'अनेक वर्षे पाणी/वीज बिल न भरता हे कुटुंब राहतंय अलिशान घरात!! कसं? जाणून घ्या

अनेक वर्षे पाणी/वीज बिल न भरता हे कुटुंब राहतंय अलिशान घरात!! कसं? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याला जगण्यासाठी पाणी आणि वीज या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत.

“काहीही करा, पण आधी लाईट बिल आणि पाणी बिल भरा” हे आपल्या प्रत्येकाच्या घरी बोललं जातं. कारण, इतर कोणतीही सेवा खंडित झाली तरी इतका त्रास होत नाही जितका त्रास या दोन सेवा नसतील तर प्रत्येकाला होत असतो.

गुजरात मध्ये श्री. स्नेहल पटेल हे गृहस्थ आहेत ज्यांना मागच्या अनेक वर्षांपासून एकदाही लाईट बिल किंवा पाणी बिल कधीच भरावं लागलं नाही.

 

snehal patel house inmarathi1

 

तुम्हाला वाटेल की ते एखाद्या मंत्र्यांचे नातेवाईक असतील. म्हणून, त्यांना हे सगळं माफ असेल. तसं अजिबात नाहीये. त्यांनी त्यांचं घर असं बांधलं आहे आणि त्यात अश्या काही सोयी करून ठेवल्या आहेत की, त्यांना वीज वापरावी लागत नाही आणि पाणी सुद्धा बाहेरून घ्यावं लागत नाही.

हे कसं शक्य आहे? बघूयात.

श्री. स्नेहल पटेल हे एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत. १९६६ मध्ये त्यांनी सुरत पासून जवळच त्यांनी ४ एकरचा प्लॉट विकत घेतला. त्या प्लॉट वर त्यांनी खूप झाडं लावली.

निसर्गाची प्रचंड आवड असलेल्या पटेल यांनी नंतर त्या जागेत एक घराचं डिझाईन तयार केलं. घराचं मॉडेल तयार करताना त्यांनी सोलार एनर्जी आणि wind energy ला प्राधान्य देऊन त्यांचा सुद्धा प्लॅनमध्ये समावेश केला.

 

snehal patel house inmarathi

 

घराचं बांधकाम करताना त्यांनी जास्तीत जास्त लाकडाचा वापर केला जेणेकरून घर थंड राहील. ३ बेडरूम असलेल्या या घराला पूर्णपणे कोटा स्टोनची फरशी बसवण्यात आली आहे जी की पटकन थंड होते.

इतकंच नाही तर, घरात एक थेंब सुद्धा पाणी वाया जाणार नाही अशी सिस्टीम करण्यात आली आहे. टिपिकल सिवेज सिस्टीम न बसवता त्यांनी सिवेज टॅंक बसवले आहेत.

वॉशिंग मशीनमधून वाया जाणाऱ्या पाण्याचं कनेक्शन हे टॉयलेटच्या फ्लश टॅंकला देण्यात आलं आहे. घरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जतन करून घरातील झाडांना तेच पाणी देण्याची आधुनिक सिस्टीम बसवण्यात आली आहे.

 

snehal patel house inmarathi5

 

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरण्यात आलेले पाईप्स हे बेडरूमच्या 30 vatt फॅनच्या जवळून जातात. त्यामुळे फॅन लावला की घरात AC सारखी थंड हवा मिळते. हे सर्व नियोजन आणि बांधकाम करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागला.

 

snehal patel house inmarathi3

 

श्री. स्नेहल पटेल यांनी त्यांचं इंजिनियरिंग हे १९८३ मध्ये मणीपाल येथून पूर्ण केलं. लहानपणी ते वडिलांसोबत वनराई मध्ये फिरायला जायचे.

शिक्षण पूर्ण करून आल्यावर त्यांना मणीपाल आणि सुरतमध्ये greenary च्या बाबतीत खूप मोठा फरक जाणवला. त्यांना मणीपाल सारखं निसर्ग सौंदर्य सुरत मध्ये असावं असं सारखं वाटायचं.

