'विश्वास बसणार नाही, पण "सेल्फी" चा उगम झालाय चक्क १८३९ मध्ये!! हा प्रवास एकदा वाचाच

विश्वास बसणार नाही, पण “सेल्फी” चा उगम झालाय चक्क १८३९ मध्ये!! हा प्रवास एकदा वाचाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘सेल्फी’ – सोशल मीडियाची क्रांती झाल्यापासून सर्वात जास्त लोकप्रिय झालेला शब्द आणि फोटो प्रकार. कोणत्याही नवीन ठिकाणी आपण गेलो आणि तिथे एकही सेल्फी काढला नाही, असं फार क्वचितच किंवा फोटोग्राफी वर बंदी असल्यावरच होतं.

सेलेब्रिटींना भेटल्यावर ऑटोग्राफ म्हणजेच सही साठी साठी आधी तरुण -तरुणी धडपड करायचे. सेल्फीच्या ओघात हे सगळं मागे पडलं आहे. आज प्रत्येक जण पटकन मोबाईल काढतो आणि सेल्फी काढून ती आठवणकैद करून ठेवतो.

 

srk clicking selfie inmarathi

 

सेल्फीचा मोह हा फक्त तरुणांनाच आहे असं नाहीये. आपण मध्यंतरी काही राजकारणी सुद्धा बघितले होते, जे की दुष्काळाच्या पाहणीसाठी गेले होते आणि तिथे त्यांनी चक्क सेल्फी काढले होते.

एका राजकारण्याने तर पुराच्या पाहणीला गेले असताना सेल्फी काढून लोकांचा रोष ओढवून घेतला होता.

‘सर्वात पॉवरफुल सेल्फी’ म्हणून मागच्या वर्षी एका सेल्फी ची खूप चर्चा झाली होती. तो सेल्फी एका भारतीय मुलाने क्लिक केला होता. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना हा सेल्फी त्याने काढला होता.

त्या सेल्फी मध्ये दोन राष्ट्राचे प्रमुख आणि तो भारतीय मुलगा होता. त्या मुलाच्या समय सुचकतेचं आणि त्या दोन्ही नेत्यांनी त्याला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचं पूर्ण जगाने कौतुक केलं होतं.

 

selfie inmarathi
dnaindia.com

 

असाच एक सेल्फी खूप चर्चेत आला होता, जेव्हा बराक ओबामा यांनी एक सेल्फी नेल्सन मंडेला यांच्या समाधीच्या ठिकाणी काढला होता.

कधी कधी प्रश्न पडतो की खरंच कुठून आलं हे ‘सेल्फी’ प्रकरण ? जाणून घेऊयात.

सेल्फी हा शॉर्टफॉर्म आहे ‘self portrait’ या शब्दाचा. स्वतःचा फोटो आपण स्वतः काढू शकतो ही भावना लोकांना फार आवडली आणि ती लोकप्रिय झाली असं म्हणता येईल.

त्यातल्या त्यात कोणत्याही पर्यटन स्थळी कोणाला “आमचा एक फोटो काढून देता का ?” हे म्हणायची गरज नसल्याने लोकांनी मोबाईल कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या या “फ्रंट कॅमेरा” तंत्रज्ञानाला अक्षरशः डोक्यावर घेतलं.

 

selfie inmarathi
indianexpress.com

 

हे परत सांगण्याचं कारण हे, की २०१३ मध्ये ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीने सेल्फी या शब्दाला “Word of the year” हे नाव दिलं होतं.

पहिला सेल्फी कोणी काढला असेल?

फेसबुक आणि इन्स्टग्राम सुरू होण्याच्या किती तरी आधी अमेरिकेचा फोटोग्राफर Robert Cornelius ने स्वतःचा daegurerreotype या जुन्या फोटोग्राफीच्या पद्धतीने १८३९ मध्ये सेल्फी काढला होता.

 

Robert Cornelius inmarathi1
pinterest.com

 

या पद्धती मध्ये सिल्वर कोटेड कॉपरला पॉलीश केलं जायचं. काही क्षणासाठी त्या पेपरला कॅमेरा समोर ठेवलं जायचं आणि फोटो काढला जायचा.

