' रात्रीच्या वेळी सायकलवर, पायी चालतांना नीट दिसण्यासाठी केलेली नामी युक्ती बघा तर!

रात्रीच्या वेळी सायकलवर, पायी चालतांना नीट दिसण्यासाठी केलेली नामी युक्ती बघा तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“युरोप- व्हेअर ग्रेस, स्प्लेंडर अँड चार्म रीसाईड”. युरोपच्या निसर्गरम्यते बद्दल आपण खूप काही ऐकून आहोत. चित्रपटांमार्फत आपण युरोप टूर अनेकदा केली आहेच.

बर्फाच्छादित पर्वत रांगा, भरपूर जलवृष्टी होत असल्यामुळे उगवणारी सुंदर सुंदर फुलांची झाडं, बागा-बगीचे, हिरव्यारांगाच्या निरनिराळ्या छटा, मेपल, गुलमोहर, चेस्टनट, हेजल, डॉगवुड, पीच, सफरचंद, स्ट्रॉबेरी, यांसारखी अतिशय नयनरम्य झाडे, वेली ही युरोपची काया!

अतिशय सुंदर कलाकुसर करून बांधलेल्या इमारती, भव्य पॅलेसेस ही त्या कायेची आभूषणे. त्यांची कोपनहेगन, पॅरिस – दी कॅपिटल ऑफ फॅशन अँड टी सिटी ऑफ लव्ह, लंडन, यांसारखी डोळ्याचे पारणे फिटवणावरी शहरं.

 

paris inmarathi
archdaily.com

 

युरोप मधील रंजक इतिहास असलेले, शिक्षण, सुखसोयींनी समृध्द, शिक्षणात व टेक्नॉलॉजीत प्रगत देश आणि विशेष म्हणजे तिथले गुळगुळीत रस्ते, इतके सगळे गुण माणसाला भुल पडतात. असे म्हणतात एकदा माणूस युरोपला गेला की काही परतायचा नाही.

सायकलिंग करण्यासाठी युरोप एक ड्रीम डेस्टिनेशन आहे. आपल्या सगळ्यांना एकदातरी अशा दैदिप्यमान आणि शांत अशा निसर्गच्या कुशीत फिरायला, सायकलिंग करायला, ते सुंदर रूप डोळ्यांत साठवायला नक्कीच आवडेल नाही??

जर तुम्हाला सांगितले, की या परीलोकात तुम्हाला चमचमणाऱ्या रस्त्यावरून तुम्हाला सायकल चालवायला मिळेल तर? गंमतच वाटेल नाही? पण हा अनुभव तुम्ही पोलंड मध्ये खरोखर घेऊ शकता. कसे ते पाहूया.

 

poland solar path inmarathi
springwise.com

 

पोलंड हा देश देखील आपल्या सुंदरतेमुळे पर्यटकांच्या आवडत्या पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे.

पोलंडच्या Lidzbark Warminski शहारापासून काही अंतरावर स्थित Olsztyn या छोट्याश्या गावात दिवसभरात सौऊर्जेवर चार्ज होऊन रात्री लखाखणारा एक रस्ता आहे. हा रस्ता विशेषतः सायकलस्वारांसाठी व पायी चालणाऱ्या लोकांसाठी बांधला आहे.

रात्र झाली, की या रस्त्याच्या मटेरियल मधून निळा प्रकाश पडायला सुरुवात होते. हा चमचमणारा रस्ता सामान्य लोकांसाठी २३, सप्टेंबर २०१६ रोजी खुला करण्यात आला.

TPA Instytut Badań Technicznych Sp. z o.o. नामक कन्स्ट्रक्शन कंपनीने ह्या आगळ्या वेगळ्या रस्त्याचे डीझाईन बनवले व रस्त्याची आखणी करून मॅपिंगचे काम केले, तर Strabag contractors यांनी हा कागदी प्लॅन वरचा रस्ता सत्यात उतरवला.

या रस्त्याच्या बांधकामाचे मटेरियल वापरले आहे ते सिंथेटिक फॉस्फरस असून त्याला “luminophores” पार्टीकल्स म्हणतात.

हे पार्टिकल्स दिवसा सूर्यप्रकाश साठवून, रात्री १० तासांपर्यंत उजेड देऊ शकतात. दुसऱ्यादिवशी सकाळी पुन्हा स्वतःला चार्ज करुन घेतात.