याच हेतूने त्यांनी दोन मित्रांसोबत मिळून १९८४ मध्ये नेचर क्लबची स्थापना केली. या ग्रुप मध्ये सध्या २००० लोक आहेत आणि ही एक अधिकृत सेवाभावी संस्था आहे.

इको फ्रेंडली घराच्या निर्मितीचं जितकं श्रेय पटेल यांना जातं तितकंच या वास्तूच्या आर्किटेक्ट फाल्गुनी देसाई यांना जातं. पटेल यांनी त्यांच्या ३० requirements सांगितल्या आणि त्यानुसार आर्किटेक्टने प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली.

 

snehal patel house inmarathi2

 

दोन मजले असलेल्या या घराचा पूर्ण एरिया हा १२००० स्क्वेअर फूट इतका आहे. त्यापैकी फक्त ५००० स्क्वेअर फूटवर बांधकाम करण्यात आलं आहे.

बाकी जागेत ७० प्रकारची एकूण ७०० झाडं आहेत आणि एक छोटं तळं आहे जेणेकरून जमिनीला पाणी मिळत राहील. घराच्या भिंतींमध्ये प्रकाश खेळता ठेवण्यासाठी जास्तीत जास्त काचेचा वापर करण्यात आला आहे.

 

snehal patel house inmarathi4

 

घराच्या गच्चीवर ७.५ kw इतक्या कॅपेसिटीचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. पावसाळ्यात ह्या घरातील उपकरणं ही wind energy वर चालतात.

गच्चीवर वॉटर टॅंक बांधण्यात आल्या आहेत. तेच पाणी फिल्टर करून किचन आणि बाथरूमला देण्यात येतं.

गच्चीवर असलेली टाकी पूर्ण भरल्यावर ते पाणी जमिनीखालच्या टॅंक मध्ये जातं ज्याची स्टोरेज कॅपेसिटी २ लाख लिटर इतकी आहे. हे पाणी प्रत्येक वेळी फिल्टर होऊनच पुढे जातं असे फिल्टर बसवण्यात आले आहेत.

 

snehal patel house inmarathi6

 

एका रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, घरातून वाया जाणारं पाणी हे नक्कीच शुद्ध करून परत वापरलं जाऊ शकतं. ८० टक्के पाणी हे पुन्हा वापरण्याजोगं होऊ शकतं, ज्यामुळे पाण्याची गरज खूप कमी होऊ शकते.

श्री. स्नेहल पटेल यांनी हे लक्षात घेऊन hyacinth, duckweend आणि water lettuce सारखी झाडं घरात लावली. ही झाडं पाण्याला शुद्ध ठेवण्यासाठी मदत करत असतात जेणेकरून इतर झाडांना सिवेज पाण्याचा त्रास होत नाही.

घराच्या आवारात असलेल्या तळ्यांमध्ये गप्पी मासे पाळण्यात आले आहेत जे की डास तयार होऊ देत नाहीत. घरासाठी वापरलेलं लाकूड सुद्धा ते आहे जे की जहाज बनवण्यासाठी वापरलं जातं.

घराच्या छताला सिरॅमिक पेंट वापरण्यात आला आहे, जो की इतर पेंट पेक्षा ३ चे ४ डिग्री कमी गरम होतो. घराच्या भिंतीमध्ये पक्ष्याचं घरटं तयार होईल इतका पाईप चा स्लॉट देण्यात आला आहे. इतका कोण विचार करतं? आपण तर नाही.

श्री. स्नेहल पटेल यांचा घर बांधताना एकच विचार पक्का होता की,

“तुमच्या घराने तुम्हाला निसर्गापासून तोडलं नाही पाहिजे. तुम्ही निसर्गाला जपून सुद्धा घर बांधू शकतात आणि मी फक्त तेच केलं आहे.”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?