' किचनमध्ये आईने केलेल्या प्रयोगाला बहीण-भावाने दिलं व्यवसायाचं रूप; करतायत करोडोंची कमाई – InMarathi

किचनमध्ये आईने केलेल्या प्रयोगाला बहीण-भावाने दिलं व्यवसायाचं रूप; करतायत करोडोंची कमाई

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आईस्क्रीम – म्हटलं, की पहिला शब्द ‘आहाहा’ येतो. ऋतू कोणताही असो, वेळ कोणतीही असो. आईस्क्रीमसाठी आपण नेहमीच तयार असतो.

दिल चाहता है मध्ये एक डायलॉग आहे की, “केक खाने के लिये हम कही भी जा सकते है.” आपल्या सगळ्यांचं तसंच आहे. आईस्क्रीम आणि केक हे आपले आवडते गोड पदार्थ.

 

mango icecream inmarathi

 

पण काही लोकांना एकच टेन्शन असतं, ते म्हणजे शुगरचं. शरीरातील साखरेचं प्रमाण वाढलं, की डायबेटिस सारख्या आजारांना तोंड द्यावं लागतं. मग आपल्या गोड खाण्यावर निर्बंध येतात.

आपण आईस्क्रीम सुद्धा खाऊ शकलो आणि त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण सुद्धा वाढलं नाही तर? तुम्ही म्हणाल की असं कसं होईल? हो, असं झालंय.

मुंबईच्या एका स्टार्टअप कंपनी Get-A-Whey नावाचं एक आईस्क्रीम लाँच केलं आणि काही वर्षातच त्यांना उत्तम प्रसिद्धी मिळाली. या आईस्क्रीमची संकल्पना ही एका घरातील किचनमध्ये तयार झाली आहे.

 

get a whey ice cream inmarathi

 

मुंबईत राहणारे जश आणि पशमी शाह हे दोन भाऊ-बहीण. दोघांनीही MBA चं शिक्षण पूर्ण केलं आहे. जश शाह यांना प्रोटिन्सची प्रचंड आवड आहे. भारतात किंवा भारता बाहेर फिरतांना ते नेहमी प्रोटिन्स विकत घेऊन घरी आणून ठेवायचे.

जिममध्ये घाम गाळल्या नंतर एकदा या भावंडांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली. त्यांच्या आईने जश यांनी आणून ठेवलेले प्रोटिन्स वापरून साखर न टाकता एक आईस्क्रीम तयार केलं. सर्वांना ते प्रचंड आवडलं.

 

get a whey ice cream inmarathi1

 

याचा आपण बिजनेस करू शकतो अशी संकल्पना सर्वांच्या डोक्यात आली. भाऊ-बहिणीने मिळून घरीच एक छोटा लोगो तयार केला.

परिवारातील काही सदस्यांकडून पैसे उधार घेऊन दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीत, घरातील ३ लोकांच्या टीमकडून २०१८ मध्ये एका  आईस्क्रीमचा ब्रँड तयार झाला.

घरात हिऱ्याच्या बिजनेसचं वातावरण असलेल्या शाह फॅमिलीला या नवीन प्रॉडक्टशी जुळवून घेणं तितकं सोपं नव्हतं. कारण, खाद्यपदार्थ विक्री मान्यता, डिस्ट्रिब्युशन हे सर्व वेगळ्या श्रेणीत मोडतं.

त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची इच्छा दोन्ही भावंडांनी जॉब करावा अशी होती. पण, जिम्मी शाह यांचा अनुभव हा फूड इंडस्ट्रीचा असल्याने त्यांना मदत झाली.

जश आणि पशमी शाह यांनी स्वतःचं युनिट सुरू करण्यापेक्षा आईस्क्रीमचा फॉर्म्युला वापरून ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्याचं ठरवलं. स्वतःचं लक्ष त्यांनी फक्त कोल्ड चैन लॉजीस्टिक्सकडे ठेवलं जेणेकरून कोणत्याही आऊटलेटवर आईस्क्रीम कधीही उपलब्ध असेल.

आईस्क्रीम तयार करताना गोडपणा येण्यासाठी साखरे ऐवजी organic sweetener, Erythritol यांचा वापर केला जातो. एका डीप फ्रीझर मध्ये पूर्ण आईस्क्रीम तयार होतं.

 

get a whey ice cream inmarathi2

 

दूध आणि प्रोटिन्सला एकत्र करून त्यांना पाश्चरायझेशन आणि होमोजीनाझेशन प्रक्रियेने एकत्र केलं जातं. एक रात्र डीप फ्रीझर मध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम तयार होतं. तोपर्यंत प्रोटीनचे सत्व आईस्क्रीममध्ये उतरलेले असतात.

हे मिक्स नंतर फ्रीझर मध्ये ठेवून आईस्क्रीमला सॉफ्ट करण्यासाठी त्याला एअर ट्रीटमेंट दिली जाते. हे मिक्सचर नंतर Get-A-Whey च्या प्लास्टिक बॉक्स मध्ये भरण्यात येतं आणि फ्रीझर मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी हे प्रॉडक्ट ‘रेडी टू सेल’ झालेलं असतं.

१२५ मिली आणि ५२० मिली या दोन साईझ मध्ये हे आईस्क्रीम विकलं जातं. सध्या ८ फ्लेवर्स मध्ये आईस्क्रीम उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

 

get a whey ice cream inmarathi3

 

Belgian Chocolate, Strawberry Banana, Keto Belgian Chocolate, Keto Very Berry, Salted Caramel हे काही फ्लेवर्स ची नावं आहेत.

सध्या हे आईस्क्रीम मुंबई आणि पुणे येथील एकूण शंभर रिटेलर्स मध्ये विकलं जात आहे. त्याच सोबत जश आणि पशमी शाह यांनी वेबसाइटवरून सुद्धा आईस्क्रीमची विक्री सुरू केली आहे.

त्याचसोबत Swiggy, Zomato सारख्या डिलिव्हरी कंपनी सोबत टाय-अप हा त्यांना ग्राहक वाढवण्यासाठी उपयुक्त ठरला. सध्या Get-A-Whey आईस्क्रीमचा खप मुंबई, पुणे, हैद्राबाद, बँगलोर, सुरत, नागपूर, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये होत आहे.

 

get a whey ice cream inmarathi4

 

पशमी या स्वतः एका फॅशन रिटेल कंपनी साठी मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम बघतात. तर जश हे future group च्या FMCG सेक्शन मध्ये मार्केटिंग मध्ये कार्यरत आहेत. जिम्मी शाह या एक ज्वेलरी डिझायनर आहेत.

सुरुवात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करून आता Get-A-Whey चं एक युनिट गोरेगाव, मुंबई इथे १३ कामगारांना सोबत घेऊन सुरू करण्यात आलं होतं.

न्यूट्रिशन एक्स्पर्टने सुद्धा या आईस्क्रीमला पसंती दिली आहे. उत्तम चव आणि ट्रान्सपोर्ट या दोन अडचणी टीमपुढे नेहमीच होत्या. पण, त्यांनी वेगवेगळे फ्लेवर आणि पार्टनर शोधून या दोन्ही अडचणींवर मात केली.

हेल्थ conscious लोकांना सुद्धा या आईस्क्रीम मधील प्रोटिन्समुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.

घरात तयार केलेल्या एखाद्या पदार्थाचं रूपांतर जेव्हा बिजनेस मध्ये होतं, तेव्हा ती भावना किती छान असेल हा विचार खूप सुखावणारा आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?