' एअर कंडिशनर आपल्या गर्मीवर उपाय म्हणून जन्मलंच नव्हतं मुळी! वाचा एसीच्या जन्माची रोचक कहाणी!

एअर कंडिशनर आपल्या गर्मीवर उपाय म्हणून जन्मलंच नव्हतं मुळी! वाचा एसीच्या जन्माची रोचक कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एसी अर्थात एयर कंडिशनर. मानवाच्या रोजच्या जीवनशैली मध्ये जोडलं गेलेलं अजून एक यंत्र. घर,ऑफिस,वयक्तिक चार चाकी पासून ते आता प्रवासाच्या बस, रेल्वे पण ‘एसी युक्त’ झाल्या आहेत.

ओला-उबेर मधून प्रवास करताना पाऊस असला तरी कमी प्रमाणात एसी ही चालूच असते. या ना त्या प्रकारे रोज कुठे ना कुठे एसीशी संबंध हा आपला येतच असतो.

तर एसी म्हणजे नेमकं काय? बंदीस्त खोलीचे बाहेरच्या वातावरणाच्या तापमानानुसार थंड ठेवणारे यंत्र.

तर या एसीचा शोध मानवाला गरम होत आहे, त्याला पर्याय म्हणून वातावरण थंड व्हावं म्हणून पर्यायी मशीनरी म्हणून शोधली गेली का? नाही! तर आज पाहूया या एसीची जन्म कसा झाला,कोणी लावला आणि कुठे लागला या सगळ्या प्रश्नाकडे.

 

air conditioner inmarathi

 

१८ व्या शतकाच्या शेवटी आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत औद्योगिक विस्ताराने कळस गाठला. रोज नवनवीन कंपन्या आणि फॅक्टरी स्थापन होत होत्या.

कॉफी, कपडे, मशीनरीज आणि बरेच उद्योग. त्याप्रमाणे वातावरणात सुद्धा बदल व्हायला लागला. अमेरिकेच्या वातावरणात दमटपणा वाढू लागला. आणि त्यामुळे पेपर इंडस्ट्री, कापड गिरण्या यांना त्याचा थेट फटका बसू लागला.

कागद आणि कापड दोन्ही मटेरियल वातावरणनुसार आकुंचन आणि प्रसारण पावत असल्याने प्रोडक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलं.

तर याच प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला कामाला लावलं.

सॅकेट अँड विल्हेल्म्स, लिथोग्राफी अँड प्रिंटिंग कंपनी ही तत्कालीन पेपर इंडस्ट्री मधली नामांकित कंपनी त्यांच्या मल्टी कलर प्रिंटिंग प्रक्रियेत आलेल्या अडथळ्यांमुळे अडचणीत सापडली होती.

आर्द्रतेत बदल झाल्यामुळे कागद प्रसरण पावत असे आणि किंचित संकुचित होऊ लागला आणि त्यामुळे शाईच्या थरांमध्ये विचलन होई, परिणामी अपेक्षित कागद प्रिंट न झाल्यामुळे तो कागद स्क्रॅप होई आणि त्यामुळे कंपनीला बरंच नुकसान भोगावे लागले होते.

आद्रता आणि दमटपणा त्यांच्या या नुकसानाचे कारण होते आणि यावर त्यांना उपाय हवा होता. सॅकेट अँड विल्हेल्म्स यांनी मग कन्सल्टंट असलेल्या वॉल्टर टिमिस या अभियंत्याकडे मदत मागितली.

वॉल्टर टिमिस याने याच काँट्रॅक्ट जे.आयविर्ण लायल यांना दिले. लायल हे न्यूयॉर्क स्थित बफेलो फोर्ज या कंपनीचे प्रमुख होते.

बफेलो फोर्ज ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना फोर्जेस, पंखे, हॉट ब्लास्ट हिटर सारखे इक्विपमेंट सप्लाय करायचे.

शिवाय उत्तम अभियंते त्यांनी आपल्या कंपनीत कामाला ठेवले होते जे कस्टमर कंपन्यांच्या हिशोबाने त्यांना लागणाऱ्या इक्विपमेंटचे डिझाईन करत असे.

याच अभियंत्यांमध्ये एक होते, विलीस कॅरियर! जगप्रसिद्ध अशा कॅरियर कॉर्पोरेशनचे संस्थापक. लायल यांनी या समस्येच्या निदानाचे काम विलीस कॅरियर यांना दिले.

 

willis carrier inmarathi
carrier.com

 

सॅकेट अँड विल्हेल्म्स च्या ब्रूकिलीन प्लांट साठी सिस्टीम डिझाईनचे काम कॅरियर यांना मिळाले ते साल होते १९०२. कॅरियर त्या नुसार कामाला लागले आणि एक एन्ड प्रोडक्ट घेऊन उपस्थित झाले. जो मॉर्डन एसीचा पाया होता.

