' तुमचा मूड चटकन फ्रेश करणारे चहाचे हे "१२ प्रकार"! ट्राय करताय ना?

तुमचा मूड चटकन फ्रेश करणारे चहाचे हे “१२ प्रकार”! ट्राय करताय ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा हे प्रत्येक भारतीयाचे अत्यंत अवाडीचे, जिव्हाळ्याचे पेय आहे. चहा आपल्यासाठी अमृततुल्यच!!

नवीन शेजाऱ्यांशी ओळख करून घ्यायची असेल तर चहाचे आमंत्रण देणे, लग्न ठरवताना सुद्धा चहा पोह्यांचा कार्यक्रम करणे, पावसाळ्यात चहा घेत घेत पाऊस बघत बसणे, भरपूर काम असेल तर ताजे तवाने होण्यासाठी चहा घेणे, कॉलेजच्या कट्ट्यावर गप्पा रंगताना कटिंग चहा पिणे अशा कित्येक रमणीय प्रसंगी चहा असतोच.

 

Tea Manish Dhane Flickr InMarathi
Manish Dhane Flickr

 

आपल्याला किती ही कॉफीचे  आमिष दाखवले, तरी सच्चा चहा प्रेमी हा नेहमी चहा कडेच वळतो.

हल्ली चहा आवडणारी व्यक्ती स्वतः ला “चाय लवर” म्हणून संबोधित करून घेण्यात अभिमान मानते. म्हणजे किती ही आपली चहाची आवड.

चहात योग्य त्या जडी बुटी टाकल्या, तर चहा सारखे गुणकारी औषध नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तर तुम्हाला हे माहीत आहे का, की आपल्याला मुडला अनुरूप असा चहाचा आस्वाद घेतल्यास त्या चहाचा आपल्याला जास्त फायदा होतो?

होय, आपल्याला ज्या वेळी जे वाटत असतं, त्या आपल्या मुड नुसार विविध चहाचे प्रकार सांगितले जातात… चला बघूया.

१) ग्रीन टी-

 

green tea inmarathi
baltana

 

जर सकाळी उठल्यावर फ्रेश नसेल वाटत, ती मरगळ जातच नसेल तर ग्रीन टी घ्या.

त्यात असलेल्या L-theanine या अमिनो अॅसिड मुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते, आपली मरगळ पटकन नाहीशी होते व आपल्यात स्फूर्ती येते. थकवा जाणवत नाही.

 

२) मसाला चहा –

 

clove tea inmarathi
dupischai.com

 

आपल्या भारतात मसाला चहा जास्त पसंत केला जातो. त्याची चवही तशीच असते. मसाला चहा अत्यंत गुणकारी असतो, कारण त्यात वेलची, आलं, काळी मिरी, सुंठ, दालचिनी, तुळशी अशा कित्येक जडीबुटी वनस्पती असतात.

या सगळ्यांचे अर्क उतरून हा चहा जितका चविष्ट लागतो, तितकाच आपल्याला आनंदी ठेवतो. त्यामुळे आनंदाला द्विगुणित करायचे असेल किंवा आनंदी, उत्साही वाटून घ्यायचे असेल तर मसाला चहा घेऊन पाहा.

 

३) केमोमाईल टी –

 

chamomile flower inmarathi
gardenerspath.com

 

जर भरपूर ताणग्रस्त वाटत असेल, शांत व हलके वाटून घ्यायचे असेल, तर केमोमाईल टी घ्यावा.

या छोट्याशा फुलात, आपला तणाव घालवण्यासाठी लागणारे सगळे गुणधर्म असतात. कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तो या चहाने नक्की कमी होतो.

 

४) लॅव्हेंडर टी –

 

lavendar tea inmarathi
healthline.com

 

हे लहानसे, नाजूक, सुवासिक फुल प्रसन्न वातावरण तयार करायला मदत करते हे ठाऊक होतेच. पण या फुलाचा चहा घेतल्यास, निद्रानाश, गाढ झोप न लागणे या सारख्या समस्त झोपेच्या समस्यांचा नाश होतो.

Insomnia च्या उपचारासाठी या चहाचा वापर करतात. यातील घटक मेंदूला शांत करून, झोपी जाण्यास मदत करतात.

 

५) टार्ट चेरी टी –

जर कधी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, ब्लड प्रेशर वाढले असेल तर ह्या चहाचे सेवन करावे. याने शरीरातील रक्तस्राव नियमित होतो व शांत वाटते.

६) ब्लॅक टी –

 

immunity tea inmarathi2
shutterstock.com

सकाळी उठल्यावर जर उत्साही वाटत नसेल, गुंगी असेल तर काळा चहा घेऊन पहा.

काळ्या चहात कॅफिन असते, ज्या मुळे झोप पटकन नाहीशी होते व तुमचा मेंदू एकदम अॅक्टिव होतो.

७) ऑरेंज टी –

हा चहा संत्र्याच्या सालींपासून बनवतात.

सतत चीड चीड होत असेल, रागावर नियंत्रण राहत नसेल तर ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. संत्र्याच्या सालींचा चहा राग शांत करण्यास मदत करतो व आपले मानसिक स्वस्थ जपण्यासाठी अत्यंत मदतगार ठरतो.

८) आल्याचा चहा –

 

immunity tea inmarathi1

 

तरतरीत वाटण्यासाठी व सर्दी, खोकला, ताप, किंवा घशा संबंधी आजार व इन्फेक्शन घालवण्यासाठी आल्याचा चहा हे अत्यंत गुणकारी औषध आहे.

जर दुःखी, असंतुष्ट वाटणे, घाबरल्यासारखे वाटत असेल तर ह्या चहामुळे शरीरात स्फूर्ती येते व आपल्याला उत्साही वाटू लागते.

 

९) पुदिन्याचा चहा –

पुदिना ताजे तरतरीत वाटण्यासाठी व सतर्क करण्यासाठी वापरतात हे आपल्याला ठाऊक आहेच. ह्या चहा मुळे आपले मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहते.

 

१०) केसर चहा –

 

kesar tea inmarathi
youtube.com

 

केशर दुधात घालून पितात हेच आपण ऐकले होते, पण केशराच्या २-३ काड्या चहात टाकून, उकळून घेतल्या व हा चहा आपण प्यायलो तर डिप्रेशन वर मात करता येऊ शकते.

केशर हे अँटीडीप्रेसंट असते. या चहा मुळे सामान्य व मध्यम स्तरावरचे डिप्रेशन पूर्णतः घालवता येते. त्यामुळे हा चहा नक्की पिऊन पहा.

 

११) आलं, मध, लिंबू घालून केलेला चहा –

 

ginger tea inmarathi

 

आलं, मध, लिंबू घालून तयार केलेल्या चहात अँटी ऑक्सीडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

 

१२) हळदीचा चहा/ टर्मरिक टी –

अनोशा पोटी हळदीचा चहा घेतल्यास शरीरातील अतिरिक्त अॅसिड नाहीसे होते. त्वचा उजळते व हळदीचे तर अगणित फायदे आहेत.

तर मग, आतापासून जसा मूड असेल तसा चहा घेऊन बघाच!!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?