याच पद्धतीने १८४६ मध्ये अब्राहम लिंकन यांचा काढलेला फोटो हा सुद्धा लोकप्रिय झाला होता.

१९१४ मध्ये रशियाची १३ वर्षीय मुलगी Anastasia Nikolaevna हिने १९०० मध्ये शोध लागलेल्या Kodak Brownie या कॅमेराने एक सेल्फ पोर्ट्रेट क्लिक केला आणि एका मित्राला पाठवला आणि त्यासोबत एक नोट लिहून पाठवली की,

“I took this picture of myself looking at the mirror. It was very hard as my hands were trembling.”

१८९२ साली Manhattan मध्ये  सुरू झालेल्या फोटो स्टुडिओमधील काही फोटोग्राफर्सनी १९२० साली हातात मोठा कॅमेरा घेऊन सेल्फी काढला होता.

हा कॅमेरा इतका जड होता, की तो दोन माणसांनी पकडला होता. Museum of the City of New York’s मध्ये हा फोटो जपून ठेवण्यात आला आहे.

 

selfie inmarathi2
georgianjournal.g

 

सेल्फी प्रचलित कोणी केला?

ऑस्ट्रेलियाने मॉडर्न डे सेल्फीला पुढे आणण्याचं श्रेय घेतलं आहे. सप्टेंबर २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील काही मुलांनी वेबसाइट तयार करून त्यावर सेल्फी अपलोड केले.

१३ सप्टेंबर २००२ या दिवशी सेल्फी ही टर्म पहिल्यांदा वापरली होती.

हॉलिवूड चा कॅमेरामॅन Lester Wisbord यांनी पहिल्यांदा सेलिब्रिटी सोबत सेल्फी क्लिक करून १९८१ पासून ही प्रथा सुरू केली होती.

 

selfie inmarathi3
dailymail.co.uk

वैद्यकीय क्षेत्रातील काही लोकांनी खूप जास्त सेल्फी घेणं हे तुमच्या कमकुवत मानसिक स्वास्थ्याचं लक्षण आहे हे सांगितलं आहे. याला कारण ही तसंच आहे.

अमेरिकेच्या Danny Bowman या १९ वर्षीय तरुणाने त्याचा सेल्फी चांगला आला नाही, म्हणून काही वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. Bowman हा रोज जितका वेळ जागा असायचा तितका वेळ फक्त सेल्फी काढायचा. त्याचं वजन कमी झालं, त्याला शाळेतून काढण्यात आलं.

सतत सेल्फी काढणं हे  dysmorphic disorder आणि anxiety disorder चे लक्षण आहे. Danny Bowman हा या आजराने ग्रस्त झालेला होता.

मोबाईल फोन्स पैकी Sony Ericsson Z1010 हा फोन २००३ मध्ये लाँच झाला होता. या फोन मध्ये सर्वात पहिल्यांदा फ्रंट कॅमेरा देण्यात आला होता.

२०१५ मध्ये सेल्फी स्टिक ही कन्सेप्ट पहिल्यांदा मार्केट मध्ये लाँच करण्यात आली होती आणि ती सुद्धा लोकांना प्रचंड आवडली आहे. सेल्फी स्टिक मुळे तुम्ही एका सेल्फी मध्ये जास्त लोकांना घेऊ शकतात.

 

selfie inmarathi4
daily.social

 

मध्यंतरी एक सर्व्हे आला होता, ज्यात हे सांगण्यात आलं होतं की, सेल्फी मुळे बरेच लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत आणि त्यामुळे रशियाने २०१५ मध्ये एक ‘सेल्फी सेफ्टी गाईड’ लाँच केलं आहे.

इंटरनेट वर ते उपलब्ध आहे, ते सर्वांनी डाउनलोड करावे असं आवाहन करण्यात आलं आहे.

सेल्फीमुळे स्वतःचे फोटो काढता येतात हे खरं आहे, पण त्यामुळे जर का आपलं मानसिक स्वास्थ्य जर का बिघडत असेल, तर माणसाने ‘कुठे थांबायचं?’ हे स्वतः ठरवलं पाहिजे.

सेल्फी या तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून घेऊ या आणि आनंदात जगू या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?