' प्रेरणादायी : नैसर्गिक आलं आणि हळद पिकवून हा “तरुण शेतकरी” कमवतोय १.५२ कोटी – InMarathi

प्रेरणादायी : नैसर्गिक आलं आणि हळद पिकवून हा “तरुण शेतकरी” कमवतोय १.५२ कोटी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘काही तरी पॅशन असणं’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार आवश्यक आहे. तुमच्या आवडीच्या कामांपैकी हे ते काम असतं, जे करताना तुम्ही अजिबात थकत नाही. उलट तुम्हाला ते काम सतत करावं असंच वाटतं.

3 इडियट्स या लोकप्रिय हिंदी सिनेमात आमिर खान म्हणजेच रॅंचो च्या तोंडी एक डायलॉग आहे, “पॅशन को follow करो, पैसा अपने आप कमाओगे”. हे अगदी बरोबर आहे.

 

3 idiots InMarathi

 

फक्त हे ज्ञान भारतात जरा उशिराने आलं असं म्हटल्यास जुन्या पिढीला अगदी योग्य वाटेल. किती तरी लोक आज नोकरी वेगळ्या इंडस्ट्री मध्ये करत असतात. पण, ते काम करण्याची त्यांची इच्छा अजिबात नसते.

काही जण इंजिनियरिंग करतात, मग MBA करतात आणि मग बँकेत नोकरी करतात. बँकेतच नोकरी करायची होती तर इंजिनियरिंग का केलं? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतं.

याचा पूर्ण दोष त्यांना न जाता पालकांना सुद्धा जातो, ज्यांनी मुलाचा कल लक्षात न घेता त्याच्यावर सतत फक्त अपेक्षा लादल्या.

देवेश पटेल – गुजरात मधील आनंद येथे राहणारा एक असा तरुण ज्याने पालकांच्या समाधानासाठी कम्प्युटर इंजिनियरिंग पूर्ण केलं. पण, करिअर निवडतांना त्याने शेतीचा पर्याय निवडला.

आज तो नैसर्गिक हळद आणि अद्रक (आलं) पिकवून वर्षाला १.५ कोटी इतकं उत्पन्न कमवत आहे.

 

devesh patel farming inmarathi
thebetterindia.com

 

देवेश पटेलची शेती करण्याची पद्धत जरा वेगळी आहे. त्याचा कल नेहमी कमी माणसांकडून जास्त आउटपुट कसं मिळवता येईल आणि सोप्या मशिनरीचा वापर करून नफा कसा वाढवता येईल या गोष्टीकडे असतो.

म्हणजेच, टिपिकल ‘बिजनेस अप्रोच’ त्याने शेती मध्ये आणला आहे.

गुजरातच्या बोरीयावी या गावात देवेश पटेल काम करतात. तिथे मुबलक पाण्याचा अभाव आहे. आलं आणि हळद यांना पिकवण्यासाठी कमी पाणी लागतं.

देवेश पटेलने अशी एक मशीन तयार केली आहे ,जी की अगदी सहज कुठेही नेण्यासारखी आहे आणि उच्च दर्जाचं हळदीचं उत्पादन करून देऊ शकते.

Satva Organic या नावाने २००५ मध्ये देवेशने हळद, लोणचं, अद्रक पावडर, चहा मसाला या गोष्टींचं उत्पादन सुरू केलं. सध्या Satva Organic या ब्रँड खाली २७ वस्तू या उत्पादन करून भारतात विकल्या आणि निर्यात केले जातात.

 

devesh patel farming inmarathi2
thebetterindia.com

 

प्रत्येक महिन्यात त्याला जवळपास १५,००० ऑर्डर्स असतात आणि एका वर्षात जवळपास ६ टन आलं आणि हळद ही अमेरिका आणि युरोप खंडातील इतर देशात निर्यात केली जाते.

या कामासाठी देवेशने २०० शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली आहे. त्यापैकी काही शेतकरी हे स्वतः आता उद्योजक झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या परिवारात जन्मलेल्या देवेशला लहानपणीपासूनच निसर्गाची आवड आहे. १२ एकर शेती ही त्यांच्याकडे आधीपासूनच होती. त्यामध्ये देवेशने ५ एकर जमीन मित्र आणि काही नातेवाईकांकडून lease वर घेतली.

१९९२ पासून त्याने पूर्ण वेळ organic farming वर लक्ष केंद्रित केलं. देवेश याचं कारण असं सांगतो की,

“जमीन ही आमची माता आहे. त्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरून शेती करू नये हे आम्ही आधीच ठरवलं होतं. केमिकल फ्री अन्न लोकांपर्यंत पोहोचावं हा आमचा मूळ उद्देश आहे.”

२००५ पासून बिजनेसचा ओघ देवेशने मोठ्या प्रमाणात वाढवला. त्याच वर्षी देवेशने कॉम्प्युटर इंजिनियरिंग ची डिग्री पूर्ण केली. त्या वेळी मार्केट मध्ये organic आणि non-organic या दोन प्रकारचे पीक मिळत होते.

devesh patel farming inmarathi3
krishijagran.com

Organic उत्पादनला मागणी होती. पण, शेतकऱ्यांना त्याचा पाहिजे तितका मोबदला “मिडल मॅन” चेन  मुळे मिळत नव्हता. देवेशने ही चेन ब्रेक केली आणि त्यांनी बनवलेल्या लोणच्याची थेट विक्री करायचं ठरवलं.

रोटरी क्लबमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी विक्री करायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्यासोबतच कणिक, ताज्या भाज्या यांचीही विक्री करायला सुरुवात केली.

देवेश ऑर्डर घेत असे आणि कॉलेजला जाताना स्वतः ग्राहकांना वस्तु पोहोचवत असे.

उत्पादीत अन्न पदार्थांपासून चिप्स, गव्हाचं पीठ तयार करण्याच्या निर्णयाने देवेशला खूप फायदा झाला. हे सर्व अन्नपदार्थ FSSAI, India Organic आणि USDA या मान्यवर संस्थांनी प्रमाणित केले आहेत.

कित्येक परिवारांनी देवेशच्या स्टॉल ला भेट देऊन त्यांचे अन्नपदार्थ हे organic हळदीने बनवायला सुरुवात केली आहे.

कित्येक शेतकऱ्यांनी तंबाखूच्या उतपादना ऐवजी देवेशच्या मदतीने organic हळदीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे.

 

devesh patel farming inmarathi1
timesofindia.indiatimes.com

 

सध्या देवेशच्या उत्पादनाला मागणी जास्त आहे आणि पुरवठा करण्याची क्षमता कमी आहे. ही गॅप भरून काढण्यावर देवेश सध्या काम करतोय.

त्यासोबतच, organic farming कसं आवश्यक आणि नफा मिळवून देणारं आहे याचा ते इंटरनेटच्या माध्यमातून टो नेहमीच प्रसार करत असतो.

ग्राहकांना कायम आरोग्यदायी अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशावर उभी असलेली Satva Organic ही लवकरच या क्षेत्रातील जगातली अग्रगण्य कंपनी असेल याबाबत कोणालाही शंका नाहीये.

देवेश पटेल सारखे यशस्वी शेती उद्योजक एक मौल्यवान संदेश देतात की, “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.”

शेती मधील अडचणींवर सतत चर्चा करण्यापेक्षा असे मार्ग काढत आपण पुढे गेलो, तर शेतकऱ्यांचे हाल, त्यांना असणारे नैराश्य नक्की कमी होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?