'आणि माझा नवरा म्हणाला - "तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!"

आणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखिका – श्रुती कुलकर्णी

===

ब्लश या वेबसाईटने लिहिलेला एक लेख वाचला आणि हे लिहावंसं वाटलं.

मला कायम वाटायचं की लग्न जेव्हा “दोन” लोकांचं असत तेंव्हा खर्च हा “मुलीकडच्यांनीच” का करायचा?

लग्नानंतर किंवा लग्नाच्या वेळी मुलींना कायम ऍडजस्ट करावं लागतं – असा विचार नेहमी मनात यायचा. मग प्रेमात पडले ते १००० किलोमीटर दूर असलेल्या मुलाच्या.

प्रेमात पडल्यावर, अर्थातच, या गोष्टींचा विचार करायला सुद्धा उसंत नव्हती… मग प्रेमाचं लग्नात रूपांतर होण्यासाठी घरच्यांची बोलणी झाली अन आम्ही पहिल्यांदा याच्या परिवाराला भेटायला गेलो.

तेव्हा सासरे ‘इतके दूर येणार असाल तर आपल्या घरीच रहाल’ असं म्हणाले आणि सासूबाईंनी जेवणात माझी लाडकी ‘रसमलाई’ आणली…! तेव्हा लग्न म्हणजे दोन कुटुंबांनी एक होण्यासाठी एकमेकांबद्दल दाखवलेलं प्रेम आणि उत्साह हे लक्षात आलं.

साखरपुड्याला १००० किमी दूर आलेल्या माझ्या सासऱ्यांनी जेव्हा माझ्या बाबांच्या हातात पैशांचं पाकीट हा आमचा निम्मा खर्च म्हणून दिला… तेव्हा आईनी “हे तू त्याला सांगितलंस का?” असं विचारलं.

चेहऱ्यावर स्मितहास्यापलीकडे माझ्याजवळ उत्तर नव्हतं…! काहीही नं बोलता अशी कृती करणारा नवरा, सासरे आणि कुटुंब मला लाभलं होतं…!

 

 

लग्नानंतर सुद्धा एकमेकावर कुरघोडी न करता आम्ही ‘समानतेने’ राहतो ही गोष्ट लोकांना पचायला जड जाते. म्हणजे त्याला ऑफिसमधून यायला उशीर झाला तर मी त्याच्यासाठी कॉफी बनवते आणि मी उशिरा आले तर तो मला सरबत विचारतो.

घरातली आणि बाहेरची काम आम्ही वाटून घेतली आहेत आणि कोणतंही काम छोटं नसतं हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलंय.

म्हणजे एके दिवशी घरी पाहुणे येणार होते आणि मला ऑफिसहून यायला थोडा उशीर झाला, तर मी आणि पाहुणे यायच्या आत माझ्या नवऱ्याने पूर्ण घर आरशाप्रमाणे चमकवून ठेवलं होतं.

माझ्या लग्नानंतरचा पूर्ण पगार मी त्याचं आवडतं घड्याळ घेण्यात गुंतवला होता.

हे सगळं जरी असलं तरी मला स्वतःला स्वयंपाक करायला आवडतो आणि स्वयंपाक केल्याने माझ्यातल्या पुरोगाम्याला धक्का बसत नाही.

कारण मला पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा माझ्यातलं स्त्रीपण जपून त्याला प्रबळ करण्यात जास्त रस आहे आणि मला माझ्या नवऱ्याची यात मोलाची साथ मिळाली आहे.

म्हणजे स्वयंपाकाबरोबरच मला वाचन आणि लिखाण दोन्ही मनापासून आवडतं आणि एखाद्या रविवारी मी पुस्तक वाचताना किंवा लेख लिहिताना मला टोमणे ऐकायला न मिळता साथच मिळते (आणि माझ्या प्रत्येक लिखाणाचं प्रूफ रीडिंग पण!).

पण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रसंग म्हणजे लग्नानंतर मी पहिल्यांदा ऑफिसला गेले, तेव्हाचा…

रात्री परतताना भूक तर लागलीच होती, पण घरी पोचल्यावर लक्षात आलं की जेवणाचं ताट घेऊन आई आता थांबणार नाही. आणि मला एकाचाच नाही तर दोघांचा स्वयंपाक करायचा आहे…!

मग माझ्या डोळ्यांनी भुकेला साथ दिली आणि मी अक्षरशः लहान मुलीसारखी रडू लागले.

