' नोकरी सोडून भाजी पिकवणारी ही उद्योजिका आज कमावतेय २० करोड, कसं काय? जाणून घ्या – InMarathi

नोकरी सोडून भाजी पिकवणारी ही उद्योजिका आज कमावतेय २० करोड, कसं काय? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पूर्वी आपल्या समाजात तीन गोष्टींवर आधारित एक वाक्प्रचार रूढ होता- उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. म्हणजे पैसा मिळवण्यासाठी उत्तम साधन शेती, व्यापार हा मध्यम मार्ग तर‌ नोकरी अगदी साधारण.

ज्याच्याकडं शेती आहे, जमीन आहे तो मनुष्य अगदी धनवान असं आजही म्हटलं जातं. स्थावर जंगम मालमत्तेत जमीन आधी येते.

या वीस वर्षांत जग खूप जवळ आलं आहे. शिक्षणाच्या प्रवाहात इतके वेगवेगळे बदल झाले, कितीतरी नवे ट्रेंड आले. नवनव्या विद्याशाखा निघाल्या. त्यानुसार लठ्ठ पगाराची नोकरी सहजासहजी उपलब्ध झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पूर्वी आई -वडील रिटायरमेंट घेताना जितका पगार घेत, तो पगार कितीतरी जणांचा नोकरीला लागताना आहे. आई बाबा थक्क होतील असं पॅकेज असणाऱ्या नोकऱ्या आहेत.

पण…. यातही एक असा वर्ग आहे, जो या पॅकेजवर समाधानी नाही. त्यांना लठ्ठ पगाराची नोकरी, परदेश वारी, ब्रँडेड कपडे, वस्तू यांचा मोह नाही… त्यांना आपल्या आवडीचं क्षेत्र पादाक्रांत करायचं आहे.

आपल्या नांवाचा ब्रँड बनवण्यासाठी झोकून देऊन काम करायचं आहे. मोठे नोकर होण्यापेक्षा छोटे मालक व्हा हे त्यांचं ब्रीद आहे.

आज अशाच एका वेगळ्या वाटेवर जाऊन आपलं स्थान निर्माण करणाऱ्या एका मनस्वी मुलीची कहाणी वाचूया. TCS सारख्या नामवंत कंपनीच्या नोकरीचा राजीनामा देऊन ,आपली वेगळी वाट निवडणारी आणि यशस्वी होणारी गीतांजली राजमणी.

 

geetanjali rajmani inmarathi4
yourstory.com

 

गीतांजली राजमणी एक चारचौघींसारखी मुलगी. ती लहान असतानाच तिचे वडील वारले. मूळचे केरळचे‌ असलेले राजमणी कुटुंब हैदराबाद येथे होते.

वडील अचानक गेल्यानंतर गीतांजली आणि तिच्या भावाची पालनपोषणाची जबाबदारी एकाकी आईवर पडली.‌ दोन मुलांचं शिक्षण, शिवाय घराचा व्याप हे एकाकीपणे चालवताना आईची फार ओढाताण होत होती.

आर्थिक ओढगस्त ही काही गीतांजलीला नवीन नव्हती, पण तरीही शिक्षण आणि शिस्त याबाबत आईनं‌ तडजोड कसलीही तडजोड केली नाही.

सुट्टीत ती आपल्या गावी केरळमध्ये जायची. तिच्या बाबांच्या गावी. बहुतांश सगळ्या उन्हाळी सुट्ट्या गीतांजली केरळमध्ये असायची. त्यावेळी ते झाडं, भाजीपाला याबाबत मिळालेलं ज्ञान तिच्या खूप पुढं जाऊन उपयोगात आलं.

 

geetanjali rajmani inmarathi
thehindu.com

 

गीतांजलीनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. सायन्सची पदवी घेतल्यानंतर तिनं एमबीए पूर्ण केलं. क्लिनिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये बारा वर्षं तिनं नोकरी केली. नंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेसमध्ये तिनं ग्लोबल बिझनेस रिलेशन मॅनेजर म्हणून काम केलं.

कोणतीही गोष्ट एकाएकी आपल्याला जमत नसते. त्यासाठी काही काळ त्याचा सराव करावा लागतो. एखादा व्यवसाय सुरु करताना त्यासाठी जमा खर्च, विक्री, लोकांची नेमणूक, त्याचं व्यवस्थापन हे सारं आधी थोडंसं तरी हाताळावं लागतं.

टाटामध्ये काम करताना गीतांजली हे सारं शिकत गेली. एव्हाना तिचं लग्न झालं होतं.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक तरी क्षण असा येतो, जिथं स्वतःची आवड आणि नोकरी यांचा मेळ बसत नाही हे लक्षात येतं. ज्यांना आवडीपेक्षा पैशाचा मोह असतो, ती माणसं नोकरी नेटानं करत राहतात. कदाचित नोकरी हीच त्यांची आवड असते.