त्यांनी अशी सिस्टीम डेव्हलप केली होती,जी पाण्याच्या वाफेची जागा हिटिंग कॉईलच्या माध्यमातून येणारा थंड हवेचा प्रवाह घेत असे.

त्यामुळे कॉइल्सच्या पृष्ठभागावर तापमान संतुलित राहत असे आणि त्याप्रमाणे हवेचे तापमान इच्छित दवबिंदूपर्यंत खाली येईल. या सिस्टीममुळे हवेत गारवा निर्माण होऊन हवेत असलेली आद्रता ही कमी होऊ लागली.

कॅरियर यांच्या डिझाइनला प्रथम हवा आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी पंखे, हीटर आणि पाईप्सच्या सिस्टमसह उन्हाळ्यात स्थापित केले गेले.

५५% वर्षभर आर्द्रता टिकवून ठेवण्याच्या हिशोबाने ही सिस्टीम तयार केली होती. म्हणजेच उन्हाळ्यात ही सिस्टीम १००००० पौंड बर्फा एव्हढा गारवा निर्माण करू शकत होती.

कॅरियरच्या शोधाने समस्येचे मुळापासून निदान केले होते.

कॅरियर यांना प्रारंभिक मशीन आणि शोधाची संभाव्यता लक्षात आली आणि म्हणूनच पुढील पाच वर्षे त्यांनी कारखाने आणि इमारतींमध्ये आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करण्याच्या संकल्पनेभोवती साधने विकसित केली.

१९०७ येता येता अपेक्षेप्रमाणे कॅरियर बफेलो फोर्ज कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर पोहोचले.

बफेलो फोर्ज कंपनीने कॅरियर यांनी शोधलेल्या कुलिंग सिस्टीमला जगभरात विविध फॅक्टरी मध्ये इन्स्टॉल केले. या उद्योगाचा व्याप एवढा वाढला की शेवटी एयर कंडिशनर सेन्ट्रीक कंपनी स्थापन करण्याची गरज भासू लागली.

आणि याच गरजेतून निर्माण झाली, ‘कॅरियर एयर कंडिशनिंग कंपनी ऑफ अमेरिका.’ १९०९ मध्ये ही कंपनी अधिकृत रित्या कार्यरत झाली.

 

carrier company inmarathi
williscarrier.com

 

वातानुकूलन क्षेत्रात कॅरियर यांचे काम दस्तऐवज स्वरूपात जगाच्या समोर आले. कॅरियर यांनी १९११ च्या उत्तरार्धात अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) कडे हे दस्तऐवज सादर केले.

एसी सिस्टमच्या रचनेत तापमान आणि आर्द्रतेशी अचूकपणे जुळणारे चार्ट या दस्तऐवजमध्ये होते. पुढे अनेक वर्षे कॅरियर हे वातानुकूलिन क्षेत्रात अनभिषिक्त सम्राट होते.

१९१४ च्या सुमारास पहिले महायुद्ध सुरू झाले. अर्थव्यवस्था डळमळीत झाली. बफेलो फोर्जने कॅरियर एयर कंडिशनिंग विघटित करण्याची मागणी ठेवली.

भविष्यात येऊ घातलेले संकट पाहता लायल आणि कॅरियर यांनी नवीन कंपनी स्थापन केली,’कॅरियर इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन.’ साल होते १९१५.

१९२२ कॅरियर यांनी सेन्ट्रीफ्युगल रेफ्रिजरेशन मशीन अर्थात चिलर चा शोध लावला.

आणि वातानुकूलिन विश्वात नवीन क्रांती झाली. हे चिलर सिस्टीम आजही अनेक ऐसींमध्ये पाहायला मिळते.

चिलरचे एसी घर आणि गाड्यांसाठी सोयीस्कर झाले आणि सुरक्षित असल्या कारणाने जगभरात त्याची प्रचंड मागणी वाढली.

कॅरियर यांची वाढ आणि मागणी चालूच राहिली.

आणि १९२६ मध्ये, टेक्सासमधील सॅन अँटोनियो मधील २१ मजली मिलाम बिल्डिंग त्याच्या बांधकाम दरम्यान तळघर पासून छतापर्यंत वातानुकूलित पहिली गगनचुंबी इमारत ही कॅरियर इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन ने यशस्वीरित्या बांधून दाखवली.आणि यशाचा नवीन पायदंडा कॅरियर यांनी घातला.

 

san antonia inmarathi
mysanantonio.com

 

बाकी एसीचा विकास हा इतिहास आहे. एसी तयार करण्याचे तंत्र बदलले. पण कॅरियरच्या मशीन्सचा वापर करून जगभरातील अधिकाधिक इमारती थंड झाल्या.

तर, एका कागदाच्या कारखान्यासाठी तयार झालेले यंत्र आज जवळपास सगळीकडे दिसून येत आहेत.

अभियंते असलेल्या विलीस कॅरियर यांनी कसं एका सामान्य यंत्राला जगभर मागणीचे प्रोडक्ट बनवले याचा प्रवास नक्कीच उल्लेखनीय आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?