' USB वरच्या त्रिशूळाच्या आकारासारख्या; रोज नजरेस पडणाऱ्या ह्या symbol चा अर्थ काय? – InMarathi

USB वरच्या त्रिशूळाच्या आकारासारख्या; रोज नजरेस पडणाऱ्या ह्या symbol चा अर्थ काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्मार्टफोन हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनले आहेत! पहिले तर नोकीयचे भले मोठे फोन यायचे ज्यातून फक्त कॉल आणि मेसेज एवढंच केलं जायचं!

पण हळू हळू त्यातूनही आपण बरीच प्रगती केली आणि आज स्मार्टफोन अँन्ड्रॉईड चं एक स्वतंत्र विश्वच तयार झालेलं आहे!

आज तुम्ही जेंव्हा एखादा स्मार्टफोन विकत घेता किंवा ऑनलाइन खरेदी करता तेंव्हा तो उघडताना तुमच्यासमोर बऱ्याच गोष्टी! सुरुवातीला फोन बरोबर फक्त चार्जर आणि काही गाईड मिळायचे!

पण आता फोन आणि टेक्नॉलॉजी जशी बदलली तसे फोन्स आणि त्याबरोबर येणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा फरक पडू लागला!

हळू हळू मोबाइल चे हेडफोन्स, स्क्रीनगार्ड, मोबाइल कव्हर्स, वेगवेगळी स्टीकर्स, आता तर वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर, फास्ट चार्जर सुपर फास्ट चार्जर असे बरेच प्रकार आता मोबाईलच्या बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतील!

 

mobile unboxing inmarathi
tech-ish.com

 

ह्या मोबाईलच्या ह्या वेगवेगळ्या वस्तूंवर एक ठराविक सिंबॉल असतात जे आपल्या ग्राहकांसाठी असतात! त्यावरचे कित्येक सिंबॉलचा अर्थ आपल्याला ठाऊक सुद्धा नसतो!

एखादी विशिष्ट आणि महत्त्वाची गोष्ट समजावून सांगायची असल्यास symbol चा वापर केला जातो. अश्या महत्वाच्या गोष्टी दर्शवणारे अनेक symbol आपण अनेक गोष्टींवर पाहत असतो.

असाच एक symbol आपल्याला नजरेस पडतो USB  (Universal Serial Bus) वर!

हे symbol काहीसं त्रिशूळासारखं दिसतं. या symbol मागे देखील एक कहाणी आहे. चला जाणून घेऊया या symbol मागचा अर्थ!

 

usb-symbol-marathipizza02
medianp.net

 

पाहायला गेलं तर हा  symbol फक्त USB वरच असतो असं नाही, तर इतरही अनेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेजवर पाहायला मिळतो.

या symbol मागे कोणतेही अधिकृत असे कारण नाही, पण त्या संदर्भात आजवर अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत.

 

usb-symbol-marathipizza01
medianp.net

 

एक प्रसिद्ध सिद्धांत असा सांगतो की, एका गोष्टीने अनेक समस्या दूर करणे असा या symbol चा अर्थ आहे. म्हणजे USB च्या माध्यमातून तुम्ही एका पोर्ट मध्ये कितीतरी डिव्हाईस कनेक्ट करू शकता.

पूर्वी डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पोर्टचा वापर करावा लागायचा. म्हणजेच माउस साठी  वेगळा पोर्ट, कीबोर्डसाठी वेगळा पोर्ट ई.

यावरून असे सिद्ध होते की, symbol वर असलेले चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ सारखे भूमितीय चिन्ह असे दर्शवतात की हा एक Standard पोर्ट आहे.

usb-symbol-marathipizza03
pinterest.com

 

तसेच हा प्रसिद्ध सिद्धांत असेही सांगतो की  हा symbol म्हणजे  Neptune च्या त्रिशूळची कॉपी असू शकतो.

त्रिशूळ ज्याप्रमाणे शक्तीचे प्रतिक आहे त्याचप्रमाणे USB symbol चा त्रिशूळ तांत्रिक शक्तीचा प्रतिक असावा.

त्याचबरोबर या USB symbol वर असणाऱ्या प्रत्येक चिन्हाचा देखील काहीना काही अर्थ आहे.

यावर असलेला बाण/त्रिकोण Serial Data चे प्रतिक आहे, वर्तुळ हे 5V चे प्रतिक आहे ज्या वोल्टेजवर हे काम करते, तसेच चौकोन त्याचे ग्राउंड वोल्टेजचे प्रतिक आहे.

 

usb-symbol-marathipizza04
totalphase.com

 

काय? आता लक्षात आला ना या USB symbol मागचा अर्थ! मग इतरांनाही सांगा की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?