' 'हार्डकोर गेमिंग फॅन्स' साठी हे वर्ष एकदम खास का आहे, जाणून घ्या!

‘हार्डकोर गेमिंग फॅन्स’ साठी हे वर्ष एकदम खास का आहे, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

विडिओ गेम्स हे आजकालच्या लहान मुलांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. मागच्या काही महिन्यांपासून तर गेम्स चा वापर फारच वाढला आहे.

कोरोना चा प्रादुर्भाव जसा वाढत होता तसा लोकांना घरात बसून मुलांना engage ठेवण्यासाठी विडिओ गेम्स ची मदत ही जवळपास प्रत्येकाला घ्यावीच लागली.

मागच्या सहा महिन्यात जेव्हा इतर गोष्टींसाठी मार्केट थंड होतं तेव्हा विडिओ गेम्स तयार करणाऱ्या, वेबसिरीज किंवा YouTube वर कार्टून चॅनल चालवणाऱ्या व्यक्तींकडे प्रचंड काम होतं.

 

video gaming inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

कारण, वाढत्या मागणीला पुरवठा करणं त्यांना गरजेचं होतं. त्याच बरोबर त्यांना त्यांच्या कामाचा दर्जा वाढवणं आणि सतत काही तरी नवीन देणं हे एक आव्हान होतं. काही नवीन नसेल तर लहान मुलं लगेच त्या विडिओ गेम ला कंटाळतात.

इतकंच नाही तर विडिओ गेम खेळत असतांना काही व्यत्यय आल्यास रडायला सुद्धा सुरुवात करतात. त्यावेळी पालकांची खरी परीक्षा असते.

एक गोष्ट लक्षात येते की, लहान मुलांच्या गरजेची ही गोष्ट एका मोठ्या इंडस्ट्री आणि स्पर्धेचा भाग आहे. या स्पर्धेचे दोन मोठे खेळाडू आहेत सोनी कंपनी आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी.

सोनी कंपनी चं Play Station आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी चा XBOX हे दोन प्रॉडकट्स कित्येक वर्षांपासून समोरासमोर आहेत. दोन्ही device चे कित्येक वर्जन या मागच्या २० वर्षांपासून बाजारात आहेत.

२०२० मध्ये सोनी कंपनी प्ले स्टेशन 5  लाँच करत आहे तर मायक्रोसॉफ्ट कडून XBox Series X ह लाँच करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

 

ps 5 x box x inmarathi
theglobalherald.com

 

कधी फार जास्त विडिओ गेम न खेळणाऱ्या व्यक्तीसाठी प्रत्येक विडिओ गेम हा सारखाच वाटत असतो. पण, जसं दिसतं तसं नसतं.

यावर्षी ‘गेमिंग कंसोल’ हे एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. काय आहे हे गेमिंग कंसोल? जाणून घेऊयात.

गेमिंग कंसोल म्हणजे गेम सुरू करण्यासाठी लागणार सीडी प्लेअर सारखं एक हार्डवेअर device.

आपल्या लहानपणी आपण सुपर मारिओ ब्रदर्स वगैरे गेम्स खेळले असतील. प्लास्टिक ची एक छोटीशी कॅसेट असायची. ती त्या काळात निटेंडो ही कंपनी तयार करायची.

त्या गेमिंग कंसोल मध्ये मारिओ सारखे किती तरी गेम्स लागायचे. पण, आपल्या लक्षात तो लाल विटांवरून चालणारा, टोपी घातलेला मारिओच आहे. त्याच्या प्रत्येक जंप ला एक ठराविक आवाज देण्यात आला होता. तो सुद्धा कदाचित तुमच्या कानात घुमत असेल.

१९९५ च्या आसपास सेगा या कंपनीने Sega Saturn या नावाने एक गेमिंग कंसोल लाँच केला होता. हा गेमिंग कंसोल सुद्धा खूप लोकप्रिय झाला होता. या गेमिंग कंसोल मध्ये सेनीक, वर्चुआ फायटर आणि टायनी टून्ज या नावाचे गेम्स असायचे.

याच वेळेस सोनी कंपनी चा PS1 वर टेक्केन आणि क्रॅश बंडीकोट सारखे गेम्स लोकप्रिय होत होते आणि XBox या गेमिंग कंसोल पेक्षा हेलो 2 हा गेमिंग कंसोल जास्त लोकप्रिय झाला होता.

गेम म्हणजे गेम असतो त्यात कोणताही गेमिंग कंसोल असला तरीही काय फरक पडतो? जाणून घेऊयात.

जसे सगळे स्मार्टफोन एकसारखे दिसत असतात, पण त्यांच्यात खूप फरक असतो. तसंच, वेगवेगळ्या गेमिंग कंसोल मध्ये स्पेसिफिकेशन्स चा फरक असतो. गेमिंग कंसोल मध्ये सुद्धा फोन प्रमाणेच RAM आणि CPU असते आणि स्क्रीन रेसोल्युशन हे सुद्धा असतात.

 

gaming console inmarathhi
nytimes.com

 

प्रत्येक गेमिंग कंसोल मध्ये आपलं एक वैशिष्ट्य असतं. प्रत्येक गेमिंग कंसोल चा उद्देश हा इतरांपेक्षा जास्त चांगले ग्राफिक्स आणि पॉवर कॅपेसिटी हा असतो.

