'इच्छापूर्तीसाठी पाण्यात टाकलेली नाणी ठरतायत मत्स्यालयाची तारणहार...!

इच्छापूर्तीसाठी पाण्यात टाकलेली नाणी ठरतायत मत्स्यालयाची तारणहार…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाच्या काळात आपल्यापैकी कित्येक जणांना कोणत्या गोष्टीने तारून नेलं असेल, तर ती म्हणजे आपली पैसे बचत करण्याची सवय.

पैसे तांदळाच्या डब्यात जमा करून ठेवणे याच संकल्पनेने बँक क्षेत्राचा उगम झाला असावा असं नेहमी वाटतं. जेव्हा गरज असते, तेव्हा हेच पैसे आपल्याला कामी येतात हे आपण सर्वच जाणतो.

बचत किंवा किंवा सध्याचा लोकप्रिय शब्द ‘सेविंग’ ही सध्या आणि इथून पुढे फारच महत्वाची गोष्ट असणार आहे.

 

savings inmarathi

 

मागच्या सहा महिन्यात आपण बघितलं की, कित्येक धार्मिक संस्थांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारला आर्थिक मदत केली. कित्येक लोकांना घरातील मनी बँकचा आधार झाला.

जसा घराचा अर्थव्यवहार चालतो, तसाच कोणत्याही संस्थेचा किंवा कार्यालयाचा सुद्धा कारभार चालत असतो.

या लेखात आम्ही अमेरिकेतल्या एका aquarium बद्दल सांगणार आहोत, ज्यांना लोकांनी wish (इच्छा) म्हणून टाकलेल्या नाण्यांचा चांगलाच आधार झाला आहे. काय आहे ही गोष्ट? जाणून घेऊयात. 

 

north carolina aquarium
indiatimes.com

 

आपल्या लहानपणी आपण पाहिलं असेल, की काही मंदिरांमध्ये भिंतीवर पैसे चिकटवण्याची पद्धत होती. काहींचे हे पैसे चिकटायचे, तर काहींचे नाही. अर्थात, ही एक अंधश्रद्धा होती, की ज्याचे पैसे चिकटले त्याची मनोकामना पूर्ण होईल.

या सोबतच, अजून एक पद्धत आपल्याकडे आजही आहे. आपण कोणत्या बस किंवा ट्रेनने एखाद्या नदीच्या बाजूने किंवा पुलावरून जात असलो की, काही लोक त्या पाण्यात नाण्यात टाकतात. असं करताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही इच्छा असते.

ही सगळी उदाहरण बघून आपल्याला असं वाटू शकतं की, फक्त भारतीय लोक अंधश्रद्धाळू आहेत. पण, तसं नाहीये.

विज्ञानाची ताकद फक्त मानणाऱ्या आणि महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतील लोक सुद्धा अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात, याचा प्रत्यय आला आहे.

नॉर्थ कॅरोलिना aquarium या Pine Knoll shores या अमेरिकेतील मत्स्यालयाची ही बातमी आहे.

 

north carolina aquarium4
tripadvisor.in

 

वर्षभर पर्यटकांची रेलचेल असलेलं हे मत्स्यालय कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावामुळे मागील पाच महिन्यांपासून बंद आहे. आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. मात्र त्यांनी यावर एक उपाय शोधून काढला.

मत्स्यालयात असलेल्या एका ३० फूट उंच डोंगरासारख्या रचनेमध्ये, कृत्रिम धबधब्यामध्ये एक शोध मोहीम सुरू केली. त्यांना १०० गलॉन्स म्हणजे जवळपास ४०० लिटर इतकी नाणी सापडली.

 

north carolina aquarium1
timesnownews.com

 

ते सर्व कॉइन्स संस्थेने स्वच्छ केले आणि त्यांचे वर्गीकरण केले. हे पैसे प्राण्यांच्या आणि मत्स्यलयाच्या देखरेखीसाठी वापरले जातील असं संस्थेने सांगितलं.

हे पैसे नेमके किती आहेत याचा आकडा अजून समोर आला नाहीये. पण, तो नक्कीच मोठा आकडा असणार. कारण, १४ वर्षातली ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मत्स्यालय प्रशासनाला हे काम करायची गरज पडली आहे.

Wish कॉइन्स चा काही भाग हा तिथल्या स्थनिक बँकेकडे मोजण्यासाठी पाठवण्यात आला आहे. त्याशिवाय, मत्स्यालयात जी नाणी आहेत. त्यांना मोजण्यासाठी एका क्रेटला जवळपास चार तास इतका कालावधी लागला असं सांगण्यात आलं.

 

north carolina aquarium3
wbtv.com

 

१७ मार्च २०२० पासून बंद असलेल्या या aquarium चा हा पहिलाच आर्थिक व्यवहार होता.

कोरोनाच्या या कठीण समयात सुद्धा नॉर्थ कॅरोलिना मत्स्यालयाने तिथे असलेल्या हजारो माश्यांपैकी कोणाच्याही खाण्याची हेळसांड होणार नाही याची काळजी घेतली आहे.

तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काहींना कामावर हजर होण्यास सांगितलं आहे. तर काहींना घरून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वीज बिल आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी याच पैश्यांच्या वापर केला जाईल, अशी माहिती नॉर्थ कॅरोलिना संस्थेने दिली आहे. हीच पद्धत यानंतर काही प्राणी संग्रहालयांनी सुद्धा अवलंबली आहे अशी बातमी आहे.

 

north carolina aquarium2
unctv.org

 

या मत्स्यालयाने ही पूर्ण रक्कम किती असेल याचा एक अंदाज बांधण्यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. लोकांनी सुद्धा या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

एका व्यक्तीने ही रक्कम $10,855 (जवळपास ८ लाख रुपये) इतकी असावी असा अंदाज व्यक्त केला आहे आणि या उपक्रमाचं कौतुक सुद्धा केलं आहे.

आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी या संस्थेने काही ऑनलाईन राईड सारखे कार्यक्रम सुद्धा सुरू केले आहेत. त्यासोबतच, प्राणी या दिवसात कसे आहेत, त्यांची काळजी कशी घेतली जात आहे याची माहिती सतत त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येते.

लोकांशी जोडले राहण्याच्या इच्छेचं सर्वांनी कौतुक केलं आहे. लवकरच कोरोनावर लस उपलब्ध होईल या आशेने सध्या पूर्ण जग खूप आशावादी झालं आहे.

ही लस आपल्यापर्यंत लवकर पोहोचल्यास अशा किती तरी संस्थांना आणि तिथे येणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा ‘मोकळा श्वास’ घेण्यास मदत होणार आहे.

तो दिवस लवकरच उजाडला पाहिजे अशीच इच्छा बाळगूया!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?