' भिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास हे घरगुती उपाय करून बघाच! – InMarathi

भिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास हे घरगुती उपाय करून बघाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळा म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरम चहा, कांदा भजी, जुनी गाणी आणि संथ गती ने कामे करण्याची सवलत. या वेळेस वाटतं की आपल्या रोजच्याच धावपळीचा वेग कमी करून जाता घरी निवांत वेळ मिळावा.

पण पावसाळा फक्त या चांगल्या गोष्टी घेऊन येत नाही. त्या बरोबर काही अशा वाईट गोष्टी पण असतात ज्यांचा आपल्याला आर्थिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने फार त्रास होऊ शकतो.

पावसाळ्या आधी कधी खेडे गावात जाण्याचा योग आला असेल तर आपण पाहिले असेल की घराची कौले दुरुस्त करणे, गोठ्याचे छत सुधारून घेणे, धान्य व पापड, कूरडया यांसारखे खाद्य पदार्थ उन्हात वळवून, त्यात कडू लिंबाचा पाला घालून, मोठ्या कोठ्यांमध्ये साठवण्याचे काम सुरू असते.

इतकी जास्तीची कामं का बरं काढत असतील?

कारण, पावसाळ्याला सुरुवात झाली की घर गळती, कपडे, धान्य यांना बुरशी लागणे, घराच्या भिंतींना ओल येणे, वातावरणातील दमट पणा मुळे भिंतींवर बुरशी येणे, रंग दिलेल्या भिंतींचे खीपले निघणे, घराच्या वायरिंग व फर्निचर मध्ये पाण्याचा शिरकाव होणे असे प्रकार होतात.

 

fungus inmarathi

 

हे सगळे बघणाऱ्याला गचाळ वाटतेच पण हे आपल्या आरोग्या साठी पण फार घातक असते. या बुरशी, फंगस मुळे श्वसनाचे आजार जसे की अस्थमा, सर्दी पडसे, कफ ईत्यादि होण्याची शक्यता असते.

शिवाय, घरात कुबट असा दुर्गंध येऊ लागतो ज्या मुळे घरातली प्रसन्नता हरवते. घरातील वातावरण दूषित होते.

कपडे नीट वाळले नाहीत की त्यांना सुद्धा बुरशी येते ज्या मुळे आपल्याला त्वचा विकार जसे खाज येणे, त्वचा लालसर होणे, स्किन अॅलर्जी होण्याशी दाट शक्यता असते.

पण या सगळ्यांपासून सुरक्षित राहण्याचे ही अगदी आपल्या बजेट मध्ये बसणारे काही उपाय आहेत.

तर पावसाळ्यात आपण आपल्या घराची कशी काळजी घेऊ शकतो ते बघुया.

 

१) पूर्व तयारी –

 

dr fixit inmarathi

 

पावसाळा येण्या पूर्वी आपल्या घराचे नीट निरीक्षण करा. सिंक, बेसिन, पाईप, गळते एसी चे पाईप आणि प्लंबिंग या सगळ्यांना अॅसिडिक क्लिनरच्या साहाय्याने मोकळे करून घ्या जेणे करून पावसाळ्यात पणी तुंबणार नाही व त्या आजूबाजूचा परिसर कोरडा राहील.

भिंतींना बाहेरून वॉटर प्रुफ पुट्टी, किंवा रंगाचे एक कोटिंग द्या जेणेकरून पावसाचे पाणी भिंतीत साचणार नाही.

तळ मजल्यावरचे स्वतंत्र घर असेल तर आपल्या आवारात कुठे कुठे पणी साचेल अशा जागा असतील तिथे व्यवस्थित आउटलेट बनवून घ्या. शौचालय, सेप्टिक टँक स्वच्छ करून घ्या.

आवारात पाणी साचून, आपल्या भिंती त्याची ओल धरून ठेवतात व घर गळती किंवा नाजूक भिंती असे त्रास उद्भवतात. गच्ची चे पणी वाहून जाण्याचे आउटलेट स्वच्छ करून ठेवा.

कुठे लहान मोठ्या भेगा, तडा गेल्या असतील तर वेळीच सिमेंट टाकून त्या बुजवून घ्या. आधीच धान्याला ऊन दाखवून, बोरिक पावडर किंवा कडू लिंबाची पाने घालून ते धान्य कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा.

