' महिलांच्या महत्त्वाच्या अडचणीवर सरकारने चांगला तोडगा काढलाय, जाणून घ्या! – InMarathi

महिलांच्या महत्त्वाच्या अडचणीवर सरकारने चांगला तोडगा काढलाय, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा समाजप्रिय आहे. एकमेकांना भेटणं, बोलणं या गोष्टी कायमस्वरूपी आहेत. काम असो अथवा नसो, आपण एकमेकांना भेटत असतोच.

लग्नकार्य, दिवसकार्य अशा प्रसंगी माणसं सर्रास एकमेकांना भेटत. तो पूर्वी पायी प्रवास करत असे. गोष्टीतली म्हातारी तर भोपळ्यातही बसून लेकीच्या गावाला जायची.

दर्यावर्दी तांडेल सिंदबादने तर जहाजातून केलेल्या सात सफरी जगप्रसिद्ध आहेत. उडता  गालिचा वगैरेनी अरेबियन नाईट्स आजही आपल्या मनात कोरल्या आहेत. म्हणजे माणसाला प्रवासाची आवड फार पूर्वीपासून आहे.

 

 

arabian nights inmarathi
youtube.com

 

एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे म्हटले, तर आठवडा प्रवासात जायचा. काशीयात्रा तर अप्राप्यच समजली जायची.

एकदा काशीयात्रेला गेलेला माणूस कितीतरी महिने प्रवास करत काशीला पोचायचा. मजल दर मजल करत परत येईपर्यंत आणखी काही महिने जायचे. कधी-कधी तर परतही यायचा नाही.

मग तो प्राण्यांचा वापर इकडून तिकडे जाण्यासाठी करू लागला. आयुष्य थोडं सुकर होऊ लागलं. घोडे, बैल अशा प्राण्यांवर बसून आपले चालायचे श्रम काही प्रमाणात कमी केले माणसाने.

त्यानंतर माणसाच्या आयुष्यात क्रांती करणारा चाकाचा शोध लागला. मग रथ, बैलगाडी, टांगा करता करता औद्योगिकीकरण होऊन माणसाच्या आयुष्यात बस, रेल्वे यांनी प्रवेश केला.

 

crowded rail station inmarathi
Cookiesound is Travelling

 

माणूस चाकावर धावू, पळू लागला. बसेसच्या मदतीने प्रवास कितीतरी सोपा झाला. मध्यमवर्गीय लोक , नोकरदार लोक सर्रास बसने प्रवास करु लागले.

जवळच्या पल्ल्याचे प्रवास बसने सुकर झाले. पण लांब पल्ल्याच्या प्रवासाला रेल्वे हाच उत्तम पर्याय आहे. कारण रेल्वेत असणारी स्वच्छतागृहांची सोय.

पूर्वी कोठेही सरसकट स्वच्छतागृहे नसायची. मोठ्या बस स्थानकावरच स्वच्छतागृह असायचे, ज्याला स्वच्छतागृह का म्हणावं? अस्वच्छतागृहच ठरेल असं चित्र बहुतांश ठिकाणी असायचं. पण नाईलाजाने तिथं लोक जायचे.

तिथं जाणं लागू नये म्हणून मग पाणी न पिणे, संयम राखणे या गोष्टी आपोआप येतात आणि याचा परिणाम इतर रोगाना आमंत्रण! यासाठी ठिकठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी स्वच्छताग्रहे उपलब्ध असणे आवश्यक, जरूरीचे आहे.

लहान मुले, पुरुष यांची बाहेर कुठेही सोय होऊ शकते, पण स्त्रिया ,तरूण मुलींना या गोष्टीचा फार त्रास सहन करावा लागतो. बस प्रवासात तर कहर असतो.

लोकांची कितीही अडचण होवो चालक आपला थांबा आल्याशिवाय बस थांबवतच नाही. प्रवासात, बाहेर गेल्यावर, आजारपणात, मधुमेही रूग्णांना स्वच्छतागृहे नसतील तर बराच मनःस्ताप भोगावा लागतो. या गोष्टीसाठी सुरक्षित जागा मिळणे गरजेचे असते.

पण आता या स्वच्छतागृहांची जागा सुलभ शौचालयांनी घेतली आहे. आता मोठ्या शहरात, बस स्थानकात ती दिसू लागली आहेत.

कोविडचा काळ जगाचं शटर बंद करणारा ठरला. अनेक व्यवसाय थांबले, बंद झाले. कुणीतरी त्यातूनही नवीन संकल्पना मांडत काही अभिनव उपक्रम राबवले.

 

corona inmarathi 2
deccanherald.com

 

या काळातच अनेक अनोख्या गोष्टी समजल्या. आपण काय करु शकतो, कुठं काटकसर करत समाधान मानू शकतो हे या लाॅक डाऊन काळात माणसाला फार चांगल्या पद्धतीने समजलं.

कर्नाटक सरकारनेही एक अफलातून कल्पना राबवली आणि ती सत्यात साकारली.

शाळा बंद असल्या तरी शिक्षक ऑनलाइन शाळा, शिकवू लागले आहेत. बंगलोरमध्ये पोटापाण्यासाठी, उपजीविकेसाठी अनेक मजूर येतात. पण स्वच्छतागृहांचा तुटवडा ही अडचण सरकारसमोर होतीच.

ही अडचण स्त्रीयांनाच जास्त प्रमाणात येते. पुरुष कुठेही जाऊन आपला कार्यभाग उरकू शकतात.

अचानक एक कल्पना सुचली, ज्या बसेसची आयुर्मर्यादा संपली होती, त्या बसेसचा स्वच्छतागृह म्हणून तयार करुन लोकांना वापरायला द्यायची.

 

ladies toilet in bus inmarathi
zorins.tv

 

सरकारने या बसेसचा पुनर्वापर करताना या प्रकल्पाला नांवच दिलं स्त्री टाॅयलेट.

स्त्रीयांना प्रवासात कुठंही असा लाजिरवाणा प्रसंग येऊ नये म्हणून सरकारने ही कल्पना राबवली. या बसमध्ये तीन भारतीय पद्धतीने तर दोन कमोड संडास बसवले आहेत.

याशिवाय सॅनिटरी नॅपकिन, वापरलेले नॅपकिन जाळायची सोय हे सारं तिथं आहे. सोलर पॅनल बसवून ही बस वापरण्यायोग्य केली आहे. ही किती मोठी सोय आहे बघा. अशा प्रसंगी महिलांना येणाऱ्या ओंगळ आणि लाजिरवाण्या भावनेचा त्रास वाटू नये म्हणून ही घेतलेली काळजीच!!!

 

ladies toilet in bus inmarathi1
indiatoday.in

 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। अर्थात जिथं स्त्रीची पूजा होते तिथं देवता वास करतात.

स्त्रीयांना असंही देवता म्हणून मखरात बसायची हौस नसते. त्यांना किमान माणूस म्हणून जगताना मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरी सन्मान वाटतो. आणि कर्नाटक सरकारने तो केला आहे असं नक्कीच म्हणता येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?