' मध्येच लागणारी "उचकी" का येते? यावर नेमका उपाय तो काय? वाचा

मध्येच लागणारी “उचकी” का येते? यावर नेमका उपाय तो काय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण सगळ्यांनी राणी मुखर्जीचा “हीचकी” नावाचा सिनेमा पहिलाच असेल. त्यात, तिच्या उचक्यांची भारी गंमत दाखवली आहे व त्या उचक्यांमुळे होणारा त्रासही दाखवला आहे.

आपल्यापैकी कित्येक जणांना हा त्रास त्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे कायमस्वरूपी सुद्धा असू शकतो. उचकी लागणे ही आपल्याला एक छोटीशी वाटते. कारण “उचकी लागली, की कोणी तरी आठवण काढली” असं आपल्या आजीला म्हणताना आपण ऐकलेच आहे.

उचकी म्हणजे कोणीतरी आठवण काढली म्हणून होणारी गोष्ट, असं आपल्याला वाटत होतं, पण कधी विचार केलाय का? यामागे काय कारण आहे?

लहान असताना आपल्याला ह्या उचकीची भारी मज्जा वाटायची. ही उचकी फार स्वैराचारी असते, ती आपल्या नियंत्रणात नसते. कधीही येते व वाटेल तेव्हा जाते. पण तो पर्यंत आपल्या मात्र फार नाकी नऊ येतात.

 

hiccups inmarathi
keckmedicine.org

 

उचकी लवकर थांबली तर ठीक, पण कधी कधी ती पटकन जातही नाही. कितीही उपाय केले तरी लोकांची अशी समस्या असते, की उचकी थांबतच नाही. जर थांबली असेलच तर वेळेच्या अजून काही अंतराने पुन्हा येते.

कधी कधी हा त्रास सौम्य असतो पण कधी कधी उचकी लागली व तीव्रता नियंत्रणा पलीकडे गेली की मोठी हानी होऊ शकते.

ही उचकी थांबवायला आपण चमचाभर साखर खाणे, पाणी पिणे, आकाशाकडे मान करून बघणे इथपासून ते १०-१२ नातेवाईकांची नावे घेणे असे काय काय गंमतीशीर उपाय करून बघतो. पण यातले किती काम करतात हा प्रश्नच आहे.

हाच उचकीचा हा त्रास आपल्या शरीरातील काही समस्यांचे संकेत असतो हे आपल्याला ठाऊक आहे का? आज आपण उचकी लग्ण्यामागे काय करणे असू शकतात व तिला थांबवण्याचे काय उपाय आहेत हे बघूया.

उचकीची प्रक्रिया –

 

hiccups inmarathi1
healthnavigator.org.nz

 

आपल्या पोटाला व फुफुसांना एकमेकांपासून मोजक्या अंतरावर ठेऊन, त्यांना योग्य ठिकाणी जोडून ठेवायचे काम डायफ्रम नावाचा अवयव करत असते. कधी कधी तणावामुळे हे डायफ्रम अकडण्याची शक्यता असते.

हे डायफ्रम मसल्स अनैसर्गिक रित्या अकडल्यामुळे आपण हव्या त्या प्रमाणापेक्षा जास्त हवा आत घेतो व ती हवा बाहेर टाकतो. त्यामुळे शरीरातील कार्बन डाय ऑक्साईडची पातळी गडबडून, एक विचित्र आवाज येतो.

श्वसनक्रिया विस्कळीत झाल्यामुळे आपली नित्यकामे करण्यात अडथळे येतात.

उचकी का येते?

१) जेवताना मोठा घास, पटकन गिळून घेतल्यामुळे, श्वसनक्रिया विस्कळीत होऊ शकते व अन्नाचा एखादा कण त्या नलिकेत शिरल्यामुळे उचकी लागण्याची शक्यता असते.

२) कोल्ड ड्रिंक्स – कोल्ड ड्रिंक्स जसे की पेप्सी, कोला, सोडा यांचे अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे पोटावर व डायफ्रमवर अत्याधिक प्रमाणात ताण येतो. यामुळे उचकीचा त्रास होऊ शकतो.

 

cold drinks inmarathi

 

३) असा कोणताही आजार ज्यात आपल्या नसा व डायफ्रमयांवर प्रभाव होतो. जसे – लिव्हरचे आजार, न्युमोनिया वर इतर श्वसन संबंधी आजार.

४) आतडे किंवा पोटासंबंधीची शस्त्रक्रिया यामुळे डायफ्रमवर ताबा ठेवणाऱ्या नसांवर अत्याधिक ताण येतो व नैसर्गिक श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो आणि उचकी लागायची भीती असते.

५) फिट किंवा ब्रेन ट्युमर्स यांसारखे ब्रेन स्टेमशी संबंधित आजार किंवा कोणत्याही क्रोनिक आजारामुळे सुद्धा उचाकीचा त्रास होऊ शकतो.

६) विविध प्रकारचे गंध, धूर – धूप यांमुळे सुद्धा जर कोणाला ऍलर्जी असेल तर उचक्या येतात.

