' वृद्धत्व तसेच अल्झायमर पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर हा पदार्थ आहारात समाविष्ट कराच!

वृद्धत्व तसेच अल्झायमर पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर हा पदार्थ आहारात समाविष्ट कराच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात ठराविक, शिस्तबध्द जीवन शैली उदयास आली तेव्हा पासून माणसे आपली रित, माहिती, मौखिक पद्धतीने एका पिढी कडून समोरच्या पिढीला प्रदान करत आली आहेत.

कथा, आख्याने, व्याख्याने, काव्य रचना, ओव्या, ही त्यातली उदाहरणे. ती माहिती जशीच्या तशी स्मरणात ठेऊन पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवणे किती पेचाचे काम असेल नाही? पण माहिती पोहोचत गेली, तिचा प्रसार होत गेला.

अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर तुमच्या घरात वृद्ध मंडळी असतील तर कधी संध्याकाळी दिवे लागणीला आपण त्यांच्या बरोबर बसून वेळ घालवला आहे का?

घालवला असेल तर एक निरीक्षणात आलेच असेल की त्यांना स्तोत्रे, अष्टके, आरत्या, गोष्टी सगळे नीट लक्षात असते. काही व्यक्तींना पोथ्या व ग्रंथ देखील पाठ असतात.

 

grandma inmarathi
dnaindia.com

 

याच शिवाय औषधी वनस्पती, त्यांच्या मात्रा, सगळे सगळे पाठ असते. त्यांच्या कडे प्रत्येक वेळी लिहीलेले असेलच असे ही नाही. मग काय रहस्य असेल या तल्लख बुद्धीचं?

रहस्य असं काहीच विशेष नसून किंवा आजू बाजूला कुठेही नाही, ते आपल्या आहारात व जीवनशैलीत आहे.

आपण आपले पारंपरिक खाद्य पदार्थ सोडून फास्ट फूड कडे वळलो व आपल्या स्मरणशक्ती पासून, आरोग्या पर्यंत सगळे त्रास निर्माण झाले. त्यातलाच एक मोठा त्रास म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे. किती ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी लक्षात राहत नाही, लक्षात राहिले तरी गरजेच्या वेळी आठवत नाही.

१० कामे सांगितली तर २-३ कामे आपण हमखास विसरतो. हे सगळे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत की डॉक्टरांकडे जाऊन या वर उपचार करण्याची पाळी आपल्यावर आली आहे.

स्मरणशक्ती सुदृढ करायची म्हटली की बदाम, च्यवनप्राश, ईत्यादि अन्नाचे सेवन करणे ; टाळू ला तेल लावणे, शीर्षासन करणे हे सगळे उपाय सुचवले जातात.

हे सगळे उपाय ते अत्यंत गुणकारी ठरतातच पण या व्यतिरिक्त पण सुक्यामेव्या मधील अक्रोड हे पण स्मरणशक्ती सुदृढ ठेवण्या करता अत्यंत गुणकारी ठरते.

 

walnuts inmarathi
news-medical.net

 

कॅलिफॉर्नियातील लॉस एंजेलेस विद्यापीठातील Dr Lenore Arab आणि Dr Alfonso Ang यांनी केलेल्या निरीक्षणा नुसार ज्या व्यक्ती आपल्या आहारात, कोणत्याही स्वरूपाचे अक्रोड चे नियमित सेवन करतात त्यांची स्मरण शक्ती चांगली असते.

आणि त्यांचे cognitive test ( आकलन क्षमता परीक्षण) मधील प्रदर्शन सुद्धा इतरांपेक्षा उत्तम होते.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या एका अहवालानुसार २०१२ मध्ये जगात दिमेंशिया (वेड लागणे) ग्रासित लोकांची संख्या ७.७ मिलियन आहे जी २०३० पर्यंत ३०.५३ मिलियन इतकी होईल.

या सगळ्या समस्यांवर एक प्रभावी इलाज म्हणजे अक्रोड. एक ओंजळ भर, किंवा ३० ग्राम अक्रोड चे नियमित सेवन आपल्या साठी किती गुणकारी ठरू शकते याची आपल्याला कल्पना नाही.

तर या एका छोट्याश्या सुक्या मेव्यात काय गुणकारी घटक असतात ते बघुया.

अँटी ऑक्सीडंट्स –

अक्रोडात ३.७ mmol/ounce या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट्स आढळतात. हे प्रमाण बदाम, पिस्ता मध्ये आढळणाऱ्या अँटी ऑक्सीडंट्स च्या दुप्पट आहे.

