' आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स – InMarathi

आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोविड १९ नं २०२० साल गिळंकृत केलंय. बसेस, रेल्वे, खाजगी वाहतुक सेवा बंद होत्या. विमानसेवा ठप्प होती. आता अंशतः हळू हळू सगळं चालू होतंय.

अख्ख्या जगाला वेठीला धरुन कोविड हा राक्षस जगभर थैमान घालत आहे. एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाली, की माणूस प्रथम गांगरतो. कासव जसं सगळं अंग आकसून घेतं तसा माणूसही प्रथम आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत राहतो.

हळूहळू ती गंभीर परिस्थिती निवळली, की आकसलेलं अंग बाहेर काढून कासव जसं आपली चाल चालू लागतं माणूसही तसाच आपला जीवनक्रम सुरू ठेवतो.

पण यावेळी आलेलं जागतिक संकट फार फार मोठं आहे. लाॅक डाऊन केल्यामुळे लोक घरातच बसून होते. आॅफीसेस बंद होती. कारखानेही बंद होते. दळणवळणाची साधने बंद होती.

 

corona lockdown inmarathi
npnews24.com

बाहेर पडावं तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका. घरी रहावं तर उपजिविकेचा प्रश्न. अशा विचित्र कात्रीत माणसांची आयुष्यं सापडली आहेत.

मनोरंजनासाठी असलेली थिएटर्स, हाॅटेल्स, आणि माॅल्स बंद आहेत. सुरुवातीला दोन महिन्यांत हे संकट टळेल असं वाटत होतं. पण आज सहा महिने झाले, तरी या कोरोनानं जगाचं बंद केलेलं शटर किलकिलं केलं आहे.

ई-पास ची अट सरकारने बंद केली आहे. बसेस, खाजगी वाहने चालू होतील. थोड्या दिवसांनी विमानसेवा सुरळीत सुरू होईल, पण या विमान प्रवासात आता आधी सारखा बिनधास्तपणा करुन चालणार नाही.

आता नवे नियम बनवून आपल्याला आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊनच हे प्रवास करावे लागतील. सॅनिटायझर, हँडवाॅश हे सगे सोयरे आहेत त्यांना सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडताच येणार नाही आहे.

 

after lockdown inmarathi

 

मग हा प्रवास करताना घ्यायच्या खबरदारीच्या उपायांची माहिती आपल्या वाचकांसाठी!!!

 

१. सोबत अत्यावश्यक सामान ठेवा-

 

sanitizer inmarathi 1
insider.com

 

 

पूर्वी प्रवासात आपण फार फार तर फेसवाॅश- ओले टिश्यूपेपर ठेवत होतो, पण आता प्रवास करताना सॅनिटायझर- हँडवाॅश हे आठवणीनं बॅगेत ठेवा.

त्याचबरोबरीने वापरलेले ओले टिश्यूपेपर, तोंडाला लावायचा मास्क यांची योग्य विल्हेवाट लावा.

 

२. कशालाही स्पर्श करताना काळजी घ्या-

 

corona prevention inmarathi
youtube.com

 

कोविडचा फैलाव स्पर्शातून जास्त प्रमाणात होतो. म्हणूनच प्रवासात असताना कुठेही हात ठेवताना विचार करा. मोबाईल, लॅपटॉप, चार्जर, पाॅवर बँक एटीएम कार्ड हे सारं हाताळताना काळजीपूर्वक हाताळा.

कुठल्याही पृष्ठभागावर निष्काळजीपणा करुन हात ठेवू नका.

यातला सगळ्यात मोठा भाग असा, की कोविड संसर्गाचा वाहक कोण आहे हे माहीत पडत नाही. त्यामुळं स्वयंचलित जिने, लिफ्ट यातून जाताना सांभाळून जा. जाणिवपूर्वक सॅनिटायझर लावून हात स्वच्छ ठेवा.

तुमचं पाकीट, मोबाईल हे सतत हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोडतात. त्या बॅगेतच ठेवा. गरज पडली, तर ओल्या टिश्यूपेपरनी पुसून घ्या, मगच वापरा.

 

३. लोकसंपर्क कमीत कमी ठेवा-

 

corona patient inmarathi
deccanherald.com

 

गर्दी हे कोविडचं आवडतं खाद्य आहे. गर्दीत कोविड फार लवकर सक्रीय होतो आणि साथ जोरात पसरते.

जिथं गर्दी टाळणं शक्य असेल, तिथं जाणं टाळाच. हस्तांदोलन टाळा. एकमेकांपासून सहा फूट अंतरावर रहा.

 

५. खिडकीपाशी बसा-

 

swades shahrukh window scene inmarathi

 

हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुणाच्याही जवळपास न बसता खिडकीशी बसा.

समजा एखादा कोविडचा संसर्ग झालेला रुग्ण असेल, तर त्याच्यापासून दूर राहील्यास अप्रत्यक्ष परिणाम होऊन कोविडचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय आपले हात सॅनिटायझर वापरून निर्जंतुक करा.

 

६. आजूबाजूला सॅनिटायझर वापरून पुसून घ्या-

विमानातील सीट्स या अतिशय जवळ जवळ असतात. त्यामुळे जागा मिळाली, की बाजूला असलेलं‌ हँडल ज्यावर तुम्ही हात ठेवून बसता ते, पुढे असलेल्या खुर्चीची पाठ, चहा काॅफीसाठी असणारे टेबल, आपल्या खुर्चीची पाठ सारं सॅनिटायझर वापरून स्वच्छ निर्जंतुक करा आणि मगच बसा.

७. अस्वच्छ/ खूप दिवस साठवलेलं पाणी पिऊ नका-

 

bottled-water inmarathi

 

विमानातील सर्व प्रवाशांना छोट्या छोट्या बाटल्यांतून पाणी दिले जाते, पण आता ते पाणी पिऊ नका. कारण विमानातील टाकीतील हे पाणी असते, त्या सारख्या स्वच्छ केलेल्या नसतात.

चहा कॉफी घेतली, तर चालते कारण ती उकळल्यामुळे जंतू जगणं अशक्य असतं.

 

८. आजारी असाल तर प्रवास टाळा-

 

unwell woman inmarathi
therightmoves. com

 

घरासारखी उबदार आणि सुरक्षित जागा जगात दुसरीकडं कुठंही नाही. त्यामुळं जर तुम्हाला बरं वाटतं नसेल, तर विमानाचाच नव्हे तर कुठलाही प्रवास टाळा. घरी रहा सुरक्षित रहा.

 

९. थर्मल टेस्टींग करा-

 

corona temprature inmarathi
thehindu.com

 

विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर प्रत्येक प्रवाशाचं तापमान, आॅक्सिजन लेव्हल हे तपासण्यासाठी सोय केलेली आहे. ती केल्याशिवाय प्रवासाला सुरुवात करुच नका.

 

१०. जबाबदार नागरिक म्हणून वागा-

 

corona home test kit inmarathi 3
businessstandard.com

 

आपली एखादी चूक आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना संकटात टाकू शकते म्हणून असं‌ कोणतंही कृत्य करु नका.

माहिती लपवणे, सॅनिटायझर हँडवाॅश न वापरणे, चेहऱ्यावर मास्क न लावणे असे करू नका.

तुम्हाला कोविडची लक्षणं आहेत असं वाटलं, तर तत्काळ डाॅक्टरांशी संपर्क साधा. अंगावर काढलेलं दुखणं खूपदा जीवावर बेतू शकतं.

लाॅक डाऊन शिथिल केलं असलं, तरीही कोरोना अजून संपलेला नाही. आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे हे लक्षात ठेवून या सूचना पाळा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?