' “तेव्हाचे” आणि “आजचे” : स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान कुठल्या कुठे पोहोचलेत पहा! – InMarathi

“तेव्हाचे” आणि “आजचे” : स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान कुठल्या कुठे पोहोचलेत पहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फाळणी म्हणजे आपल्या देशाला पडलेले एक भयावह स्वप्नच. कारण ही फाळणी म्हणजे इतकं सोप्पं नव्हतं की हा आजपासून पाकिस्तान आणि हा आजपासून हिंदुस्तान.

ह्यामुळे कित्येक घरं उध्वस्त झाली, कित्येक नाती तुटली, लोकांमध्ये आणि त्यांच्या संबंधांमध्ये कटुता आली. प्रचंड नरसंहार झाला, निष्पाप लोकं मारली गेली, स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे सगळं आजही आठवलं तरी कित्येक मनं अस्वस्थ होतात. १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि त्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला!

 

partition inmarathi
washingtonpost.com

 

त्या दिवसापासून दोन्ही देश आपापल्या मार्गावर चालू लागले. आणि ह्या दोन देशांमधली कटुता आणखीन वाढतच गेली, मग ती युद्धभूमी असो वा क्रिकेटचे मैदान.

पाकिस्तान पेक्षा भारत कसा श्रेष्ठ आहे आणि राहिल हे आजवर आपण ऐकत आलोच आहोत. पण मुळात जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा पाकिस्तानला जो भूभाग देण्यात आला तो बराच भाग सुपीक होता.

पण त्या मिळालेल्या भूभागाचं सोनं करून देशाची प्रगती करायचं सोडून, धर्मांध पाकिस्तानने कशाप्रकारे दहशतवादाला खतपाणी घातलं ते आपण याची देही याची डोळा पाहिलं आहे!

त्यामुळे खरं सांगायचे झाले तर पाकिस्तानच्या आत्ताच्या परिस्थितीला जवाबदार त्यांचे “नापाक मनसुबेच” आहेत हे पदोपदी सिद्ध झालं आहे!

तिथला शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक दर्जा घसरत चालला असून एक दहशतवादी कारवाया करण्यात अग्रेसर देश अशी पाकिस्तानची प्रतिमा साऱ्या जगात तयार झाली आहे!

आज ह्याच विषयी आपण विस्तृतपणे जाणून घेणार आहोत की भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात तुलना समजा केली गेली तर आपल्याला समजून येईल की आपण जिथे आहोत तिथे पोहोचण्याचा विचार सुद्धा पाकिस्तानला करता येणार नाही!

ह्याच विषयावर आपण मुद्देसूद चर्चा करूया.

१. क्रीडा :

 

india pak sports inmarathi
businessinsider.in

 

क्रीडा विश्वात भारत हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मग ते क्रिकेट, फुटबॉल, किंवा हॉकी असो. ह्या तिनही खेळात पाकिस्तानचं सुद्धा योगदान आहे पण तरीही आपण त्यांच्यापेक्षा खेळात खूप अव्वल आहोत!

आणि फक्त हे ३ खेळच नव्हे तर ऑलिम्पिक च्या कित्येक खेळात, कबड्डी, कुस्ती, बुद्धिबळ, शूटिंग, अशा कित्येक खेळांमध्ये भारतीयांनी तिरंगा रोवला आहे! 

तर पाकिस्तान क्रिकेट, फुटबॉल, हॉकी हे खेळ सोडल्यास बाकी इतर खेळात आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरलेला आहे!

 

२. शिक्षण :

 

education inmarathi
thestatesman.com

 

देशाची प्रगती नेहमीच तिथल्या शैक्षणिक दर्जावर अवलंबून असते. आणि यात कोणतंही दुमत नाही की यात भारत हा सदैव पुढे आहे आणि राहील. नुकतीच आपल्या देशाने शैक्षणिक धोरणं बदलायचा निर्णय घेऊन दाखवून दिलं आहे की आपल्या देशात शिक्षणाला कीती महत्व आहे!

आयआयटी, आयआयएम सारख्या मोठ्या शिक्षणसंस्था, इंजिनियरिंग आणि स्पेस रिलेटेड शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या अशा कित्येक गोष्टींमुळे आपल्या देशातले विद्यार्थी हे जगात देशाचं नाव मोठं करत आहेत!

गुगल, पेप्सीको, मायक्रोसॉफ्ट सारख्या जगातल्या मोठ्या कंपन्यांचं नेतृत्व सुद्धा भारतीयांच्याच हातात आहे. 

ह्या सगळ्यासमोर फक्त धर्माची शिकवण देणारा पाकिस्तान उभा सुद्धा राहू शकत नाही. असं नाही की तिथे शिक्षणाची सोय नाही, पण तिथे दिली जाणारी धर्माची शिकवण हीच सर्वोत्तम हा नियम असल्याने इतर गोष्टींना तिथे किंमत शून्य आहे!

