांना हे सांगितलं,

“आजच्या संध्याकाळी मी मार्लन ब्रँडो यांना reprsent करत आहे. त्यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. आपल्या फिल्म इंडस्ट्री ने अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन (मूळचे अमेरिकन रहिवासी) कलाकारांना दिली जाणारी वागणूक बघून मार्लन ब्रँडो यांनी हा पुरस्कार नाकारला आहे.

आपण जेव्हा त्यांचा स्वीकार करू तेव्हा मला हा अवॉर्ड स्वीकारायला योग्य वाटेल. प्रत्येकवेळी त्यांना फक्त बॅकस्टेज ची कामं देणं हे चुकीचं आहे.”

हे वाक्य बोलून झालं की प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रेक्षकांचा आवाज इतका वाढला की लिटील्फीदर यांनी “Excuse me” म्हणून सुद्धा त्यांना त्यांचं भाषण पूर्ण करता आलं नाही.

 

brando rejects oscar inmarathi
businessinsider.com

 

मार्लन ब्रँडो यांचा पूर्ण संदेश त्यांनी नंतर प्रेस कॉन्फरन्स ला वाचून दाखवला. लिटील्फीदर या अमेरिकेतील महिला आयोगाच्या प्रेसिडेंट होत्या.

Native American च्या अभ्यासक Gilio Whitaker यांनी याबद्दल लिहिलं होतं की –

“त्या वेळी नेटिव्ह अमेरिकन पात्रांचे रोल्स सुद्धा अमेरिकेच्या ‘गोऱ्या’ हिरोंनाच दिले जायचे. अमेरिकेतील ह्या कलाकारांना केवळ दुर्लक्षित केलं जायचं नाही तर त्यांचा अपमान सुद्धा केला जायचा. या गोष्टीचा मार्लन ब्रँडो यांना खूप त्रास होत होता.”

४८ वर्षीय मार्लन ब्रँडो यांचा पूर्ण संदेश दुसऱ्या दिवशी ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ ने प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी अमेरिकेतील नेटिव्ह अमेरिकन लोकांच्या चळवळीचं समर्थन केलं होतं.

“मोशन पिक्चर्स हेच ह्या कलाकारांना दुर्लक्षित करण्यासाठी जवाबदार आहे. ते ह्या कलाकाराला आश्रित म्हणून ट्रीट करतात.

जेव्हा कोणताही अमेरिकेत जन्माला आलेला मुलगा कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याला किती त्रास सहन करावा लागतो याची आपल्यापैकी कोणालाही कल्पना नाहीये.”

मार्लन ब्रँडो यांच्या या भूमिकेचं जगभरातील लोकांनी खूप कौतुक केलं होतं. त्याकाळात सोशल मीडिया नव्हता अन्यथा हा ट्रेंड आणि हा हॅशटॅग किती तरी दिवस फिरला असता यात शंकाच नाही.

 

marlon brando 2 inmarathi
aol.com

 

इतकी संवेदनशील व्यक्ती किती चांगली कलाकार असेल हे आपण समजू शकतो. मार्लन ब्रँडो यांच्या नंतर आजपर्यंत कोणीही ऑस्कर नाकारला नाहीये.

मार्लन ब्रँडो सारख्या कलाकारांच्या विचारामुळे आज किती तरी नेटिव्ह अमेरिकन्स हे तिथे राहून acting मध्ये करिअर करत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?