जे आपल्या शरीरातील कॅन्सर पेशिंशी लढून हृदय विकार कमी करतात व मेंदूला चालना देण्यासाठी मदतगार ठरतात.

 

walnuts 2 inmarathi
neutraceauticalsworld.com

 

DHA compound – अक्रोड मध्ये ओमेगा ३ चे एक कंपाऊंड DHA असते. हे कंपाऊंड मेंदूच्या विकासासाठी अत्यावश्यक ठरते. या मुळे, आकलन शक्ती वाढून, आपला प्रोसेसिंग स्पीड वाढते.

पॉलीफिनॉल – हा घटक आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्स व कॅन्सर पेशिंपासून बचाव करते व आपल्या शरीराला सुदृढ ठेवते.

याच सोबत अक्रोड मध्ये हाय क्वालिटी प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनेरलस, डाएटरी फायबर्स यान सारखे पोषक घटक आढळतात. अक्रोड हे एक ग्लूटेन फ्री, डेरी फ्री डाएट आहे.

अक्रोड सेवनाचे फायदे –

१) अँटी डीप्रेसंट –

अक्रोड मध्ये आढळणारे अँटी डीप्रेसंट हे आपला, खास करून पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेऊन मूड फ्रेश ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.

२) सुदृढ मेंदू –

आपल्या मेंदू साठी सगळ्यात उपयुक्त असते कारण वरील दिलेले घटक आपल्या मेंदू ला सशक्त बनवतात व आकलन शक्ती वाढवून, विचार प्रक्रियेला चालना देतात.

३) मधुमेहाचा धोका नष्ट करणे –

अक्रोड मध्ये सॅच्युरेटेड फॅट्स ची मात्रा फार कमी असते त्यामुळे अक्रोडाचे कधी काळी सेवन करणाऱ्या व्यक्तींपेक्षा रोज अक्रोड सेवन करणाऱ्या व्यक्तींना टाईप २ मधुमेहाचा धोका हा २४% नी कमी असतो.

 

diabetes inmarathi
medicalnewstoday.com

 

४) वजन नियंत्रणात राहणे –

अक्रोड मध्ये सॅच्युरेटेड फॅट्स ची मात्रा फार कमी असून फायबर, मोनो सॅच्युरेटेड फॅट्स व पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स ची मात्रा जास्त असल्या मुळे अक्रोड खाल्ल्या वर ते आपल्या शरीरात जमा होत नाही.

ज्या मुळे ज्यांना ही भीती असेल की सुक्या मेव्याने वजन वाढते तर अक्रोड त्यातील एक अपवाद आहे.

५) टवटवीत त्वचा –

अक्रोड मध्ये असलेले मेलिटोनिन, व्हिटॅमिन ई व, पॉलीफीनॉल्स त्वचा निरोगी ठेवतात.

६) हृदयविकारा पासून सुरक्षा –

alpha lionelic acid (ALA) मुख्यतः अक्रोड मध्ये आढळते. ज्या मुळे हृदयविकाराचा धोका १०% ने कमी होतो.

७) रक्तदाबाला नियंत्रणात ठेवणे –

अक्रोड गुड फॅट्स पुरवून आपला रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात ठेवते.

८) वृद्धत्वाला लांब ठेवणे –

म्हातारे व्हायला कोणाला आवडेल, नाही? शरीर नीट कार्यरत रहावे या साठी २८ ग्राम अक्रोड नियमित खाणे, गरजेचे आहे. योग्य ते तेल, व्हिटॅमिन, फायबर, प्लांट कंपाऊंड मुळे आपले शरीर लवकर थकत नाही.

९) अल्झायमर पासून बचाव –

 

alzeihmers inmarathi
imdb.com

 

अक्रोड मेंदू साठी किती उपयुक्त ठरते हे माहीतच आहे. त्याच बरोबर, अल्झायमर सारख्या रोगा पासूनही अक्रोड आपल्याला वाचवते.

इतके फायदे जर एका छोट्याश्या सुक्या मेव्यातून मिळणार असतील तर आपण सगळ्यांनीच नियमित अक्रोड आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला हवे.

अक्रोड तुमच्या आवडत्या मिल्कशेक्श वर पेरून, अक्रोड बर्फी, काश्मिरी कावा, अक्रोड हलवा या मार्फत पण आहारात खाता येऊ शकते. इविनिंग स्नॅक म्हणून मुठभर अक्रोड सगळ्यात उत्तम ऑप्शन आहे. ट्राय करून पाहा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?