 

poland solar path inmarathi1
simplemost.com

 

TPA चे प्रेसिडेंट व सी.ई.ओ. Igor Ruttmar, यांनी म्हटले की,

“रस्ता बांधकामात वापरले गेलेले मटेरियल एकदा चार्ज झाल्यावर कमीत कमी १० तास प्रकाशित राहू शकते. त्यानंतर पुन्हा सकाळी चार्ज होऊन रात्री प्रकाश देण्यासाठी सज्ज होते.

आम्हाला अशा आहे, की चमकणाऱ्या या रस्त्याच्या प्रयोगामुळे, पायी चालणाऱ्या व सायकल वापरणाऱ्या लोकांची प्राणघातक अपघातांपसून सुरक्षा होईल”

या रस्त्याची चमक निळ्या रंगाची असण्या मागे देखील एक कारण आहे. Olsztyn च्या समृध्द वातावरणाला शोभेल असा तो रंग आहे. Igor पुढे म्हणतात,

“येथील हिरवा गार परिसर, घनदाट जंगल, अगदी गावाजवळ असणारी नदी व संध्याकाळचे निळसर आकाश, तळे, लहान सहान टेकड्या, आणि कंट्रीसाईड चा फिल या सगळ्यांना सूट होणारा, यांचे सौंदर्य आणखीन खुलवणारा रंग हा निळा रंग आहे.

निळ्यारंगामुळे इथली नैसर्गिक संपदा अजून मोहक दिसते. म्हणून आम्ही मुद्दाम निळ्यारंगाचे पर्टीकल्स निवडले”.

 

poland solar path inmarathi2
thisiscolossal.com

 

तूर्तास हा रस्ता फक्त ३८० km लांबी असून ६ फूट रुंदीचा आहे व तो सध्या टेस्टिंग प्रक्रियेत आहे. किफायतशीर ठरला, तर पुढे अजुन अनेक असे सायकलिंग ट्रॅक्स बांधण्याचा या पॉलिश कंपनी व सरकारचा विचार आहे.

हा रस्ता बांधायला त्यांना $31000 इतका खर्च आला होता. या रस्त्याला आणखीन आकर्षक बनवण्यासाठी त्यावर विविध चित्र सुद्धा काढण्यात आली आहेत.

सायकल पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन असल्यामुळे व सायकलिंगचे आपल्या शरीरासाठी ही भरपूर फायदे असल्यामुळे, नागरिकांना सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित करण्यसाठी सुद्धा सरकारने या प्रोजेक्टला संमती दिली.

 

cycle inmarathi
economictimes.indiatimes.com

 

पारंपरिक रस्त्यांपेक्षा “स्वस्त, मजबूत व टिकाऊ” या धोरणाला मध्यनजर ठेऊनही बनवण्यात आला आहे.

पोलंडचा हा सायकल ट्रॅक युरोप मधील पहिला ल्युमिनस ट्रॅक नाहीये.

या पूर्वी २०१४ मध्ये Netherlands च्या Noord brabant येथील Eindhoven गावात, जिथे सुप्रसिद्ध डच चित्रकार Vincent Van Gogh त्यांच्या जीवन काळात काही वर्ष राहिले होते, त्यांच्या स्मृतीत तिथे असाच एक चमचमता रस्ता बांधण्यात आला होता.

डच डिझायनर Daan Roosegaarden यांनी तो रस्ता डिझाईन केला होता व त्याचे नाव Van Gogh यांच्याच एका जग प्रसिद्ध कलाकृती वरून प्रेरित होऊन “The starry night” ठेवण्यात आले.

 

poland solar path inmarathi3
inhabitat.com

 

त्याही पूर्वी २०१३ UK मध्ये च्या Pro-Teq Surfacing मार्फत, केंब्रिज येथील Christ’s Pieces Park येथील १६१४ फूट लांबीच्या एका रस्त्यावर, चमकणाऱ्या लिक्विडचे कोटिंग करण्यात आले होते. त्या रस्त्याला “Starpath” हे नाव देण्यात आले.

कधी पोलंडला गेलात, तर ह्या चमचमणाऱ्या रस्त्याला नक्की भेट द्या. अविस्मरणीय आठवणी बनवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?