शेअरहोल्डर्स आणि स्टेकहोल्डर्स मध्ये बरेच जण गफलत करतात, जाणून घ्या नेमका फरक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर या दोन संज्ञा बऱ्याच जणांना एकच वाटतात. अनेक जण असेही म्हणतात की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर मध्ये जास्त फरक नसतो. पण खरंच असं आहे का? तर त्याचं उत्तर आहे- नाही.

शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर या दोन वेगवेगळ्या परिभाषा आहेत. या दोन भिन्न गोष्टींमधील लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा संक्षिप्त लेख!

Difference-between-stakeholder-and-shareholder-marathipizza00

शेअरहोल्डर हा तो व्यक्ती असतो (किंवा एखाद्या व्यवसायाच्या किंवा संस्थेच्या रुपातही असू शकतो) ज्याच्या नावावर कंपनीमधील ठराविक स्टॉक्स असतात.

शेअर मार्केट मधून कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले की तो व्यक्ती त्या कंपनीचा शेअरहोल्डर म्हणजे एकप्रकारे कंपनीचा सहमालक/मालकीतला भागीदार असतो.

शेअरहोल्डर कंपनीमधील कामकाजाला जबाबदार नसतो. कंपनीमध्ये काय सुरु आहे याच्याशी त्याला देणघेण नसतं. कंपनी नफ्यात असल्यास नफ्यातील ठराविक हिस्सा त्याला कंपनीतर्फे मिळतो किंवा तो आपले स्टॉक्स विकून देखील हा फायद्यात राहू शकतो.

Difference-between-stakeholder-and-shareholder-marathipizza01

स्रोत

आता जाणून घेऊया स्टेकहोल्डर बद्दल!

स्टेकहोल्डर हा कोणीही व्यक्ती असू शकतो जो कंपनीशी जोडला गेला आहे आणि ज्याच्यावर कंपनीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडत असतो.  स्टेकहोल्डर हा कंपनीला जिवंत ठेवतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. स्टेकहोल्डर नसेल तर कंपनी जास्त काळ तग धरू शकत नाही.

आपण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो कंपनीचा शेअरहोल्डर असतो तो एकप्रकारे ऑटोमॅटिकपणे कंपनीचा स्टेकहोल्डर सुद्धा असतो, पण जो स्टेकहोल्डर असतो तो मात्र कंपनीचा शेअरहोल्डर असेलच असे नाही. म्हणजे हे असं झालं की चौकोन हा त्रिकोण असतो, पण त्रिकोण हा चौकोन नसतो.

Difference-between-stakeholder-and-shareholder02

स्रोत

अजूनही लक्षात येत नाहीये, चला अजून सोप्प करून सांगू.

स्टेकहोल्डर्स या संकल्पनेला आपण एक मोठे घर मानु जे- ज्यांचे मालकीचे स्टॉक्स आहेत अर्थात शेअरहोल्डर्स तसेच कर्मचारी, ग्राहक, सप्प्लायर्स, कम्युनिटी मेम्बर्स, ट्रेड असोसीएशन्स या सर्वाना सामावून घेते.

जर कंपनी नफ्यात असेल, तिचा विस्तार झाला असेल किंवा कंपनीने आपला व्यवसाय अधिक वाढवला असेल तर या सर्व सकारात्मक गोष्टींचा परिणाम या घरातील सर्वावर होईल. पण घराचे खरे मालक शेअरहोल्डर्सचं राहतील इतर सर्व नाममात्र सदस्य!

आता तुमच्या लक्षात आले असेल की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर या दोन संज्ञा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “शेअरहोल्डर्स आणि स्टेकहोल्डर्स मध्ये बरेच जण गफलत करतात, जाणून घ्या नेमका फरक!

 • June 19, 2017 at 10:22 pm
  Permalink

  १.
  ???
  प्रत्येक चौरस हा आयत असतो पण प्रत्येक आयत हा चौरस नसतो हे अधिक योग्य उदाहरण असू शकेल का?
  ************************
  २. स्टेकहोल्डर ही संकल्पना आरोग्य, शिक्षण, जलसंधारण अशा विषयांवरील सामाजिक प्रकल्पांबाबतही लागू पडते.
  शेयरहोल्डर ही संकल्पना मात्र अशा प्रकल्पांबाबत बहुदा गैरलागू असते.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?