' प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा भावना असतात हे सिद्ध करून दाखवणारा एकमेव भारतीय वैज्ञानिक!

प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींना सुद्धा भावना असतात हे सिद्ध करून दाखवणारा एकमेव भारतीय वैज्ञानिक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत ही जशी संतांची भूमी आहे असं जसं मान्य केलं जातं, तसंच ती हुशार वैज्ञानिक लोकांची सुद्धा भूमी आहे. फरक इतकाच आहे की, शंभर वर्षांपूर्वी मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणात active नव्हतं. त्यामुळे किती तरी ग्रेट भरतीय माणसांची स्टोरी ही सामान्य माणसापर्यंत कधी पोहोचलीच नाही.

स्वातंत्र्यानंतर किती तरी वर्ष आपल्याकडे फक्त स्वातंत्र्यसैनिक, क्रिकेटर आणि राजकारणी लोकांचं कौतुक होत राहिलं.

‘जय जवान, जय किसान’ हा आपला नारा आहे. त्यामध्ये ‘जय विज्ञान’ हे जोडायला १९९८ हे साल उजाडावं लागलं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. अटल बिहारी वाजपेयी यांनी हा नारा पोखरण येथील यशस्वी अणूचाचणी नंतर हा नारा दिला होता.

 

atal bihari vajpeyee inmarathi

 

युरोपियन देशांचा इतिहास बघितला तर त्यांनी विज्ञानाला अधिक महत्व दिलं आहे यावर कोणाचं दुमत नसावं. हेच कारण असावं की, कित्येक बायोपिक सिनेमा झाल्यानंतरही भारतातील एकाही वैज्ञानिकावर अजून एकही सिनेमा तयार झाला नाही.

जगदीशचंद्र बोस – १८ व्या शतकात हे एक ग्रेट वैज्ञानिक भारतात होऊन गेले. यांचं आयुष्य हे एखाद्या सिनेमा सारखं होतं असं म्हणता येईल.

३० नोव्हेंबेर १८५८ रोजी मिमेनसिंग (सध्या बांगलादेशात आहे) इथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे सरकारी नोकरीत असिस्टंट कमिशनर म्हणून काम बघायचे. त्यासोबतच ते ब्राम्हो समाजाचे सदस्य होते.

प्राथमिक शिक्षण स्थानिक शिक्षण संस्थेतून पूर्ण केल्यानंतर जगदीशचंद्र बोस यांनी कलकत्ता येथील St. Xavier’s school इथे ऍडमिशन घेतलं. तिथे फादर लाफ्रंट यांनी जगदीशचंद्र बोस यांना नॅचरल सायन्सच्या गोडीला प्रोत्साहन दिलं.

जगदीशचंद्र बोस हे कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून भौतिक शास्त्राचे पदवीधर झाले.

जगदीशचंद्र बोस यांना इंग्लंड येथे सिव्हिल सर्विसेस मध्ये करिअर करायची इच्छा होती. पण, त्यांनी त्यांची नॅचरल सायन्स ची आवड जोपासत Cambridge मधून शिक्षण घेण्याचं ठरवलं.

 

jagdish chandra bose inmarathi
dnaindia.com

 

भारतात शिक्षण घेऊन परत आल्यानंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये भौतीकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांना या नोकरी मध्ये वर्णभेद सहन करावा लागला. त्यांचा पगार सुद्धा ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा कमी होता.

जगदीशचंद्र बोस यांनी तीन वर्ष पगार न घेऊन याबद्दल निषेध नोंदवला. कॉलेज प्रशासनाने याची दखल घेतली आणि त्यांना पर्मनंट केलं आणि त्यांना तीन वर्षाचा पगार देण्यात आला.

जगदीशचंद्र बोस यांची जगाला ओळख १९०१ मध्ये झाली जेव्हा त्यांनी रॉयल सोसायटी ऑफ लंडन इथे झाडांवर एक प्रयोग केला. या प्रयोगातून त्यांनी हे सिद्ध केलं की, झाड सुद्धा माणसासारखे विचार करतात. झाडांना सुद्धा भावना असतात.

त्यांनी विषारी ब्रोमाईड सोल्युशन च्या एका भांड्यात एका झाडाला ठेवले. मोठ्या स्क्रीन वर त्यांनी हे दाखवलं की, विषारी सोल्युशन आहे हे कळल्यावर झाड कसे react करतात आणि स्वतःला वाचवण्यासाठी कशी धडपड करतात.

झाडांचा प्रयत्न असफल होतो आणि मगच ते जीव सोडतात. झाड सुद्धा कोणत्याही प्राण्याप्रमाणे विचार करतात हे त्यांनी या प्रयोगातून सिद्ध केलं.

त्यांच्या इन्स्ट्रुमेंट ला त्यांनी क्रेस्कोग्राफ हे नाव दिलं. या इन्स्ट्रुमेंट च्या आधारे त्यांनी बरेच प्रयोग केले. जगभरातील शास्त्रज्ञांनी त्यांचं कौतुक केलं.

 

crescograph inmarathi
ebdir.net

 

जगदीशचंद्र बोस यांनी दोन पुस्तकं सुद्धा लिहिली ज्यांचं नाव होतं : Response in the Living and Non Living आणि The Nervous Mechanism of Plants.

