' सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम! – InMarathi

सचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

क्रिकेट म्हंटलं आपण भारतीयांना सचिनचं नाव आठवल्या शिवाय राहणार नाही. क्रिकेट चा हा एकमेव देव आहे ज्याने मान सुद्धा कमावला आणि लोकांच्या मनात एक अढळ स्थान सुद्धा निर्माण केलं आहे.

९० च्या काळात ज्यांनी क्रिकेट बघितलं आहे त्यांना आज ही तो ‘सचिन… सचिन’ हा मैदानावर होणारा आवाज आठवतोच. सर्वात जास्त शतक असणारा, कमी वयात सर्वात जास्त वन डे मॅच खेळणारा तो एकमेव विक्रमादित्य – सचिन.

 

sachin tendulkar inmarathi.jpg1
crictracker.com

 

आपल्या लहानपणापासून तो फक्त एकच स्वप्न उराशी ठेवून जगला की भारताने वर्ल्ड कप जिंकला पाहिजे आणि ते त्याने करून दाखवलंच. एकवेळी अशक्य वाटणारं हे लक्ष्य त्याने गाठलं आणि ‘कोशीष कर ने वालो की, हार नही होती..’ हे भारतीयांना शिकवलं.

वन डे असो किंवा टेस्ट क्रिकेट किंवा IPL सगळ्या फॉरमॅट मध्ये त्याने स्वतःला खेळाच्या गरजेनुसार बदललं आणि विजयाची चव चाखल्या शिवाय कोणतंही मैदान सोडलं नाही.

सचिन बद्दल लिहावं तेवढं कमी आहे, कारण त्याने त्याच्या स्टाईल ने फक्त स्वतःची नाही तर क्रिकेटची आवड जगभरात वाढवली.

आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन च्या नावावर अजून एक पराक्रम आहे. तो म्हणजे, वन डे क्रिकेट फॉरमॅट मध्ये एका सामन्यात व्यक्तिगत स्कोर हा पहिल्यांदा २०० रन्स पेक्षा पुढे नेऊन ठेवण्याचा.

कमाल आहे ना.. ज्या सामन्यात एका इनिंग मध्ये ५० ओव्हर म्हणजे एकूण ३०० बॉल्स असतात त्या फॉरमॅट मध्ये एका खेळाडूने २०० रन्स करणं ह्याचा या आधी कोणी विचार पण केला नसेल.

२४ फेब्रुवारी २०१० चा तो दिवस सर्व भारतीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनावर कोरला गेला आहे जेव्हा सचिन ने ग्वाल्हेर मध्ये दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य बॉलिंग आणि चपळ फिल्डिंग लाईन समोर खेळताना १४७ बॉल्स मध्ये २०० रन्स स्कोर केले होते.

 

sachin 200 inmarathi
india.com

 

त्यावेळी टॉप फॉर्म मध्ये असलेला बॉलर डेल स्टेन, जॅक कॅलिस सारखे बॉलर सुद्धा सचिन च्या बॅटिंग समोर हतबल दिसत होते.

तुम्हाला एक गोष्ट कदाचित माहीत नसेल की, वन डे क्रिकेट मध्ये एका खेळाडू ने २०० रन्स करण्याची ही पहिली वेळ नव्हती. हा पराक्रम १९९७ मध्ये म्हणजे सचिन च्या २०० रन्स करण्याच्या १३ वर्ष आधी हा रेकॉर्ड एका खेळाडूच्या नावावर आहे.

“काहीही फेकताय. मी स्वतः ती मॅच बघितली आहे आणि गुगल सुद्धा सचिन च्या नावावर हा रेकॉर्ड दाखवतोय. तुम्ही कोणाबद्दल बोलताय ?” हेच तुम्हाला वाटत असणार.

बेलिंडा जेन क्लार्क या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटू ने हा पराक्रम १६ डिसेंबर १९९७ रोजी मुंबई मध्ये केल्याची नोंद आहे. ती मॅच महिला क्रिकेट वर्ल्ड कपची होती.

ऑस्ट्रेलिया संघासमोर नवखा डेन्मार्क संघ खेळत होता.

त्या मॅच मध्ये ही संधी साधून बेलिंडा जेन क्लार्क ने केवळ १५५ बॉल्स मध्ये नाबाद २२९ रन्स ची खेळी केली होती आणि ऑस्ट्रेलिया ला पहिली बॅटिंग करताना ४१२ रन्स चा डोंगर रचण्यास सिंहाचा वाटा उचलला होता.

 

belinda clarke inmarathi
cricketcountry.com

 

आपल्याला वाटू शकतं की, महिला क्रिकेट मध्ये काहीही घडू शकतं. पण, तसं नाहीये. २०० रन्स हे कोणत्याही फॉरमॅट मध्ये अवघडच आहे. कारण, एक बॅट्समन हा कोणत्याही बॉल ला आउट होऊ शकतो.

बॉलर ने एखादी ओव्हर खराब जरी केली तरी त्याला पुन्हा चान्स मिळत असतो. तो चान्स बॅट्समन ला मिळत नसतो. शिवाय, ती एक ऑस्ट्रेलियन खेळाडू होती जी की भारतात येऊन मुंबई मध्ये खेळत होती.

तिला त्या पिच चा फारसा अभ्यास नव्हता कारण ती वर्ल्डकप च्या किती तरी होणाऱ्या साखळी सामन्यापैकी एक मॅच होती. अजून एक फरक म्हणजे, इंग्लिश खेळाडूंना भारतीय तापमानाचा होणारा त्रास.

त्यात नाबाद राहून पूर्ण इनिंग बॅटिंग करणं यात त्या खेळाडूच्या बॅटिंग टेक्निक आणि स्टॅमिना चं खरंच कौतुक आहे.

