हिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भगवद्गीता हा आपल्या भारतीय संस्कृतीमधील महान ग्रंथ! कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने महारथी अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता होय. आजही या भगवद्गीतेला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात मानाचे स्थान आहे. कारण जीवनातील कोणत्याही समस्येचे निराकरण भगवद्गीतेमध्ये सहज उपलब्ध होते अशी या ग्रंथाची महती!

 

bhagavad_gita-inmarathi
timesnownews.com

म्हणूनच की काय जगातील काही प्रसिद्ध व्यक्ती आपल्या यशाचे श्रेय भगवद्गीतेला देखील देतात…!

कारण त्यांच्या मते कुठे ना कुठे या भगवद्गीतेमुळे त्यांना त्यांचा मार्ग सापडलेला असतो…!

 

अॅनी बेझंट

 

Annie_Besant-marathipizza

स्रोत

अॅनी बेझंट या १८ व्या शतकातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या. इंग्रजांच्या राजवटीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देखील त्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्या आध्यात्माचे समर्थन करायच्या, सोबतच भगवद्गीते मधील विचारांचा आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रसार देखील करायच्या.

 

डॉ. अल्बर्ट श्वेइटझर

 

Dr. Albert Schweitzer-marathipizza

स्रोत

डॉ. अल्बर्ट श्वेइटझर हे अतिप्रसिद्ध विचारवंत होते. त्यांच्या विचारांवर भगवद्गीतेचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी केलेल्या विपुल लेखनामध्ये प्रत्येक पुस्तकात भगवद्गीतेमधील उपदेशाचे प्रतिबिंब दिसते.

 

अल्बर्ट आईनस्टाईन

 

Albert-Einstein-marathipizza

स्रोत

दुनियेतील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांच्याबद्दल असे म्हटले जाते की त्यांच्या संभाषणात वारंवार भगवद्गीता आणि त्यांमधील विचारांचा उल्लेख यायचा.

एकीकडे आपण म्हणतो की शास्त्रज्ञांचा देवावर विश्वास नसतो, पण अल्बर्ट आईनस्टाईन यांचा मात्र देवावर देखील विश्वास होता आणि आपल्या भगवद्गीतेवर देखील!

 

रुडोल्फ स्टेईनर

 

Steiner-Rudolf -marathipizza

स्रोत

रुडोल्फ स्टेईनर लेखक, विचारवंत, कादंबरीकार आणि सामाजिक विचारवंत होते. भगवद्गीता वाचताना आपण त्यामध्ये अक्षरश: हरवून गेल्याची कबुली त्यांनी एकदा दिली होती.

 

कार्ल जंग

 

carl-jung-marathipizza

स्रोत

 

कार्ल जंग एक मनोवैज्ञानिक होते. त्यांच्या कामामध्ये आध्यात्म आणि धार्मिकता यांची सुरेख सांगड पाहायला मिळते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा विज्ञानाशी मेळ दाखवण्यासाठी कार्ल जंग भगवद्गीतेमधील १५ व्या अध्यायाचा दाखला देतात.

 

हेरमन हेस्से

 

hermann-hesse-marathipizza

स्रोत

हेरमन हेस्से एक प्रसिद्ध लेखक होते. त्यांना नोबल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मते भगवद्गीता हा जगातील एकमेव ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवनाचे सार आणि धर्माची ओळख यांचा उत्तम संगम दिसून येतो.

 

हेन्री डेव्हिड थोरीयू

 

Henry_David_Thoreau-marathipizza

स्रोत

हेन्री डेव्हिड थोरीयू एक अमेरिकन निबंधकार होते. त्यांच्या मते भगवद्गीतेमधील अक्षर अन अक्षर आजच्या सामाजिक परिस्थितीशी मिळते जुळते आहे.

 

अॅल्ड्स ह्युक्सले

 

Aldous-Huxley-marathipizza

स्रोत

अॅल्ड्स ह्युक्सले हे इंग्रजी साहित्यकार होते. त्याचं म्हणणं होतं की मनुष्य जातीच्या अध्यात्मिक अस्तित्वाची परिभाषा म्हणजे भगवद्गीता होय.

 

राल्फ वाल्डो इमर्सन

 

emerson-marathipizza

स्रोत

राल्फ वाल्डो इमर्सन अमेरिकन कादंबरीकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ता होते. आपल्या निबंधामध्ये त्यांनी भगवद्गीतेमधील अध्यायाचा उल्लेख केलेला आहे.

 

सुनिता विल्यम्स

 

sunita-williams-marathipizza

स्रोत

सुनिता विल्यम्स यांची तुम्हाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. भारतीय वंशाची अंतराळात झेप घेणारी ती दुसरी स्त्री होय.

सुनिता विल्यम्स भगवद्गीतेमुळे इतक्या प्रभावित होत्या की भगवद्गीतेची एक प्रत त्या अंतराळातील मोहिमेवर देखील घेऊन गेल्या होत्या.

या प्रसिद्ध व्यक्तींपैकी अनेकजण जण नास्तिक होते. इतके विद्वान लोक नास्तिक असुन देखील भगवद्गीतेवर विश्वास ठेवायचे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये नक्कीच आयुष्याचं सार असलंच पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?