' नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!! – InMarathi

नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाच्याच घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. अगदी व्यायामापुरते सुद्धा बाहेर चालायला जाणे शक्य नसल्याने शरीराचे नैमित्तिक चलनवलन सुद्धा कमी झाले आहे.

वर्क फ्रॉम होम मुळे दिवसातला बहुतांश वेळ हा लॅपटॉप समोर व्यतीत होतो. यामुळे आपल्यापैकी बरेचजणांना वाढलेल्या वजनाची चिंता भेडसावत असणार. पण मुळात अंगावरील चरबी वाढते म्हणजे नक्की होते तरी काय?

याचे उत्तर आपल्या शरीरातील चयापचय क्रियेत आहे. शरीराला कार्यरत ठेवण्यासाठी लागणारी शक्ती आपल्याला अन्नाद्वारे मिळत असते.

श्वासोच्छवास, अन्नपचन अथवा कोणत्याही प्रकारची हालचाल करताना शरीरातील चरबी जळून काही ना काही कॅलरीज खर्च होतात. अर्थात या कॅलरीज खर्च होण्याचा दर हा व्यक्तीसापेक्ष असतो.

जेवढी जास्त हालचाल, तेवढ्या जास्त कॅलरीजचे ज्वलन, परिणामी कमी चरबी, असे हे साधे सोपे गणित आहे. त्यामुळेच जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा धावतो, तेव्हा चयापचय होण्याचा दर वाढतो आणि चरबी कमी होते.

 

home exercise inmarathi 2

 

पण याखेरीज, असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने चयापचय क्रियेस आपसूकच गती मिळते.

आपल्या दैनंदिन आहारात अशा पदार्थांचा वापर केल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि पर्यायाने आपले वजनही घटवता येऊ शकते.

या पदार्थांचे कमी प्रमाणात केलेले सेवन आपली भूक मर्यादित ठेवण्यात मदत करते.

बदाम – अक्रोड :

 

walnut and almond inmarathi
healthline.com

 

बदाम अक्रोड यांसारख्या पदार्थामध्ये प्रथिनाचे प्रमाण फार जास्त असते. यांचे कमी प्रमाणात केलेले सेवन सुद्धा शरीराला अत्यंत लाभदायक ठरते.

शरीराला आवश्यक असणाऱ्या ओमेगा-३ मेदाम्लांचा (Fatty Acids) अक्रोड हा प्रमुख वनस्पतीजन्य स्त्रोत आहेत. बदामाच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक कॅल्शिअम चा पुरवठा होतो.

दही :

 

yogurt-inmarathi
seriouseats.com

 

भारतीय लोकांच्या आहारात दह्याला विशेष महत्त्व आहे. जेवणात व जेवणानंतर बऱ्याचदा दही खाण्याचा सल्ला दिला जातो.

दह्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. तसेच कॅल्शियम आणि पोटॅशिअम सुद्धा मुबलक प्रमाणात असते. दह्याचे सेवन भूक मर्यादित ठेवण्यास मदत करते.

अंडी :

 

eggs inmarathi
villages-news.com

 

आरोग्यदायी पदार्थांमध्ये अंडी कायमच वरच्या क्रमांकावर आहेत. हृदयाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने अंडी लाभदायक असतात. प्रथिनांच्या उच्च प्रमाणामुळे अंड्यांचे थोडेसे सेवनही आपली भूक भागवते.

यांमुळे शरीरातील चयापचय क्रियेचा दर सुमारे २० ते ३५ टक्क्यांनी वाढलेला दिसून येतो. शरीरातील मेद जळण्यासाठी अंड्यांचे सेवन फारच फायदेशीर ठरते.

मासे :

 

fish eating inmarathi
indiatoday.in

 

मासे म्हटले, की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटलेच पाहिजे! पण जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच मासे शरीरातील चरबी घटवण्याच्या कामी सुद्धा मदत करतात.

सालमन, हेरिंग, मॅकरेल यांसारख्या माशांचे सेवन हृदयरोगाला दूर ठेवते.

चयापचय क्रियेत मदत करणारी ओमेगा-३ ही मेदाम्ले माशांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात. माशांमधील प्रथिनांचे पचन करताना शरीरातील चयापचय क्रियेचा वेग वाढतो.

