'विमानतळाच्या धावपट्टीमधूनच जातोय हाय-वे; वाहनं आणि विमानं एकत्रच? कसं बरं?

विमानतळाच्या धावपट्टीमधूनच जातोय हाय-वे; वाहनं आणि विमानं एकत्रच? कसं बरं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात अनेक आश्चर्ये आहेत. काही निसर्गनिर्मित आहेत, तर काही मानवनिर्मित आहेत. काही अद्भूत आणि चमत्कारिक वाटाव्या अशाही अनेक गोष्टी विविध देशांत अस्तित्त्वात आहेत.

उदाहरणार्थ, जपानच्या समुद्रकिनाऱ्यालगत एखाद्या बेटाप्रमाणे बांधलेलं विमानतळ, अमेरिकेत वाळवंटीय प्रदेशांतून मैलोनमैल बांधलेले गुळगुळीत डांबराचे रस्ते, मंगोलियाच्या वाळवंटातून जाणारा रेल्वे मार्ग जो ट्रान्स-सैबेरियन रेल्वे मार्गाचा एक भाग आहे, इंग्लंड-फ्रान्सला इंग्लिश खाडीखालून जोडणारा अत्यंत वेगवान असा रेल्वे मार्ग इ. अशी बरीच उदाहरणे पाहता येतील.

 

floating airport inmarathi
tripsavvy.com

 

अगदी भारतातही आता अशी अद्भूत आणि टेक्नॉलॉजीची कमाल म्हणावे असे रस्ते, बोगदे, ब्रीज दिसू लागले आहेत.

मात्र काही वेळा दुसरा पर्यायच नाही किंवा तातडीची गरज म्हणून काही वेगळेच पर्याय निवडलेले दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीला क्रॉस करुन जाणारा हाय-वे..!

हा हायवे रेल्वेफाटकाप्रमाणे विमान उतरण्याच्या आणि उड्डाणाच्या वेळी चक्क वाहतुकीला बंद केला जातो.

मंडळी ऐकून आश्चर्य वाटले ना.. आणि थोडे गमतीशीरही.. पण ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला माहित आहे का असा रन-वे कुठे आहे ते…. तर तो आहे जिब्राल्टर या अगदी छोट्याशा ब्रिटिश राज्यामध्ये.

 

highway and runway inmarathi1
dailymail.co.uk

 

स्पेन देशाच्या अगदी दक्षिण टोकाला ब्रिटिशांची एक छोटीसी वसाहत आजही आहे. त्याचे नाव आहे जिब्राल्टर. त्याच्या अगदी खालोखाल अफ्रिका खंडाच्या पश्चिमोत्तर भागात असलेल्या मोरक्को देशाची उत्तर सीमा भीडते. त्या भागाला जिब्राल्टरची सामुद्रधुनी म्हणून ओळखले जाते.

याच जिब्राल्टरमध्ये शहरातील मुख्य ४ लेन हाय-वेला छेदून जाणारा हा जिब्राल्टरचा आंतरराष्ट्रीय रन-वे आहे.

मग प्रश्न असा पडतो, की रन-वे आणि हाय-वे एकमेकांना काटकोनात छेदून का बांधले आहेत…. त्याची काही मुख्य कारणे पुढीलप्रमाणे — 

टोपोग्राफी

 

highway and runway inmarathi2
euroweeklynews.com

 

स्पेनच्या अगदी दक्षिण टोकाला वसलेल्या जिब्राल्टरचे क्षेत्रफळ केवळ २.६ चौरस मैल इतकेच आहे. इबेरियन पेनिन्सुलाच्या अति दक्षिणेकडील टोकावर विस्तृत असा रॉकी किंवा खडकाळ प्रदेश पसरलेला आहे.

स्पेनच्या वालुकामय प्रदेशापासून जिब्राल्टरच्या दक्षिणेकडील खडकाळ प्रदेश जोडणारा एकमेव हाय-वे म्हणजेच चार लेनचा प्रशस्त विन्स्टन चर्चिल रस्ता फार पूर्वीपासून अस्तित्त्वात आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे येथील वाऱ्याची दिशा. जिब्राल्टरच्या उत्तर आणि दक्षिण दोन्हीकडे पर्वतीय प्रदेश असल्याने वारा केवळ पूर्व-पश्चिम वाहू शकतो.

 

पूर्व-पश्चिम धावपट्टीला पर्याय नाही

 

highway and runway inmarathi
charismaticplanet.com

 

उत्तरेला स्पेनमधील पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वतरांगा आणि दक्षिणेला मोरोक्कोतील अँटलास पर्वतरांगा यांच्यामधून वारा पूर्व पश्चिम वाहतो. तसेच जिब्राल्टर बेटाच्या दक्षिण टोकावरील उंच खडकाळ प्रदेशामुळे उत्तर-दक्षिण वारा वाहण्यास अडथळा आहे.