पण गीतांजलीसारखी माणसं, ज्यांना मोठा नोकर बनण्यापेक्षा छोटा मालक होण्याची इच्छा असते, ते नोकरी सोडून आपलं आवडतं काम करायला सुरुवात करतात.

 

geetanjali rajmani inmarathi1
yourstory.com

 

गीतांजलीच्या मनातही आता आपला व्यवसाय सुरु करण्याचा मनसुबा घोळू लागला. काय करावं? जे सगळ्यांना गरजेचंअसेल, पण तरीही वेगळंही असेल…असा कोणता व्यवसाय सुरु करावा…??

सध्या शेतीवर मुबलक प्रमाणात वापरली जाणारी रासायनिक खतं, कीटकनाशके यांनी जमिनीचा पोत तर बिघडला आहेच, शिवाय खते आणि कीटकनाशके यांच्या अतिरिक्त वापराने कॅन्सर सारखे विविध प्रकारचे रोग मानवी शरीरात प्रवेश करत आहेत.

यावर एकच उपाय म्हणजे शेतात रासायनिक खते व कीडनाशके न वापरता सेंद्रिय शेती धोरण स्वीकारणे. या पर्यायावर गीतांजली जास्त ठाम होत गेली.

 

organic inmarathi
proffesionsolutions.com

 

आपल्या काकांकडे सुटीला गेल्यावर केरळमध्ये शेतीकामाचा अनुभव, भाजीपाल्याची लागवड करण्याचा प्रयत्न हे सारं गीतांजलीला माहीत होतंच.

पण आता वेळ होती, त्या माहितीचं रुपांतर ज्ञानात करुन लोकांबरोबर आपलाही व्यवसाय स्थिरस्थावर करण्याची. तो करताना मोबाईल अतिशय उपयुक्त ठरला.

गीतांजलीने दोन सहकाऱ्यांच्या मदतीने आपला नवा सेंद्रिय शेती व्यवसाय सुरु केला. त्याचं नांव ठेवलं फार्मिझन.

याच्या वापराने कोणीही शेतकरी ६०० स्वेअर फूट जागा दरमहा २५००/- रुपये दराने भाड्याने देतो आणि ग्राहक ती घेऊन तिथं हवी ती भाजी, पिकं घेऊ शकतो. अर्थातच त्या शेतकऱ्यांमार्फत.

 

geetanjali rajmani inmarathi2
homegrown.co.in

 

फार्मिझन या अॅपचा खूप मोठा वाटा ही नवीन पद्धत विकसित करण्यात आहे. ते केवळ जमीन भाड्यानेच घेत नाहीत, तर सेंद्रिय खतं, बियाणे, रोपं पुरवायचंही काम करतात.

इतकंच नाही तर ग्राहकांना सेंद्रिय उत्पादनं घरपोच देण्याचं कामही फर्मिझन करतं. यामुळे मधली दलाली घेणारे लोक बाजूला जाऊन शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होतो.

गीतांजली आणि तिच्या सहकाऱ्यांनी या कामात इतकी पारदर्शकता ठेवली आहे की, ग्राहकांना त्यांना मिळणारा शेतीमाल कोणत्या शेतकऱ्यांने दिला आहे हे समजतं.

जीपीएस तंत्रज्ञान वापरुन ते त्या शेतकऱ्याची शेतीही पाहू शकतात!!! भेट द्यावीशी वाटली, तर भेट देऊ शकतात.

गीतांजली म्हणते, आपले शेतकरी लाखाचे पोशिंदे असतात. पण सध्या शेती व्यवसाय अडचणीत आहे आणि हा लाखाचा पोशिंदा संकटात!!!

व्यवसाय सुरु करताना गीतांजली त्रिसूत्री सांगते- १. तयारी २. दृढनिश्चय ३. विचारांचं, कृतीचं प्राबल्य

या साऱ्या गोष्टी विचारात घेऊनच गीतांजलीनं फार्मझन हे अॅप बनवलं. याला अनेक लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे.

 

geetanjali rajmani inmarathi3
thebetterindia.com

 

आता यातही एकच अडचण आहे. लोक पोषणमूल्यांपेक्षा वस्तूंचा आकार बघतात. कसलंही रासायनिक खत किंवा औषध न मारल्यामुळे सेंद्रिय भाजल्या, फळं ही तशी लहान आकाराची राहतात.

इतर केमिकल्स मुळे फळांचा आकार वाढतो. मग लोक त्याला भुलतात. पण त्या रासायनिक संप्रेरकांनी शरीराची हानी होते हे त्यांना कळत नाही.

२०१७ साली सुरू केलेल्या या फार्मझनला १६ हजारांहून अधिक ग्राहकांनी पसंती दिली आहे. तर कंपनीने वर्षाकाठी २० कोटी टर्न ओव्हरचा टप्पा गाठला आहे.

मोठा नोकर होण्यापेक्षा छोटा मालक होण्याचं छोटंसं ध्येय बाळगलेल्या गितांजलीनं केवढा मोठं टप्पा गाठला बघा!!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?