बेलिंडा क्लार्क यांनी मॅच नंतर च्या मुलाखतीत सांगितलं की,

“आमचं पहिलं टार्गेट पूर्ण ५० ओवर खेळण्याचं होतं. कारण, तसं केल्याने मला भारतीय वातावरणाची सवय होणार होती. आम्ही कोणतंही टार्गेट ठेवलं नव्हतं, फक्त आलेला बॉल हीट करत होतो.”

त्या मॅच चे अंपायर मदन सिंग यांनी सुद्धा बेलिंडा क्लार्क च्या या इनिंग चं या शब्दात कौतुक केलं की –

“ही मार्व्हलस इनिंग होती. ती सगळे क्रिकेटिंग शॉट्स खेळत होती. मॅच संपल्यानंतर मी डेन्मार्क च्या काही खेळाडूंशी सुद्धा बोललो आणि त्यांना सांगितलं की, वाईट वाटून घेऊ नका.

आजचा दिवस बेलिंडा क्लार्क चा होता. ग्राऊंड थोडं छोटं होतं. पण, तिचे जास्तीत जास्त रन्स हे सिंगल – डबल्स ने आलेले आहेत. “

 

belinda clarke 2 inmarathi
zeenews.india.com

 

४१२ या धावसंख्येचा पाठलाग करताना डेन्मार्क चा पूर्ण संघ केवळ ४९ रन्स करून बाद झाला जे की, बेलिंडा क्लार्क च्या स्कोर च्या स्कोरच्या एक पंचमांश इतकं कमी होतं.

२२९ रन्स करताना बेलिंडा क्लार्क हिने २२ चौकार मारले होते आणि पार्टनर सोबत शंभर पेक्षा जास्त रन्स ची पार्टनरशीप केली होती ज्यामध्ये लिसा (६०) आणि कारेन (६४) याचा समावेश होता.

बेलिंडा क्लार्क ने त्या वर्ल्डकप च्या फायनल मध्ये न्यूझीलंड विरुद्ध ५२ रन्स स्कोर केले होते आणि ऑस्ट्रेलिया ला तो वर्ल्डकप जिंकून दिला होता. फायनल मॅच हा कोलकत्ता च्या ईडन गार्डन्स इथे होता ज्याला की ८०,००० प्रेक्षक हजर होते.

बेलिंडा क्लार्क बद्दल बोलताना नेहमी असं बोललं जातं की, ऑस्ट्रेलिया च्या पुरुष कप्तान जसे की ग्रेग चॅपल, ऍलन बॉर्डर, स्टिव्ह वॉ हे इतके ग्रेट होते की त्यांच्या समोर बेलिंडा क्लार्क हिची १९९१ ते २००५ इतकी सुवर्ण कारकीर्द झाकोळली गेली.

२ महिला वर्ल्डकप मध्ये बेलिंडा क्लार्क ने ऑस्ट्रेलिया चं नेतृत्व केलं आणि दोन्ही ऑस्ट्रेलिया ने जिंकले होते.

१९९८ मध्ये बेलिंडा क्लार्क यांना Wisden Australia Cricketer या किताबाने गौरवण्यात आलं होतं. २०११ मध्ये बेलिंडा क्लार्क यांना ICC Hall of Fame मध्ये स्थान देण्यात आलं होतं.

२००० साली बेलिंडा क्लार्क यांना Order of Australia (AM) म्हणून सुद्धा नेमण्यात आलं होतं. त्यांचा रोल हा महिला क्रिकेट ला प्रतिसाद वाढवणे असा होता. निवृत्ती आधी त्यांनी ऑस्ट्रेलिया वुमन क्रिकेट च्या CEO म्हणून सुद्धा कारभार बघितला होता.

बेलिंडा क्लार्क यांच्या इतर कोणत्याही achievement पेक्षा मुंबईत स्कोर केलेले २२९ रन्स हे कायम हायलाईट होतील यात शंका नाही. हा रेकॉर्ड अजून खूप वर्ष त्यांच्या नावावर असेल असे क्रिकेटचे तज्ञ सांगतात.

 

belinda clearke featured inmarathi
sbs.com.au

 

ऑस्ट्रेलियाच्याच पुरुष खेळाडूंसमोर बेलिंडा क्लार्क यांच्या करिअरचा ऑस्ट्रेलियाच्या लोकांना आणि मीडिया ला विसर पडला हे मात्र बरोबर म्हणता येईल.

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग सारख्या खेळाडूंसोबत आपल्या २०० रन्स चा रेकॉर्ड असणं या गोष्टीला बेलिंडा क्लार्क खूप स्पेशल समजतात आणि सांगतात की,

“सचिन तेंडुलकर यांनी जेव्हा २०० रन्स केले तेव्हा मला खूप आनंद झाला. त्यानंतर सेहवाग ने सुद्धा हा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला, हे सुद्धा मला खूप आवडलं आणि क्रिकेट ची प्रगती होत आहे ही माझ्यासाठी फार समाधानाची बाब आहे.”

“सचिन तेंडुलकर या क्रिकेट च्या ग्रेट खेळाडू च्या आसपास जरी आपलं नाव असेल तर कोणालाही ते धन्य वटण्यासारखं आहे. मला ही तेच वाटतं.” असं बेलिंडा क्लार्क नेहमी सांगतात.

खेळाडू येतात आणि आपला बेस्ट खेळ सादर करून निवृत्त होतात. पण, सचिन तेंडुलकर आणि बेलिंडा क्लार्क यांच्यासारखे खेळाडू स्वतःपेक्षा त्या खेळाला खूप काही देऊन जातात आणि त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.

आपण त्यांच्याकडून त्यांची मेहनतीची तयारी, शिस्त आणि सातत्य हे नक्की शिकायला पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?