' हिमालयातील असं एक पवित्र गाव ज्याची फारशी कोणाला माहिती नाहीये! वाचा

हिमालयातील असं एक पवित्र गाव ज्याची फारशी कोणाला माहिती नाहीये! वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारत देश आणि भारतीय लोक हे एकंदरीत उत्सव आणि परंपराप्रिय आहेत.‌ बहुतांश परंपरा पाळण्याकडंच सर्वांचा कल असतो.

तरीही शहरीकरणाच्या रेट्यात खूपशा गोष्टी शाॅर्टकट मारुन जमतील तशा कमी अधिक प्रमाणात सांभाळल्या जातात. काही काही गोष्टी तर ग्लोबल झाल्या आहेत.

सगळे सण समारंभ संपूर्ण भारतात अगदी शिस्तीत साजरे करतात. चैत्र पाडव्याला आपलं भारतीय वर्ष सुरू होतं. नंतर दर महिन्याला एक तरी सण असतोच असतो.

काही शेतकऱ्यांनी साजरे करायचे सण, मुलाबाळांसाठी, गौरी गणपती, पक्ष पंधरवडा पितृपक्ष म्हणून, मग नवरात्र दांडियाच्या रात्री, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळीची धामधूम, संक्रांत असं एकंदरीत सारखं पारंपरिक सणांचं साजरं होणं असतंच.‌

 

diwali-inmarathi

 

पण त्याच्या बरोबरीने काही रिवाज सोवळं ओवळं खेड्यापाड्यात आजही पाळले जातात. निषिद्ध असलेल्या गोष्टी आजही केल्या जात नाहीत.

एखाद्या घरात मयत झालं तर दहा दिवस सुतक पाळलं जातं. चूल पेटवली जात नाही. त्यांना घराबाहेर पडता येत नाही.

इतकंच नव्हे तर त्या सुतकात दहा दिवसांत कुणीही त्यांना भेटून आलं, तर त्यांना शिवून आलं तर अंघोळ केल्याशिवाय घरात प्रवेश करता येत नाही.

जमलेल्या भावकीतील माणसांना शेजार पाजारची माणसं दहा दिवस जेवण पुरवतात. सुतक संपलं की संपूर्ण घरादाराची, अंथरुण पांघरुणांची स्वच्छता केल्याशिवाय पुढचं काही काम केलं जात नाही.

तीच गोष्ट सोयराची. सोयर संपलं की बाळंतिणीच्या हातातील बांगड्या बदलणं, घराची साफसफाई करुनच देवाची पूजा केली जाते.

पण शहरीकरणामुळे, वेळेची कमतरता, जागेचा अभाव, माणूसबळ कमी असणं या आणि इतरही अनेक कारणांमुळे हे रिवाज आता कमी प्रमाणात पाळले जातात.

पण खेडोपाडी हे रिवाज काटेकोरपणे पाळले जातात. काही अंशी तिथंही थोडीशी जागरुकता आली आहे, त्यामुळे या रिवाजांना काही ठिकाणी कात्री लावली आहे.

भारतात आजही एक असं खेडं आहे जिथं हे ऋषी मुनींच्या काळात वापरले जाणारे रिवाज आजही तितक्याच काटेकोरपणे पालन केले जातात. लोकांना न शिवणे… इतरही अनेक. कोणतं आहे हे गांव?

 

malana village inmarathi5

 

या गावाचं नांव आहे मलाना. हिमाचल प्रदेशातील समुद्रसपाटीपासून ९५०० फूट उंच असलेलं हे गांव. हिरवाईनं आणि बर्फांनं आच्छादलेलं, पार्वती व्हॅली या भागात असलेलं‌ हे अतिशय निसर्गरम्य गांव!!!

असंही हिमाचलमध्ये निसर्गानं आपलं वरदान दोन्ही हातांनी उधळलं आहे. हिरवीगार वनराई, बर्फाच्छादीत डोंगररांगा हे पाहून भान हरपून जातं. अशा निसर्गरम्य परिसरात अत्यंत कर्मठ वातावरणात हे गांव आपला दिनक्रम चालवतं.

कुल्लू जिल्ह्यातील मलाना हे निसर्गरम्य खेडं. इथले लोक आजही कित्येक रहस्यं आपल्यात सामावून ठेवत, जुन्या काळातील रिवाज पाळत आपलं आयुष्य जगतात.

 

malana village inmarathi4

 

या गावात जगातील सर्वात उत्तम प्रतीची हशीश मिळते. हे इथलं खुलं रहस्य आहे. त्याचे कश ओढत ही माणसं रात्र जागवतात. इथली काही रहस्यं आज आपण वाचणार आहोत.

१. मलाना क्रीम-

 

malana village inmarathi1

 

मलाना क्रीम ही भयंकर नशा देणारी उत्तम प्रतीची हशीश फक्त आणि फक्त मलानामध्येच मिळते. शौकीन लोकही अगदी सांगितलेल्या किंमतीला विकत घेतात.

अतिशय उत्तम सुगंध आणि तेलाचं प्रमाण मुबलक असलेली ही हशीश अॅमस्टरडॅम येथे प्रचंड महागडी डिश म्हणून विकली जाते.

 

२. शिवाशिव पाळणारे गावकरी-

 

malana village inmarathi6

 

आश्चर्य वाटलं ना वाचून? आपल्याकडं जर असं कुणी म्हणालं, मला शिवू नकोस तर केवढा गदारोळ उडाला असता.. मोर्चे, दंगे, जाळपोळ पण झाली असती. पण इथं मलानामधील गावकरी ही गोष्ट सर्रास पाळतात, विनातक्रार!!