गेम्स तयार करणाऱ्या कंपनी या कंसोलला योग्य असे गेम्स डिझाईन करत असतात. जसे की अँड्रॉइड फोन वेगळे आणि आयफोन वेगळे. तसंच काही कंपनी अश्या स्पेक्स चे गेम्स तयार करतात जे की फक्त त्यांच्याच गेमिंग कंसोल वर चालतात.

तर काही कंपनी असे गेम्स तयार करतात जे की कोणत्याही गेमिंग कंसोल वर खेळले जाऊ शकतात. याची काही उदाहरणं सांगायची तर, स्पायडरमॅन चा लेटेस्ट गेम हा फक्त PS4 वर उपलब्ध आहे.

म्हणजे हा गेम खेळण्यासाठी तुमच्याकडे PS4 हा गेमिंग कंसोल असणं आवश्यक आहे.

सध्याचा सर्वात लोकप्रिय PUBG आणि फोर्टनाईट हे विडिओ गेम प्ले स्टेशन, XBox, अँड्रॉइड, IOS आणि कम्पुटर या सर्वांना डोळ्या समोर ठेवून बनवण्यात आले आहेत. कोणत्याही प्लॅटफॉर्म वर गेम खेळले जाऊ शकतात. कदाचित, हे सुद्धा त्यांच्या लोकप्रिय होण्या मागचं एक कारण असेल.

 

pubg inmarathi
businessinsider.com

 

सोनी कंपनी चा पहिला Play Station हा १९९४-९५ मध्ये लाँच झाला होता. वर्ष २००० मध्ये त्याचं स्लिम वर्जन हे लाँच करण्यात आलं होतं. ज्याला की PS1 हे नाव देण्यात आलं होतं.

त्याच वेळी PS2 सुद्धा लाँच करण्यात आला होता आणि सोबतच मायक्रोसॉफ्ट चा XBox हा लाँच झाला होता आणि त्यावेळी या दोन्ही कंपनी ची पहिली स्पर्धा झाली होती.

२००५-२००६ मध्ये PS3 आणि XBox360 हे समोरासमोर होते तर २०१३ मध्ये PS4 आणि XBox 1 यांची स्पर्धा होती. या दरम्यान, निटेंडो ही सुद्धा कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे गेमिंग कंसोल लाँच करत होती.

पण, भारतात फक्त सोनी च्या Play Station चा बोलबाला होता.

PS5 आणि XBox Series X मधील फरक :

सोनी आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या गेमिंग कंसोल चे स्पेक्स जाहीर केले आहेत. त्यासोबतच त्यांनी फक्त त्यांच्या गेमिंग कंसोल वर चालणारे गेम्स सुद्धा जाहीर केले आहेत. दोघांमधील फरक सांगण्याआधी साम्य जाणून घेऊयात.

PS5 आणि XBox X हे स्ट्रीमिंग बॉक्स प्रमाणे सुद्धा काम करतात. म्हणजे या दोन्ही बॉक्स च्या मदतीने तुम्ही नेटफलिक्स तुमच्या टीव्हीवर बघू शकतात.

दोन्ही गेमिंग कंसोल मध्ये 8 core 3.5 GHz AMD Zen 2 CPU, 1.3 Teraflop AMD RDNA 2 GPU आणि 16 GB GDDR6 ही RAM देण्यात आली आहे. PS5 आणि XBox X दोन्ही 120 फ्रेम पर सेकंद (fps) आणि 8K रेसोल्युशन ला सपोर्ट करतात.

PS5 आणि XBox X मधील फरक सांगायचा तर XBox X मध्ये 1 TB इतकी स्टोरेज स्पेस मिळते. तर PS5 मध्ये 825 GB इतकी स्टोरेज स्पेस मिळते.

XBox X हा आपल्या जुन्या XBox 1 च्या सर्व गेम्स ला सपोर्ट करेल. त्यासोबतच, XBox 360 आणि XBox चे काही गेम्स या नवीन गेमिंग कंसोल वर खेळता येतील. PS5 हे फक्त PS4 आणि PS4 Pro च्या गेम्स ला सपोर्ट करेल.

सोनी चे Exclusive गेम्स हे आहेत : Spiderman : Miles Morales, Horizon II: Forbidden West आणि Gran Tourismo 7.

 

ps 5 games inmarathi
youtube.com

 

मायक्रोसॉफ्टचे  exclusive गेम्स हे आहेत : Halo Infinite, Senua’s Saga: Hellblade 2, Forza Motorsport 8 आणि State of Decay 3.

या गेम्स शिवाय दोन्ही कंपन्यांनी जवळपास पंधरा नवीन गेम्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या गेमिंग कंसोल ची किंमत 500 डॉलर म्हणजेच जवळपास 37000 रुपये इतकी ठेवली आहे.

XBox Series X हे नोव्हेम्बर मध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचेल तर सोनी PS5 हे वर्षाखेरीस लोकांपर्यंत पोहोचेल. या स्पर्धेत Nitendo Switch Pro सुद्धा आपला मार्केट शेअर राखण्यासाठी प्रयत्न करत आहे.

XBox series X आणि PS5 हे दोन्ही हँडहेल्ड असल्याने त्यांना लोकप्रियता जास्त मिळणार असं या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत. या दोन्ही गेमिंग कंसोल ला मार्केट मध्ये भरभरून यश मिळेल यात शंका नाही. अशीच एखादी कंपनी भारतात सुद्धा असावी ही एक इच्छा आहे.

तोपर्यंत पालकांसमोर या वर्षात आलेल्या इतर आव्हानांसोबत आपल्या मुलांना या गेमिंग कंसोल च्या आहारी देऊ जाऊ न देणे हे सुद्धा एक आव्हान आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?