 

२) फ्लोअर मॅट –

 

floor mats inmarathi

 

तुम्हाला जर मऊ फ्लोअर मॅट, गालिचे यांची आवड असेल, तर पावसाळा संपेपर्यंत तुम्हाला थोडी कळ काढावी लागेल. कारण ते सगळे गुंडाळून ठेवण्याचा ऋतु म्हणजे पावसाळा.

या वेळेस, बाहेरून घरात चुकून पाय न पुसता ओले पाय घेऊन आलो, पाणी सांडले, किंवा वातावरणातील बाष्पामुळे हे मॅट्स ओलावा धरतात. ओलसर व गरम वातावरण बुरशीच्या संगोपनासाठी अनुकूल असे वातावरण असते.

त्या मुळे आपली फरशी जितकी कोरडी ठेवता येईल तितकी कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

 

३) फर्निचर –

 

furniture polishing inmarathi

 

पावसाळ्यात आपल्या घराची दारं, वातावरणातील बशप्तेमुळे किंवा सरळ पावसाच्या संपर्कात आल्यामुळे फुगतात. मग ही दारं लावण्यास त्रास होतो.

त्यामुळे आधीच त्यांना वार्निश, किंवा वूडन प्रिवेंटर ने पेंट करून घ्या. जर हे केले नसेल तर व दार फुगून ते लावण्यास त्रास होत असेल तर मिस्त्रीला बोलवून ते दुरुस्त करून घ्या.

वर नमूद केल्याप्रमाणेच दारांबरोबर घरात जर इतर लाकडी फर्निचर असेल ते ही वातावरणातील आर्द्रतेमुळे फुगू शकते. याशिवाय पावसाळ्यात घराबाहेरील ढेकणं घरात शिरून, याच लाकडी फर्निचरला आपले घर बनवतात.

ही ढेकणं दुप्पट वेगाने संख्येत वाढून संबंध फर्निचर चा भुगा पाडण्यातही सक्षम असतात. फर्निचर बरोबर, ती आपल्याला देखील त्रास देतात. त्यांच्या दंशामुळे वेदना होऊन, त्वचा विकार होतात.

त्यामुळे बाचावा साठी वार्निश, पॉलिश किंवा लॅकर चे कोटींग करावे. जेणे करून पावसाळ्यात होणाऱ्या गळतीचा व ढेकणांचा त्रास होणार नाही.

 

४) पुस्तकं –

 

book shelf inmarathi

 

पावसाळ्याला सुरुवात झाली की आपल्या घरात जितकी पण पुस्तकं असतील तर ती व्यवस्थित अगदी हवेशीर ठिकाणी ठेवावी.

किंवा अशी कुठलीच जागा नसेल जिथे हवा सतत खेळती राहणार नाही, तर पुस्तकं कापडी बॅग मध्ये भरून, डांबराच्या गोळ्या घालून दिवणात किंवा कपाटात ठेवावी.

१५-२० दिवसांनी पुस्तकं बाहेर काढून उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी ३-४ तास ठेवावी आणि पुन्हा गुंडाळून आत ठेवावी.

 

५) कपडे –

 

fungus on clothes inmarathi

 

पावसाळ्यात कपडे वाळण्याचा मोठा त्रास असतो. त्यामुळे, चादरी, पडदे, ईत्यादि सारखे मोठे कपडे पावसाळा सुरू होण्या आधीच धुवून, ऊन दाखवून ठेवा.

पावसाळ्यात कपडे वाळत घालण्याची जागा लहान असेल, किंवा मशीन मध्ये ड्रायर ची सोय नसेल तर एका वेळी भरपूर कपडे धुवायला काढू नका. हळू हळू धुवा. मोठे कपडे, चादरी, पडदे धुण्या ऐवजी ड्राय क्लीन करून घ्या.

कपडे हवेशीर वळवून घडी करून ठेवताना कपाटात, कापूर, कडुलिंबाची पाने व काड्या किंवा सिलिका यांचे छोटे पाऊच करून कपड्यांमध्ये ठेवा. याने बुरशी, दुर्गंध दूर ठेवण्यास मदत होते.

