' सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…! – InMarathi

सुशांतसिंग-सीबीआय प्रकरणात अक्षय कुमार होतोय ट्रोल…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अक्षयकुमार हा अनेकांचा लाडका अभिनेता आहे. बॉलीवूडमध्ये ज्या कलाकारांची नेहमीच चलती असते, त्यांच्यापैकी एक म्हणजे अक्षयकुमार! देशभक्ती व देशप्रेमावर आधारित अनेक चित्रपट त्याने केले आहेत.

भारतात जन्मलेला राजीव भाटिया, अर्थात अक्षयकुमार कॅनेडियन नागरिक असूनही, देशभक्त आहे असं म्हटलं जातं.

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत सुद्धा अक्षयकुमार यानं घेतली होती. प्रबोधन करणाऱ्या अनेक जाहिराती, देशभक्तीपर कार्य यांमध्ये तो अनेकदा दिसला आहे.

 

aksaykumar-modi-interview inmarathi
hindustantimes.com

 

भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चा अँबेसेडर म्हणूनही अक्षयकुमार याला आपण पाहिलं आहे.

त्याचं हे देशप्रेम सत्य आहे की निव्वळ दिखाऊपणा, हासुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे.  या उलटसुलट चर्चांमध्ये त्याचं कॅनेडियन नागरिकत्व हादेखील बहुतांशवेळा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

बॉलीवूडमधील चित्रपटांच्या माध्यमातून आपलं भारतावरील प्रेम व्यक्त करायचं आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा हाच फंडा अक्षयकुमार वापरात असल्याचं सुद्धा बोललं जातं.

त्याच्या अभिनयाइतकीच जोरदार चर्चा होते, ती त्याच्या या वागण्याची. सध्या सुद्धा अक्षयकुमार अशाच एका वादग्रस्त गोष्टीमुळे ट्रोल केला जात आहे.

याला कारण आहे, त्यानं सुशांत सिंह राजपूत केस विषयी काल केलेलं ट्विट!

 

akshaykumar-tweet inmarathi

 

इतके दिवस या विषयावर मौन बाळगून असलेला अभिनेता अक्षयकुमार याने ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आल्यानंतर, ट्विटच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल जाहीर केल्यानंतर, अभिनेता अक्षयकुमारचं ट्विट पाहायला मिळालं.

‘सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकसी सीबीआयकडे सोपवण्यात आली. सत्याचाच नेहमी  विजय व्हायला हवा’अशा आशयाचं हे ट्विट सामान्यांसाठी मात्र मोठा कुतूहलाचा विषय ठरलं आहे.

इतके दिवस या प्रकरणाविषयी चकार शब्दानेही प्रतिक्रिया न देणारा अक्षयकुमार आज अचानक व्यक्त झाल्यामुळे लोकांनी त्यालाच टार्गेट केलं असल्याचं दिसून येतंय.

अक्षयकुमारचा नवा सिनेमा किंवा ट्रेलर येत असणार, म्हणूनच या विषयावर त्याने आपलं मत व्यक्त केलं असा या प्रतिक्रियांचा सूर दिसत आहे.

#JusticeForSSR ची मागणी करण्यात येत होती, त्यावेळी हा बॉलीवूड स्टार कुठे होता, असा प्रश्न विचारताना ही मंडळी दिसत आहेत.

केवळ स्वतःच्या फायद्याच्या वेळी हे स्टार्स पुढे येतात; अक्षयकुमारचा सुद्धा खरा चेहरा तोच आहे, अशी भावना ट्विटरवर व्यक्त होताना दिसत आहे.

या ट्विटवरून नेमकं काय काय रामायण घडतंय? बॉलीवूडचे चित्रपट पाहणारी ही जनता नेमकं काय म्हणतेय, ते बघुयात..

अक्षयकुमार याचा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याविषयी लोक नेमकं काय म्हणालेत, त्याची झलक या ट्विट्समधून पाहता येईल.

 

laxmibomb-boycott inmarathi

 

laxmibomb-side-effects-tweet inmarathi

 

थोडक्यात काय, तर नवा सिनेमा तोंडावर असल्यामुळेच आता अक्षयकुमार त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय; असं यांचं म्हणणं आहे.

इतके दिवस होऊन गेले तरीही अक्षयकुमार सुशांत सिंह राजपूतच्या विषयावर का व्यक्त झाला नव्हता? हा प्रश्न विचारताना संमिश्र भावना पाहायला मिळत आहेत. यात त्याचे फॅन्स सुद्धा आहेत. ट्विट बघूनच हे समजतंय.

 

tanushree-roy-tweet inmarathi

 

हा फक्त आणि फक्त पीआर एजेन्सीचा खेळ असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय.

पुढील दोन्ही ट्विट्समध्ये, अक्षयचे फॅन्स सुद्धा कसे दुखावले गेलेत हे पाहता येतंय.

 

unexpected-from-u inmarathi

lost-a-fan-tweet inmarathi

 

या वागण्यामुळे तुम्ही एक सच्चा फॅन गमावलात… असं म्हणणाऱ्या, भावनिक झालेल्या या अशा फॅन्सचा रोष सुद्धा अक्षयकुमार याला पत्करावा लागणार यात शंकाच नाही.

 

68-days-sleep-tweet inmarathi

 

अनेक दिवस मौन बाळगून असलेला अभिनेता अक्षयकुमार, म्हणजे आधुनिक कुंभकर्ण आहे. ‘जाग आल्याबद्दल शुभेच्छा’ असा उपरोधिक सूर सुद्धा लावलेला पाहायला मिळतोय.

 

sanju-support inmarathi

 

गुन्हेगार ठरलेल्या संजय दत्तला सपोर्ट करणारा अक्षयकुमार आणि आज सुशांतकरिता न्याय मागणारा अक्षयकुमार हा विरोधाभास असल्याचं नेटिझन्स म्हणतायत.

अक्षयकुमार या अभिनेत्यावर थेट हल्ला चढवणारे काही ट्विट्स सुद्धा यात बघायला मिळतात. विविध विषयांवरील स्क्रिप्ट्स त्यालाच हव्या असतात. अक्षयकुमार हा फार मोठा कलाकार नाही. असा सूर या ट्विट्समधून बघायला मिळतोय.

 

little-star-tweet inmarathi

script-tweet inmarathi

 

त्याच्याच चित्रपटांमधील डायलॉग्सचा वापर करून त्याची खिल्ली उडवणारे हे ट्विट्स सुद्धा आकर्षक ठरत आहेत.

 

50-rs-overacting inmarathi

 

उशिरा का होईना, पण सुशांत सिंह राजपूतच्या विषयावर व्यक्त झालेला अक्षयकुमार त्याच्या या ट्विटमुळे टीकेचा धनी झालेला दिसतोय…!!!!

कदाचित अक्षय कुमार स्वतःला हेच विचारत असेल की…

 

akshay-kumar inmarathi
ndtv.com

 

😁

 

तुम्हाला काय वाटतं?!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?