अगदी प्रवासी म्हणून आलेल्या लोकांनी एखादी वस्तू खरेदी केली, तर ती वस्तू हातात देत नाहीत. काऊंटरवर ठेवतात. पैसे पण काऊंटरवर ठेवून मगच घेतात. कुणाचाही स्पर्श होऊ देत नाहीत.

चुकून जर शिवलं गेलंच तर सरळ अंघोळ करून मोकळे होतात. अगदी प्रवाशांना पण शिवून घेत नाहीत. स्पष्ट सांगतात…शिवू नका!!!

 

३. फोटोंचे शौकीन लोक-

 

malana village inmarathi2

 

हिमाचल प्रदेशातील लोकांची एकंदरीत शरीरयष्टी, त्वचेचा रंग, पोत हा उत्तमच असतो. तिकडच्या हवामानामुळे तिथं असणारे लोक गोरे गोरे पान, गाजरासारखे लालबुंद असतात.

पहाडावरुन चढ उतार करावी लागत असल्यामुळे बांधाही शिडशिडीत असतो. थोडक्यात त्या भागातील लोक फोटोजेनिक असतात.

मलाना गावातील लोकही असेच फोटोजेनिक आहेतच, पण फोटो काढून घेतल्याचेही शौकीन आहेत. तिथं फोटोग्राफी हौसेने करु शकता पण व्हिडिओग्राफीला परवानगी नाही.

फोटो काढून जगभर पोहोचायची आवड आहे त्यांना. पण व्हिडिओ बनवून आपली संस्कृती बाहेर पाठवायला ते तयार नाहीत. ती तशीच जगापासून लपवून ठेवायची इच्छा असते त्यांची.

 

४. ग्रीक संस्कृतीचा पगडा-

मलान गावातील ग्रामस्थ स्वतःला अलेक्झांडरचे वंशज मानतात. तेथे पंचायत भरते, पण तिथं जुने ग्रीक कायदेच चालतात. कोणताही निवाडा करताना त्याच कायद्यांनी होतो.

जेव्हा अलेक्झांडर जगज्जेतेपद जिंकायला म्हणून भारतात आला होता, तेव्हा पौरस राजाविरुद्ध लढताना ग्रीक सैन्य मलाना येथे राहीले होते.जखमी सैनिकांचे उपचार मलाना येथे केले गेले होते.

 

५. मलानाचं पावित्र्य-

 

malana village inmarathi7

 

मलाना गावचे रहिवासी स्वतःला इतर गावांतील लोकांपेक्षा जास्त पवित्र समजतात. त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान हे उच्च दर्जाचं आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

त्यांची कनाशी ही भाषा इतर भाषांपेक्षा पवित्र आणि श्रेष्ठ आहे. त्यामुळं ती इतर लोकांना बोलायचीही परवानगी नाही. अगदी प्रवाशांना, पर्यटकांनाही मलाना गावांतील मंदिरात प्रवेशाला बंदी आहे.

ते बाहेरचे लोक म्हणून गावकरी त्यांना शिवूनही घेत नाहीत. हे सारं केवळ आपल्या गावाचं पावित्र्य तसंच रहावं याकरिता पाळलं जातं.

 

६. मलाना येथील निषिद्ध गोष्टी-

 

malana village inmarathi3

 

केवळ इतक्याच गोष्टींचा समावेश यात नाही. तर अजूनही कितीतरी गोष्टी निषिद्ध मानतात त्या गोष्टी-

१. झाडांवर नखं रुतवणं मलानामध्ये निषिद्ध मानतात.

२. जळतं लाकूड मलानामधील जंगलात नेणं मान्य नाही.

३. जंगलामधून फक्त वाळलेल्या छोट्या छोट्या फांद्याच आणता येतात.

४. मलानामध्ये जंगली प्राण्यांची शिकार करायला बंदी आहे. जर शिकार करायचीच असेल तर ग्रामपंचायतीच्या परवानगीने ठराविक काळातच करता येते.

५. एखाद्या जंगली जनावराने शेळी मेंढी वर हल्ला केला, तर त्याची शिकार करायला शिकारी बोलावला जातो. शिकारीत त्यानं अस्वल मारलं तर त्याची फर शिकारी ठेवून घेऊ शकत नाही.

६. कोणत्याही मामल्यात पोलिस दखल देऊ शकत नाहीत. जर एखाद्या माणसाची इच्छा असली तर त्यासाठी १०००रु. ग्रामपंचायतीला द्यावे लागतात.

याशिवाय, तिथं बांधलेली घरं एकसारखी आहेत. तीन मजली.. खालच्या मजल्यावर गोठा, शेकोटीची जागा, मधल्या मजल्यावर खाण्याच्या वस्तू साठवतात तर तिसऱ्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था असते.

मातीचं बांधकाम असलेली घरं एकसारखी बांधणी असलेली असतात.

 

malana village inmarathi

 

शिक्षणही केवळ बारावीपर्यंतच आहे. आधी फक्त माध्यमिक शिक्षण मिळत होतं. आजवर या गावांतून फक्त दोनच विद्यार्थी १२ वी पर्यंत शिकले आहेत.

असं हे गाव… शांती आणि सुखाचा मंत्र घेऊन निवांतपणे रहस्यमय आयुष्य जगणारं!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?