शक्य असेल तर आपल्या कपाटात छोटा बल्ब बसवा. तास – दोन तास रोज बल्ब सुरू ठेवा. ज्यामुळे गर्मी निर्माण होईल व कपाटातला दमट पणा नाहीसा होईल.

पावसाळ्यात बुरसटलेले कपडे धुण्यासाठी, पाण्यात मीठ – लिंबू, व्हिनेगर, कडुलिंबाची पाने घाला किंवा सरळ कपडे गरम पाण्याने धुवा. याने कपडे जंतुविरहित होतील. आणि बुरशी आल्याचे डाग निघून जातील.

 

६) इलेक्ट्रिक फिटिंग –

 

short circuit inmarathi

 

पावसाळ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची, घरातील वायरींग सिस्टमची काळजी घेणे सगळ्यात जास्त आवश्यक असते.

भिंतींमधून पाणी झिरपून या वायर मध्ये शिरले तर शॉक लागण्याचा, शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. तर पावसाळ्या पूर्वीच इलेक्ट्रिशियन ला बोलावून वायरिंग चे काम करून घ्या.

 

७) वेंटीलेशन –

 

ventilation inmarathi

 

आपल्या घराच्या वेंटीलेशन ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जितकी जास्त मोकळी हवा, तितका आपल्या शरीराला फायदा. पण पावसाळ्यात आपल्या घराच्या खिडक्यांना जाळी बसवून घ्या.

या मुळे पावसाळ्यातील किडे, डास, यांच्यापासून बचाव होतो व हवा ही खेळती राहते.

घरात हवा खेळती असली की कोंडल्या सारखे वाटत नाही व आपले फुफुस सुदृढ राहते. या शिवाय, हवेमुळे पावसाळ्यात घर, भिंत, फरशी कोरडी राहते.

८) इतर काळजी –

बाथरूम मध्ये जर शॉवर कर्टेन असेल तर पावसाळ्यात ते उतरवून ठेवा. ते कर्टेन्स काढल्यामुळे बाथरूमची फरशी कोरडी राहते व शेवाळ येत नाही.

 

bathroom inmarathi

 

बाथरूम चे पाणी जाण्याचे आउटलेट अॅसिड क्लिनरने स्वच्छ करून जाळी असलेले कवर लावा. ज्या मुळे पावसाळी किटके जसे गांडूळ, गोम, ईत्यादि बाथरूम मार्फत घरात शिरणार नाहीत.

९) खिडक्यांचे दुरुस्तीचे काम –

कधी कधी खिडकी नीट लागत नाही, व सगळे पावसाचे पाणी आत शिरते. तुमच्याही घरात अश्या कोणत्या खिडक्या आहेत का याचा तपास करून घ्या.

खिडकीच्या वरचा आडोसा व्यवस्थित नसेल, तर पावसाचे पाणी अडणार नाही सरळ खिडकी वर येईल. तर एकदा तोही नीट तपासून दुरुस्त करून घ्या.

 

 

window leakage inmarathi

===

===

१०) अडगळ कमी करणे –

पावसाळ्यात जितके होईल तितके घर सुटसुटीत ठेवायचा प्रयत्न करा.

लागत नसणारे सामान, जसे – पुस्तकं, कार्पेट, जास्तीच्या उष्या अंथरूण, स्वयंपाक घरातील न लागणाऱ्या बरण्या, थैल्या, छोट्या मोठ्या वस्तू, जितके जमेल तितके समान गुंडाळून ठेवूनद्या, घरातील अडगळ पसारा कमी करा.

काही सामान कुठे हलवायचे असेल तर ते करून घ्या. जितका पसारा कमी असेल, वस्तू कमी असतील त्या ओल तितकीच कमी धरतील. घरात कुबट, व ह्युमिड वातावरण होणार नाही. व घर कोरडे ठेवण्यास मदत होईल.

हे सगळे उपाय तुमचा पावसाळा सुखकर बनवतील. सतर्क असण्यात आपलाच फायदा आहे. त्यामुळे आजच जितके शक्य असेल तितके उपाय योजना अमलात आणणे सुरू करा.


आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?