तेव्हा माझ्या नवऱ्याने माझी समजूत घातली आणि स्वयंपाक घरात जाऊन कणिक मळू लागला. मग माझ्यात पण थोडं बळ आलं आणि मी भाजी चिरायला घेतली.

 

chopping-vegetable-inmarathi

 

तेव्हा माझे डोळे पुसत तो इतकंच म्हणाला की “आपल्याला असाच संसार करायचा आहे” आणि त्या दिवशी मला ‘आपला’ संसार म्हणजे काय याचा खरा अर्थ उमजला.

आमच्या संसारात पुरुष म्हणून तो स्वतःला माझ्यापेक्षा श्रेष्ठ समजत नाही की मी स्त्री आहे म्हणून मी घरकामात अडकून राहत नाही. पण म्हणून घरकाम करण्यात मी कमीपणा पण मानत नाही.

आता घरीं मोठी माणसं असताना मुद्दामून मी त्याला घरकाम सांगत नाही; कारण त्या पिढीतल्या सगळ्यांनाच काही ‘समानतेची’ व्याख्या पटणार नाहीये. आणि – आम्हाला ती पटवून पण द्यायची नाही.

“असा”, मला समजून घेणारा, घरकामात मदत करणारा, नवरा मिळाला म्हणून सुरुवातीला, मला मी खूप भाग्यवान आहे असं वाटायचं.

एकदा माझ्या नवऱ्याला मी तसं बोलून देखील दाखवलं – त्यावर त्याने माझ्याकडे पाहिलं, माझ्या नजरेस नजर भिडवून म्हणाला –

“तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!”

बऱ्याच लोकांची या “घर काम” प्रकरणाबद्दल बरीच मतं आहेत. मला ह्या बाबतीत असं वाटतं की “नोकरी केली तरच तुम्ही सक्षम बनता” असं मानून, घरकामांना कमी लेखूनच, आपण समाजव्यवस्था बिघडवली आहे.

जर एखादी स्त्री उत्तमपणे स्वतःचं घर सांभाळून आपल्या मुलांना उत्तम संस्कार देत संगोपन करत असेल तर – ती ही तितकीच पुरोगामी आहे आणि ती व तिचा नवरा तितकेच ‘समान’ आहेत.

 

mission-mangal-inmarathi

 

पण हे म्हणतानाच बायकांनीसुद्धा सिरीयल, दागिने यातून बाहेर येऊन स्वतःच्या वृद्धीसाठी काय करता येईल याचा विचार करावा. वाचन वाढवून, मनन-चिंतन करून समाजासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार जरूर करावा.

दुसरीकडे – नोकरी करणाऱ्या बायकांनी ‘मी एकटीने’ घर आणि जॉब सांभाळायचा आहे हे डोक्यात घेऊन सगळं स्वतःच करायची घाई करू नये.

आपण पैसे कमावतो म्हणजे आपण “बुद्धिवादी” असा विचार न करता, स्वतःला आणखीन सक्षम कसं बनवता येईल याचा विचार करावा.

वाचन लिखाण याकडे कल असू द्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवऱ्याने घरचं एखादं काम केलं तर बायकांनी स्वतःला दोषी समजू नये, वा ज्या बाईचा नवरा हे करतो तिला नाव ठेवू नये.

लक्षात घ्या संसार “दोघांचा” आहे. त्यामुळे त्याने घरकाम केलं तर त्यात चूक काहीच नाहीये आणि तुम्ही सुद्धा एखाद वेळेस गॅस बुक करून फोन बिल भरलंत तरी काही बिघडणार नाहीये!

शेवटी – लोक काय म्हणतील यापेक्षा आपापल्या सोयीनुसार कामांची वाटणी करून घेतल्यास संसार नक्की सुखाचा होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आणि माझा नवरा म्हणाला – “तू लकी नाहीयेस. आपण समान आहोत!”

  • March 9, 2017 at 10:53 am
    Permalink

    he khara asa ghadu shakata yavar nahi vishwas basat.exaggerated vatat.mazyapeksha kami shikshan asalelya jemtem kamavnarya aani swatahacha ghar hi nastanarya mulani mala registered marriage mhatalyavar nakar dilay.yatach sagala aala.1000 mulanmadhe ekhadi family apwad asu shakel pan he sarras ghadat nahi.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?