' दक्षिण ध्रुवाकडच्या प्रदेशात सापडलेल्या जहाजाच्या मागचं नेमकं रहस्य काय?? – InMarathi

दक्षिण ध्रुवाकडच्या प्रदेशात सापडलेल्या जहाजाच्या मागचं नेमकं रहस्य काय??

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

तुम्ही हॉलिवूडचे सिनेमे पाहता का? पाहत असाल तर तुम्ही आजच्या आपल्या विषयाशी एकदम रीलेट करू शकाल. त्यांचे बरेच सिनेमे हे सायन्स फिक्शन असतात. त्यात कोणत्या तरी शास्त्रज्ञाने कोणता तरी शोध लावून, पृथ्वीचे समतोल आधी बिघडते.

मनुष्यावर भले मोठे संकट येते व त्यांच्या पैकी कोणी तरी एक त्या प्रश्नाचे समाधान काढतो. तो गमतीचा भाग सोडला तर खरंच या सिनेमानद्वारे आपल्याला भरपूर काही शिकायला पण मिळते, किंवा हे सिनेमे आपल्यातले कुतूहल आणि क्यूरीऑसीटी वाढवतात.

अंतराळ, चंद्र, सूर्य, तारे, प्रलय, प्राण्यांच्या प्रजातींचे शोध, अशा रहस्यमयी दुनियेत आपल्याला नेण्याचे काम हे सिनेमे करतात. हे असले शोध खऱ्या आयुष्यात पण लागू शकतात आणि त्याचेच एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत.

 

space inmarathi 2
naradakush.nl

 

निसर्ग हीच मुळात एक मोठी संकल्पना आहे. अंतरीक्ष त्यातील घटक, आपल्यासाठी फार कुतूहलाचा व आकर्षणाचा विषय असतात.

निसर्गाच्या वेगवेगळ्या लीला, जसे ग्रहण, डेड सी, समुद्राला येणारी भरती – ओहोटी, ज्वालामुखी, नैसर्गिकच गरम व उकळत्या पाण्याचे तलाव, काही ठिकाणांची भौगोलिक रचना या सगळ्या गोष्टी आपल्याला फार आकर्षक व अचंबित करणाऱ्या वाटतात.

पृथ्वीवर तर अशी कित्येक रहस्ये आहेत जसे बर्मुडा ट्रायांगल, भारतातील ज्वाला देवी गुहेतील न विझणाऱ्या ज्योती, रेड सी, बुलढाण्यात आत्ताच रंग बदललेले लोणार सरोवर, आणि अजून किती असतील.

आपली पृथ्वी अरबो वर्षे जुनी आहे. कित्येक प्रजातींचे आपल्या पूर्वी या पृथ्वीवर अस्तित्व होते हे आपल्याला विज्ञानाने दाखवले आहे. त्यांचे अवशेषही शास्त्रज्ञांना मिळतात.

काही मानवनिर्मित कलाकृती असतात, त्या सुद्धा काळाच्या पडद्याआड दडून जातात आणि काही काळाने कोणी तरी एक्सप्लोरर जाऊन ती गोष्ट पुन्हा शोधून काढतो. रहस्यांची ही जिज्ञासू दुनिया फार विस्मयकारक असते.

कोणत्या वळणावर काय असेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. कित्येक उत्खनलनात किंवा आपल्या पृथ्वीच्या परीक्षणात बुडालेल्या वैज्ञानिकांना व खगोशास्त्रज्ञांना पृथ्वी बद्दल कित्येक नवीन उलगडे होतात.

पृथ्वी आपल्या उदरात काय काय दडवून आहे हे खरंच अनईमॅजीनेबल आहे. रहस्यांचे हे नवनवीन उलगडे कधी आपल्या अकलनशक्ती च्या आवाक्यातले व कधी बाहेरचे ही असतात.

असाच एक शोध एका न्यूझीलंड च्या, mrMBB333 नामक युटुबर ने लावला आहे. जाणून घेऊया नेमकं काय सापडलं त्याला.

आपण गुगल अर्थ बद्दल ऐकलंच असेल? गुगल अर्थ हा एक कॉम्पुटर प्रोग्राम आहे, ज्याच्या साहाय्याने सॅटेलाईटची मदत घेऊन पृथ्वीचे 3D छायाचित्र आपण मिळवू शकतो.