 

३. वैद्यकीय क्षेत्र :

 

medicines inmarathi
globalvillagespace.com

 

पाकिस्तान मध्ये पसरलेली एकंदर अराजकता, दहशतवाद्यांशी त्यांचे असलेले संबंध आणि पाकिस्तानचे मनसुबे ह्यामध्ये सर्वात जास्त होरपळली जाते ती म्हणजे तिकडची सामान्य जनता!

 अन्न वस्त्र निवारा ह्या पलीकडे सुद्धा लोकांना वैद्यकीय सेवा कीती अत्यावश्यक असतात हे आपण ह्या कोरोना महामारीच्या काळात अनुभवलं आहेच.

भारताचा हेल्थ केयर इंडेक्स हा पाकिस्तानपेक्षा उत्तमच आहे. ह्यात भारत सध्या ३२ व्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान ५८ व्या!

नक्कीच भारताला आणखीन ह्यातही पुढे जायचं आहे आणि भाविष्यात आपण प्रगती करू!

 

४. स्पेस टेक्नॉलॉजी :

 

space inmarathi
thequint.com

 

भारत हा विकसनशील देश असला तरी ह्या क्षेत्रात भारताने खूप उंच भरारी मारलेली आहे.

अब्दुल कलाम, विक्रम साराभाई अशा कित्येक तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनामुळे आपण मंगळयान, चंद्रयान सारखी कित्येक मिशन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकलो!

ह्या क्षेत्रात पाकिस्तानचं नाव सुद्धा तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. कारण त्यांच्या डोक्यातली रॉकेट्स ही फक्त मानवजातीची हानी करू शकतात, प्रगती नाही!

 

५. औद्योगिक क्षेत्र :

 

make in india inmarathi
techjuice.pk

 

मेक इन इंडिया सारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मधून आता भारत आत्मनिर्भर बनू पाहतो आहे. वेगवेगळ्या औद्योगिक तसेच निर्मिती क्षेत्रात भारत नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे. सर्वात जलद वाढणारी इकॉनॉमी म्हणजे भारत!

ह्या सगळ्यात फक्त तांदूळ, सफरचंद आणि कॉटन एक्सपोर्ट सोडलं तर पाकिस्तान कुठे उभा आहे? कार प्रोडक्शन मध्ये भारत ६ व्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान पहिल्या ४० मध्ये सुद्धा नाही!

 

६. मनोरंजन :

 

entertainment inmarathhi
sabrangindia.in

 

आपण भारतीयांनी ऑस्कर पर्यंत मजल मारली असून इरफान खान पासून प्रियांका चोप्रा पर्यंत कित्येक भारतीय कलाकारांनी वर्ल्ड सिनेमामध्ये भारताचं नाव मोठं केलं आहे!

शिवाय मनोरंजन क्षेत्रात जितकी मुभा किंवा सूट आपल्या देशात आहे तिच्या १०% सुद्धा सूट पाकिस्तान मध्ये असती तर पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊन त्यांची कला सादर करायची गरज पडली नसती!

कलाकाराला जात धर्म नसते हे जरी खरं असलं तरी हा नियम पाकिस्तानात मान्य नाही त्यामुळे तिथलं मनोरंजन क्षेत्र सुद्धा संकुचित वृत्तीमुळे मागे पडलं आहे!

 

७. अर्थव्यवस्था :

 

economy inmarathi
youtube.com

 

दोनही देशात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या गरीब लोकांची संख्या भरपूर आहे. तरीही जीडीपी चा अभ्यास करता भारत त्यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे म्हणजेच २.७२ लाख करोड आपला जीडीपी आहे.

तर पाकिस्तानचा जीडीपी ३१४५८ करोड आहे, आणि ह्यात पाकिस्तान ४२ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे यापुढची चर्चा देखील निरर्थक ठरेल!

 

८. पर्यटन :

 

tourism inmarathi

 

आज अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात तुम्ही कुठेही कधीही बिनधास्त फिरू शकता. शिवाय भारत सरकारने इथल्या पर्यटनाला वाव मिळण्यासाठी खूप खटाटोप केल्याचे आपण बघितले आहे!

पाकिस्तान मध्ये सुद्धा पर्यटनस्थळे आहेत. पण तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे जितकी सुरक्षा तुम्हाला भारतात मिळेल तितकी सुरक्षा पाकिस्तानी पर्यटनस्थळी मिळणं जरा कठीणच आहे!

तर हे होते काही मुद्दे ज्यावरून सिद्ध होतं की भारत फाळणीनंतर सुद्धा पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे होता, आजही आहे आणि सदैव राहील!

ह्याचं कारण म्हणजे जगातली उत्तम लोकशाही आणि आपल्या देशाचा सगळ्यांना सामावून घेण्याचा व्यापक विचार. म्हणूनच तर म्हणतात ना “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?