आहारतज्ज्ञांच्या मते, अंदाजे १०० ग्रॅम मासे आठवड्यातून किमान २ वेळेस आहारात असावेत.

खोबरेल तेल :

 

Coconut oil inmarathi
UbudBotanyInteractive.com

 

खोबरेल तेलात मिडीयम चेन ट्राय ग्लिसराईड्स (MCT) चे प्रमाण चांगले असते. MCT अतिरिक्त चरबी घटवण्याच्या कामी मदत करते.

काही तज्ज्ञांच्या मते, लठ्ठ व्यक्तींनी आपल्या आहारात रोज किमान १-२ चमचे खोबरेल तेलाचा वापर सुरू केल्यास पोटाचा घेर सरासरी १ इंचाने कमी होऊ शकतो.

तसेच इतर तेलांच्या तुलनेत खोबरेल तेल हे उच्च तापमानाला चांगल्या प्रकारे स्थिर राहू शकते. ज्यामुळे जे पदार्थ उच्च तापमानाला शिजवले जातात, त्यात खोबरेल तेल वापरणे फायदेशीर ठरू शकते.

कॉफी :

 

coffee inmarathi
dreamwallpage.blogspot.com

 

कॉफी हे जगात सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे. जगातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या चवींच्या कॉफीचे उत्पादन होते. कॅफिन उत्तेजक द्रव्याप्रमाणे कार्य करते.

म्हणूनच कॉफी प्यायल्याने तरतरी येते व उत्साह वाढतो. पण कॅफिनचे जास्त प्रमाणात केलेले सेवन त्रासदायकही ठरू शकते.

कॅफिनमुळे चयापचय क्रियेचा दर अंदाजे ३ ते १३% पर्यंत वाढल्याचे काही अभ्यासाअंती स्पष्ट झालेले आहे. अतिरिक्त चरबी जाळण्यात कॅफिन मोलाची भूमिका बजावते.

 

ग्रीन टी :

 

cancer-green tea-inmarathi
food.ndtv.com

 

पारंपरिक चहाऐवजी सध्या ग्रीन टी कडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. वजन घटवण्यासाठी गवती चहा, तुळस आणि अशा इतर काही वनस्पतींचे मिश्रण असलेला ग्रीन टी घेण्याचा सल्ला बरेच आहारतज्ज्ञ देतात.

तसेच हृदयरोग आणि कॅन्सर पासून बचावासाठी याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. ग्रीन टी मध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. पण ग्रीन टी च्या सेवनामुळे होणारे फायदे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे दिसू शकतात.

 

ऑलिव्ह ऑइल :

 

olive oil inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

ऑलिव्ह ऑईलचा वापर भारतात अलीकडे वाढू लागला आहे. भूमध्यसागरी प्रदेशात ऑलिव्ह ऑइल मुख्यत्वेकरून वापरले जाते. हृदयाच्या उत्तम कार्यक्षमतेसाठी ऑलिव्ह ऑइल फायद्याचे ठरते.

ऑलिव्ह ऑईलच्या सेवनाने शरीराला आवश्यक HDL कोलेस्टेरॉल मिळते. तसेच GLP-1 या हार्मोन्स ची वाढ होते, जे आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणाऱ्या हार्मोन्सपैकी एक आहे.

वरील पदार्थांचा आपल्या आहारात अंतर्भाव करणे आपले वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते. भारतीय आहारात वरीलपैकी बहुतांश पदार्थांचा वापर कोणत्या ना कोणत्या प्रमाणात केला जातोच.

सध्या धकाधकीच्या जीवनात आहारात वाढलेले जंक फूडचे प्रमाण, जेवणाच्या अनियमित वेळा आणि व्यायामाचा अभाव यांमुळे लठ्ठपणाची समस्या नवीन पिढीमध्ये वाढत चाललेली आहे.

परंतु आता लॉकडाऊनमुळे पुन्हा आपला आहार चांगल्या घटकांनी समृद्ध करण्याची उत्तम संधी आपल्याला मिळालेली आहे. अशा वेळी आहाराच्या योग्य सवयी लावून घेणेसुद्धा शक्य आहे.

या बरोबरच जरी घराबाहेर पडणे शक्य नसले, तरी योगासने व अन्य व्यायामप्रकारांचा अवलंब करून आपले आरोग्य सुदृढ राखणे ही काळाची गरज आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?