 

google earth inmarathi
theverge.com

 

हे मुख्यत्वे ज्वालामुखी, खडक, किनार पट्टी, अश्या प्रकारची भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी वापरले जाते. या प्रोग्राम च्या साहाय्याने वैज्ञानिक पृथ्वीचे निरीक्षण करतात.

पण न्यूझीलंड च्या एका युट्यूबर ने एक वेगळाच शोध लावला आहे. पृथ्वीचे निरीक्षण करण्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून तो करत आला आहे.

पृथ्वीचा दक्षिण ध्रुव असलेल्या या बर्फाच्छादित प्रदेशावर म्हणजेच अंटार्क्टिका खंडावर त्याला एक जहाजासारखी आकृती दिसली आहे. झूम करून, त्याचे 3D छायाचित्र पाहिले तर ते एक बर्फात दडलेले जहाजच आहे असे आपल्याला ही वाटेल.

ते जहाज ४०० फूट लांब आहे, व त्यात प्रवेश करण्या साठी एक दार व काही खिडक्या आहेत हे ही त्या छायाचित्रातून स्पष्ट होते.

“गेल्या १० वर्षांपासून मी हे काम करतोय. आपल्या ग्रहाच्या कार्यप्रणाली बद्दल मी बराच अभ्यास केला आहे, व पृथ्वी अंतराळात होणाऱ्या बदलांचा, वातावरणातील बदलांचा पृथ्वीवर कसा परिणाम होतो हे मला निरिक्षणातून नीट समजले आहे.” असे mrMBB333 चे म्हणणे आहे.

“मी सर्व प्रथम ते दृश्य पाहिले तर स्पष्ट दिसत नव्हते, नीट कळत नव्हते की नेमके काय आहे. एक बर्फाचा तुकडा किंवा आईस बर्ग असल्याचे वाटले पण ३D इमेज बघितली तर ते एक जाहजच आहे हे समजले.”

 

ship inmarathi
eastcoastdaily.in

 

आपण सविस्तर पाहिलं तर ही कोणती नैसर्गिक क्रिया नसून मानव निर्मित आकृती आहे हे लक्षात येते. झूम करून पाहिल्यास, त्या जहाजाच्या भिंती, हॉल व येण्या जाण्याचे मार्ग पण दिसतात. याच शिवाय, जहाजवरची चिमणी पण आपल्याला स्पष्ट दिसते.

हा व्हिडिओ एका आठवड्या आधी त्याने त्याच्या यूट्यूब चॅनल वर पोस्ट केला व त्याला ला आत्ता पर्यंत ८३०००० इतक्या दर्शकांनी पाहिले असून त्यावर भरपूर वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया येता आहेत.

कोणाचे म्हणणे आहे की –

“२०१२ साली जो महाप्रलय येणार होता त्याची ही पूर्व तयारी असून, फक्त जगातील तथाकथित श्रीमंत व समजत मोठे स्थान असणाऱ्या वर्गाला वाचवण्यासाठी अशी जहाजे खरंच तयार करण्यात आली असून हे जहाज त्यातलेच आहे. पण सामान्य माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही का?”

अशा नाराजी च्या प्रतिक्रिया पासून तर  “हे दुसऱ्या विश्वयुद्धतील, हिटलरच्या त्याफ्यातील जहाज आहे. त्या वेळी दक्षिण ध्रुव सुद्धा हिटलरच्या नौकातळांपैकी एक होते” असे काही लोकांचे म्हणणे आहे.

 

ship 2 inmarathi
yqqlm.com

 

या सारख्या प्रतिक्रियांचे सोशल मीडिया वर उधाण आले आहे. अंटार्क्टिका खंडात आणखी काय काय रहस्यमयी गोष्टी दडल्या आहेत असे अनेक प्रश्न विचारण्यात येतायत.

पण कोणत्याही अधिकाऱ्यांकडून व तज्ञाकडून या बद्दल चे स्पष्टीकरण आलेले नाही.

ते नक्की जहजच आहे का आणि असेल तर तिथे कसे आणि का आले असेल ह्या बद्दल कोणालाच काहीच माहिती अद्याप मिळालेली नाही. आपल्याला काय वाटते ते आमच्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?