' फेसबुकच्या निळ्या रंगाचं “हे” आहे गुपित! वाचा आणि जाणून घ्या… – InMarathi

फेसबुकच्या निळ्या रंगाचं “हे” आहे गुपित! वाचा आणि जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडिया हा आजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. प्रत्येक गोष्टीविषयी सोशल मीडियावर व्यक्त झाल्या शिवाय अनेक मंडळींचा दिवस मावळत नाही असं  म्हणता येईल. यात फेसबुकचे स्थान सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे.

फेसबुक ही जणू आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. जेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकचा अविष्कार केला तेव्हा त्याला देखील वाटले नव्हते की ही गोष्ट इतकी धुमाकूळ घालेल. पण आज तर अनेकांसाठी फेसबुकशिवाय जगणं अशक्य आहे.

असो पण तेव्हा त्याने धरलेला एक हट्ट आज त्याच्या आणि किंबहुना युजरच्या देखील चांगलाच कामी आला आहे.

२००४ साली जेव्हा फेसबुकची निर्मिती आणि स्थापना झाली तेव्हा मार्क झुकरबर्गने फेसबुकमध्ये निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आग्रह केला होता. त्याचा तो आग्रह त्याने पुरा केलाच म्हणा! म्हणूनच आज फेसबुकची निळाई सगळीकडे भरून राहिलेली आहे. फेसबुक म्हणजे निळा रंग असं जणू समीकरणच झालेलं आहे.

हा रंग आपल्याला हवाहवासा वाटतो. निळं फेसबुक खूपच आकर्षक आणि उत्तम दिसतं यावर कुणाचंही दुमत नसेल.

 

facebook-blue-marathipizza

 

स्रोत

आज फेसबुकच्या ब्रँड लोगोपासून ते त्यांच्या इंटरफेस पर्यंत सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला निळा रंगच दिसतो. फक्त फेसबुकचं नाही तर ट्विटर, स्काईप यांनीही निळ्या रंगाचा वापर केलेला आढळून येतो.

या मागचं एक कारण असं आहे की हा रंग डोळ्यांना जास्त त्रासदायक नाही आणि त्यामुळे युजर सहजपणे कोणत्याही त्रासाविना निळा रंग असलेल्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतो.

 

blue-theme-marathipizza

 

स्रोत

 

पण मार्क झुकरबर्गने आपल्या फेसबुकसाठी निळा रंग निवडला त्यामागे फक्त हे एवढंच कारण नव्हतं. तर त्यामागे त्याचं एक वैयक्तिक कारण देखील होतं. हे कारण त्याने स्वतःच स्पष्ट केलं आहे.

मार्क झुकरबर्ग एका रशियन टेलिव्हिजन शो मध्ये सहभागी झाला होता, तेव्हा त्याला या निळ्या रंगा मागचं गुपित विचारण्यात आलं आणि त्याने देखील जास्त आढेवेढे न घेता ते गुपित जगासमोर उघड केलं. हे वैयक्तिक कारण त्याने मोठ्या मनाने सगळ्या जगासमोर मांडलं आहे.

 

mark-zuckerberg-interview-marathipizza

 

स्रोत

या कार्यक्रमात मार्क झुकरबर्ग म्हणाला की,

मी कलर ब्लाइंड आहे (अर्थात त्याला इतरांप्रमाणे सामान्यत: काही रंग पाहताना त्रास होतो.) आणि मला निळा रंग उत्तमरीत्या दिसतो. म्हणून फेसबुकमध्ये जास्तीत जास्त निळ्या रंगाचा वापर करायचा माझा हट्ट होता.

कलर ब्लाईंड असणं हा खरं तर त्याच्या नजरेत असलेला एक दोष म्हणता येईल. त्याच्या नजरेतील ही कमतरता उघडपणे सांगताना त्याने कुठलाही संकोच बाळगला नाही. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार केला नाही. हा गुण सुद्धा शिकण्यासारखा नक्कीच आहे.

 

facebook-sign-up-marathipizza

 

स्रोत

मार्क झुकरबर्ग याला लाल आणि हिरवा रंग नीट ओळखता येत नाही. आपल्या डोळ्यासाठी इतर कोणत्याही रंगापेक्षा निळा रंग सर्वोत्तम असल्याचे तो आवर्जून सांगतो.

लाल आणि हिरवा रंग नीट दिसू शकत नाही आणि निळा रंगच उत्तमरीत्या दिसू शकतो हे मार्क झुकरबर्ग जाणून होता. म्हणूनच तो निळ्या रंगासाठी आग्रही होता. नुसता आग्रही नव्हता तर त्याने निळ्या रंगाचा हट्टच धरला होता.

अर्थात या निळ्या रंगाने क्रांती केली आहे असं म्हणता येईल.

काय मग? कसं वाटलं हे गुपित?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?