त्यामुळे येथील धावपट्टीची दिशा बदलणे केवळ अशक्य. ही धावपट्टी पूर्व-पश्चिमच योग्य आहे. ती पूर्वीच बांधली आहे.

 

युद्धादरम्यान धावपट्टीची गरज, वाढते टुरिझम आणि व्यापार

 

highway and runway inmarathi3
reddit.com

 

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जलद गतीने रसद पोहोचवण्यासाठी ब्रिटिशांनी हे विमानतळ बांधलं. पुढे व्यापारासाठी याचा वापर केला जाऊ लागला.

नंतरच्या काळात जसे टुरिझम वाढू लागले, तसे स्पेनसोबत थेट जोडले जाण्यासाठी रस्ता बांधण्यात आला. बदलत्या काळानुसार त्याचे चौपदरीकरण केले गेले.

नजीकच्या काळात जसे जिब्राल्टरमध्ये टुरीझम वाढू लागले, तसे तेथील सर्वच पायाभूत सुविधांवर ताण येऊ लागला. त्यातून हाच मुख्य रस्ता चौपदरी करण्यात आला.

दुसरीकडे येथील टोपोग्राफिक मर्यादांमुळे विमानतळाचा विस्तार होण्यावर अनेक बंधने आहेत.

रस्ता आणि धावपट्टीचे संचालन कसे केले जाते….?

 

highway and runway inmarathi4
amusingplanet.com

 

सुरुवातीच्या काळात दिवसभरात यु.के मधून जिब्राल्टरला केवळ ११ ते १४ विमाने ये-जा करत असत. जसे टुरिझम आणि तेथील बंदरविकासामुळे व्यापार वाढीस लागला तशी विमानांची संख्या वाढली.

ज्यावेळी विमान उड्डाणास सज्ज असते, त्या प्रत्येक वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूचं ट्रॅफिक थांबवलं जातं.

तसेच विमान धावपट्टीवर उतरते, त्याच्या आधी रस्ता दोन्ही बाजूंनी बंद करुन मगच विमानाला लँडिंग क्लिअरन्स दिला जातो. याचे संचलन एअर ट्रॅफिक कंट्रोल रुममधून केले जाते.

सुरुवातीच्या काळात दिवसभरात असे फार कमी वेळा केले जायचे कारण विमानांची संख्या कमी होती, मात्र गेल्या काही वर्षात वाढत्या टुरिझम आणि कार्गो सेवांमुळे अनेकदा हा रस्ता बंद करावा लागतो.

बरेचदा सलग ५ ते ६ विमानांचे लँडिंग आणि उड्डाण होते, त्यामुळे ३० ते ४५ मिनिटांपर्यंत हा मुख्य रस्ता बंद राहतो. यामुळे प्रचंड ट्रॅफिकच्या समस्येसोबतच लोकांचा नाहक वेळ वाया जातो.

अंडरग्राऊंड बोगदा खोदण्याचा उपाय

या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी धावपट्टीच्या खाली मोठा बोगदा खणून त्यातून हा हाय-वे नेण्याचा उपाय योजण्याबाबत तेथील सरकारचा विचार आहे.

जेणेकरुन विमानवाहतूक आणि रस्त्यावरील वाहनांना एकमेकांचा अडथळा होणार नाही. नागरिकांच्या वेळेचीही बचत होईल.

एका वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे टळलेली मोठी दुर्घटना

 

highway and runway inmarathi5
planetacurioso.com

 

एक प्रायव्हेट जेट विमान जिब्राल्टरकडे झेपावत असताना लँडिंग सिग्नल मिळाल्याने वैमानिकाने उतरण्याची तयारी केली. जवळपास उतरणारच इतक्यात त्याच्या लक्षात आले, की धावपट्टीवरुन वाहनांची वर्दळ सुरुच आहे.

वैमानिकाने तातडीने प्रसंगावधान राखत विमान तत्काळ हवेत वर नेले आणि मोठा अपघात टळला. नंतर जेव्हा याबाबत त्याने अधिक माहिती दिली, त्यानुसार विमानाला लँडिंग सिग्नल देऊनही एअर ट्रॅफिक कंट्रोलने हाय-वे बंदच केला नव्हता.

जर विमान तसेच उतरले असते, तर मोठी दुर्घटना अटळ होती. मात्र वैमानिक अनुभवी असल्याने ती टळली.

त्यामुळे जोपर्यंत धावपट्टीखाली बोगदा खणून, मुख्य रस्त्याला पर्याय दिला जात नाही तोवर प्रत्येक उड्डाण आणि विमान उतरताना रस्ता दोन्हीकडे बंद करावाच लागणार आणि ट्रॅफिक वाढून नाहक वेळही जाणार.

यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी इथल्या सर्वांचीच अपेक्षा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?