७) दचकल्यामुळे, भीतीमुळे, मानसिक किंवा इमोशनल अटॅकमुळे सुद्धा उचकी लागते.

८) अचानक झालेल्या तापमानातील बदलामुळे उचकी लागते.

 

Asian woman in hot summer - heat stroke concept
sowetanlivecom

 

९) नवजात बालकांना चुकीच्या पद्धतीने दूध पाजले गेल्या मुळे उचकी लागते.

१०) मद्यपान व धूम्रपान – या दोन गोष्टी अती प्रमाणात झाल्या तर फुफुसावर अधिक ताण पडून शरीरात कार्बन डायऑक्साइडची लेव्हल डिस्टर्ब होते व यामुळेही उचकीचा त्रास उद्भवतो.

 

quit smoking inmarathi
fortune.com

 

उचकीची कारणे तर आपण पाहिली आहेतच, आता पाहूया उचकी घालवण्याचे काही उपाय.

 दीर्घ श्वास घेणे – उचकी लागल्यावर लांब श्वास घ्या व काही सेकंद श्वास धरून ठेवा. असे उचकी थांबेपर्यंत करा. याने फुफुसे मजबूत होऊन, उचकी जाते व नेहमी नेहमी येणाऱ्या उचक्यांचा त्रास कमी होतो.

 श्वासोच्छवास – एक दीर्घ श्वास घेऊन काही सेकंद धरून ठेवा. तो हळुवार सोडा व एक नियमित घेतो तसा श्वास घ्या व ५ सेकंद धरून ठेवा. हळुवार बाहेर सोडा. हे ५-६ वेळा करा. असे केल्याने उचकी थांबेल.

 

jaqueline-yoga-inmarathi
pinterest.co.uk

 

कागदी थैलीचा वापर – कागदी थैली/ लंच बॅग घेऊन, ती नाका – तोंडाला लावून त्यात लांब श्वास घ्या व सोडा. हे असे १०-१५ मिनिटे करा.

मान व गळा चोळणे – मानेच्या मागच्या बाजूला व समोर गळ्याला हलक्या हाताने चोळा. असे केल्याने तिथल्या मसल्स थोड्या रिलॅक्स होऊन, उचकी थांबण्याची शक्यता असते.

लिंबाचा वापर – उचकी लागली की लिंबू चोखा. हवे तर त्या लिंबावर मीठही घालू शकता. सबंध लिंबू खाऊ शकता. पण लिंबाच्या रसामुळे दात  आंबतात. त्यामुळे, नंतर गुळण्या करून दातांवरील लिंबाचा रस काढून टाका.

 

lemon juice-inmarathi01
postsod.com

 

शीर्षासन करा – उचकी लागली, की शीर्षासन हा उपाय सुद्धा उपयुक्त ठरतो असे संशोधकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे उचकी आली की शीर्षासन करा.

जेवताना पाणी पिणे – कधी कधी जेवताना अन्ननलिकेत घास अडकतो व उचकी लागते. त्यामुळे उचकी लागताच एक ग्लास पाणी, हळू हळू प्या.

घशाला पडलेली कोरड नाहीशी होऊन, अन्न नलिकेत अडकलेला कण पुढे सरकतो व उचकिची तीव्रता कमी होते.

 

warm water inmarathi
apollopharmacy.in

 

दचकवायला सांगणे – ज्याप्रमाणे दचकल्यामुळे उचकी लागते, त्याचप्रमाणे उचकी लागली की त्या व्यक्तीला दचकवल्यामुळे उचकी थांबते सुद्धा.

मध व ऐरंडेल तेल – प्रयत्न करून सुद्धा उचकी थांबत नसेल तर एक छोटा चमचा मध व त्यात तेवढेच ऐरंडेल तेल घालून चाटण बनवा. हे मिश्रण आपल्या बोटाने चाटून घ्या.

एखाद्या आवडीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे – उचकी लागल्यास, तिच्यावरून लक्ष काढून आपल्या आवडत्या कामात स्वतःला गुंतवले तरीही उचकी थांबते.

 

music-stress-reliever-inmarathi
amo.org.au

 

पाय कवटाळून बसा – उचकीला थांबवण्यासाठी छातीशी पाय कवटाळून बसणे ही उपयुक्त ठरते. असे केल्यास उचकी थांबते.

बाळाला ढेकर येण्यास मदत करणे – कडेवर घेऊन लहान बाळाची पाठ थोपटा किंवा चोळा ज्यामुळे त्याला ढेकर येईल व उचकी येणे बंद होईल.

अन्नाचा कण किंवा हवा अडकल्यामुळे सुद्धा उचकी येते. ढेकर आल्यामुळे ती अडकलेली हवा पास होते व श्वास घेण्यास अडथळा येत नाही.

डॉक्टरांचा सल्ला घ्या – इतके उपाय करूनसुद्धा काही उपयोग होत नसेल, तर आपल्या डॉक्टरांना लवकरात लवकर भेटा व आपल्या उचकी मागचे कारण व त्या वरचे उपचार जाणून घ्या.

वरील दिलेले उपाय नक्की ट्राय करून पाहा. या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काही उपाय असतील तर आम्हाला नक्की कळवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?