जगदीशचंद्र बोस यांनी सुरुवातीला मेडिसिन या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं होतं. पण, त्यांना विज्ञान प्रयोगशाळेतील डिसेक्शन रुम चा वास सहन झाला नाही आणि ते आजारी पडले. त्यानंतर त्यांनी नॅचरल सायन्स हा विषय निवडला आणि त्यामध्ये इतकी प्रगती केली.

जगदीशचंद्र बोस यांनी काही वर्षांनी रेडिओ लहरींवर सुद्धा रिसर्च केला. त्यांनी कोहेरर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं जे की रेडिओ वेव्हस चा तपशील देऊ शकत होतं.

१८९५ मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी Polarisation of Electric Rays by Double Reflecting Crystals या विषयावर एक रिसर्च पेपर तयार करून सादर केला. हा रिसर्च रॉयल सोसायटी ऑफ लंडन ने १८९६ मध्ये प्रकाशित केला.

जगदीशचंद्र बोस यांच्याकडून एक चूक झाली की त्यांनी या प्रयोगाचं पेटंट करून ठेवलं नाही. १८९७ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी वायरलेस टेलिग्राफी या विषयावर त्यांचा रिसर्च सादर केला.

हा रिसर्च जगदीशचंद्र बोस यांच्या रिसर्च सोबत तंतोतंत जुळणारा होता. फरक एकच होता की इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी १८९६ मध्ये पेटंट रजिस्टर करून घेतला होता.

जगदीशचंद्र बोस यांनी जरी महत्वाचं काम केलं असलं तरीही रेडिओ आणि वायरलेस waves या शोधाचं पूर्ण क्रेडिट मार्कोनी यांना मिळालं.

 

j c bose inmarathi
cv.nrao.edu

 

१९१७ मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी बोस इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. झाडांवर रिसर्च करण्यासाठी त्यांनी या इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. या इन्स्टियुट मध्ये त्यांनी तयार केलेले सर्व आधुनिक उपकरणं जतन करून ठेवण्यात आले आहेत.

जगदीशचंद्र बोस यांनी तयार केलेल्या multi beam receptor या उपकरणाचा वापर हा NRAO 12 Meter Telescope या अमेरिकेतील ऍरिझोना येथील इन्स्ट्रुमेंट मध्ये करण्यात आला आहे.

विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी ब्रिटिश सरकार ने जगदीशचंद्र बोस यांना companion ऑफ इंडियन एमपायर म्हणून १९०३ मध्ये पुरस्कृत केलं. त्याशिवाय १९१२ मध्ये companion ऑफ स्टार ऑफ इंडिया म्हणून पुरस्कृत केलं.

१९२० मध्ये त्यांना फेलो मेंबर ऑफ रॉयल सोसायटी म्हणून निवडण्यात आलं. १९७७ मध्ये सर नेव्हिल मॉट यांना नोबेल प्राईझ देण्यात आलं.

त्यावेळी नेव्हिल मॉट म्हणाले “जगदीशचंद्र बोस हे काळाच्या ६० वर्ष पुढे होते. त्यांनी N-type आणि P-type सेमिकंडक्टर चा भविष्यातील वापर आधीच शोधून काढला होता.”

जगदीशचंद्र बोस यांच्या नावाने The Acharya Jagdish Chandra Bose Indian Botanic Garden या नावाने कोलकत्ता येथील हावडा इथे सुरू करण्यात आली.

 

j c college inmarathi
telegraphindia.com

 

२३ नोव्हेंबेर १९३७ रोजी झारखंड येथील गिरीदी इथे जगदीशचंद्र बोस यांचं निधन झालं.

३० नोव्हेंबेर रोजी गुगल ने जगदीशचंद्र बोस यांच्या नावाचं डुडल तयार करून त्यांच्या कामाची पावती दिली. याच जगदीशचंद्र बोस यांना त्यांच्या कॉलेज मधील लॅब मध्ये एकेकाळी प्रवेश नाकारण्यात आला होता.

ते त्यांचे प्रयोग हे २४ स्क्वेअर फीट च्या रूम मध्ये करायचे. ही जागा एखाद्या शास्त्रज्ञासाठी फारच कमी आहे.

जगदीशचंद्र बोस यांनी लिहिलेलं पुस्तक Polatok Toofan (Absconding Storm) हे वादळ कसं केश तेल च्या वापराने रोखता येऊ शकतं हे त्यांनी सिद्ध केलं. या पुस्तकात त्यांनी तेल कसं जमिनीला धरून ठेवतं आणि पाण्याला धरून ठेवतं हे त्यांनी सिद्ध केलं आहे.

जगदीशचंद्र बोस हे सर्वोत्तम शिक्षकांपैकी एक म्हणून गणले जातात.

जगदीशचंद्र बोस यांचं नाव हे चंद्रावरील एका खड्ड्याला देण्यात आलं आहे. ही जागा डॉक्टर भाभा यांचं नाव दिलेल्या crater च्या शेजारी आहे. या crater चा परीघ हा ९१ किलोमीटर इतका आहे.

जगदीशचंद्र बोस यांनी विज्ञान क्षेत्रासाठी काम करून भारतीयांची इतकी मान उंचावली आहे. भारतरत्न हा मान त्यांना दिलाच पाहिजे हे आमच्या प्रमाणे तुमचं सुद्धा मत झालं असेलच.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?