' "शेअर मार्केट म्हणजे पैसे बुडाले" हा तुमचा समज कायमचा दूर करणारे ७ फायदे वाचा!

“शेअर मार्केट म्हणजे पैसे बुडाले” हा तुमचा समज कायमचा दूर करणारे ७ फायदे वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मार्च महिन्यापासून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त बहुतांश सगळेच व्यवहार ठप्प आहेत. कोरोनाच्या संकटाने अनेकांचं आर्थिक गणितच बिघडवून टाकलंय.

 

savings inmarathi featured

 

पगारात झालेली कपात, किंवा अनेक व्यवसायांना लागलेलं टाळं यांमुळे अनेकांनी अखेरिस आपल्या साठवलेल्या पुंजीकडे हात वळवला.

त्यामुळे घरातल्या वडिलधा-यांनी सांगितलेल्या आर्थिक गुंतवणूकीचं महत्व आपण सगळ्यांनीच या काळात पुन्हा एकदा अनुभवलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

प्रत्येकासाठीच आर्थिक गुंतवणूक गरजेची असली तरी त्याची पद्धत मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. याच विषयावरून अनेक घराघरात आधी संवाद आणि नंतर वाद झालेलेही तुम्ही पाहिले असतील.

गुंतवणूकीसाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती बॅंकांना प्राधान्य देतात तर मध्यमवयीन पालक म्युच्युअल फंडांसारख्या काही वाटा शोधतात. घरातील तरुण मात्र हट्टाने शेअर मार्केट्सना पसंती दर्शवतात.

त्यानंतर मात्र घरात प्रत्येकजणच एकमेकांचे आर्थिक सल्लागार होतात आणि एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात.

 

fight inmarathi

 

त्यातच शेअरमार्केट म्हणजे पैसे बुडले यावर सगळ्यांचं एकमत होतं. यापुर्वी काही परिचितांना शेअरमार्केटमुळे झालेला तोटा वारंवार आठवून तुम्ही स्वतःचेही हेच मत बनवून घेत असाल तर जरा थांबा.

शेअर मार्केटला नावं ठेवण्यापुर्वी त्याबाबतच्या या काही खास बाबी तुम्ही वाचल्याच पाहिजेत.

शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे केवळ खात्रीदायकच नव्हे तर फायदेशीरही आहे याची तुम्हाला खात्री पटेल.

चला तर, असे काही फायदे बघुयात की ज्यामुळे शेअरमार्केटकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि कदाचित गुंतवणूकीचा एक सशक्त पर्याय तुमच्यापुढे खुला होईल.

 

१. बुद्धीमत्ता असेल नफा तुमचाच :

इतर कोणत्याही गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये त्या संस्थेने (बॅंक, पोस्ट किंवा पतपेढी) ठरविलेल्या इंटरेस्ट रेटवर तुमचा आर्थिक फायदा अवलंबून असतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर काही ठिकाणी समाधानकारक असला तरी उर्वरित सर्वांकडूनच गुंतवणूकीचा दर अत्यंत कमी असल्याची तक्रार नेहमीच केली जाते.

आपल्या कष्टाच्या रक्कमेला योग्य दर मिळत नाही, आपल्याला गुंतवणूकीसाठी इतरांवर अवलंबून रहावं लागतंय असं तुम्हालाही वाटतंय? मग शेअर मार्केटचा पर्याय एकदा ट्राय करायला काय हरकत आहे.

 

Stockmarket.marathipizza

 

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा दर हा कोणत्याही संस्थेवर अवलंबून नसतो, किंवा तो दिर्घकाळासाठी ठरलेला नसतो. त्यात दररोज बदल होत असतो.

त्यामुळे त्याच्या दररोज बदलणा-या दरानुसार तुम्हाला दररोज फायदा कमाविण्याची संधी असते, मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवहाराबाबत दररोज सतर्क असणं गरजेचं आहे.

या आर्थिक व्यहारात रुची घेत त्यातले बारकावे शिकलात तर तुमच्याच बुद्धीच्या आधारे तुम्ही आर्थिक फायदा पटकावू शकता, ते ही दररोज!

 

२.  कुठेही असलात तरी व्यवहार करा :

आपलेच पैसे गुंतवण्यासाठी बॅंकेत तासनतास रांगेत उभे राहताना जीव मेटाकुटीला येता ना? चीड चीड होते, निराश वाटतं पण पर्याय नसल्याने पुन्हा तेच करावं लागतं.

मात्र शेअर मार्केटचा हा पर्याय तुम्हाला या सगळ्या त्रासातून वाचवू शकतो. कारण शेअर मार्केटचं ट्रेडिंग तुम्ही जगभरात कोठूनही करु शकता.

यासाठी तुमचं डिमॅट अकाऊंट उघडण्यात आल्यानंतर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असलात तरी निर्धास्तपणे ट्रेडिंग करा.

 

share market inmarathi

 

शेअरमार्केटबाबतच्या सगळ्या घडामोडी तुमच्या कम्प्युटर, मोबाईल यांच्या आधारे प्रत्येक क्षणाक्षणाला पाहता येतात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक व्यवहाराचं ट्रॅकिंग तुम्हाला ठेवता येत असल्याने व्यवहारात नफा होत असल्याचे दिसताच तुम्ही त्याबाबतचे निर्णय़ घेऊ शकता.

 

३.  सर्वोत्तम नफा :

सध्या शेअर मार्केटबाबतच्या घडामोडींवर एक नजर टाका म्हणजे त्यातील अनेक कंपन्यांच्या शेअर्स किंमतीत होणारी वाढ पाहून थक्क व्हाल.

आपणही यामध्ये पैसे गुंतवायला हवे होते असं वाटल्याखेरीज राहणार नाही. मात्र त्यासाठीच वेळीच निर्णय घ्या.

 

Stockmarket.marathipizza3

 

शेअर मार्केटमधून तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या व्यवहारातला सर्वाधिक नफा मिळण्याचीही शक्यता आहे. मात्र त्यासाठी तुमचे कान आणि डोळे सदैव उघडे राहणं गरजेचं आहे.

 

४. छोट्या रकमेपासून सुरुवात :

खर्चाचं गणित सोडवल्यानंतर अनेकांच्या खिशात गुंतवणूकीसाठी फार थोडी रक्कम शिल्लक राहते. अशावेळी इतकी कमी रक्कम नेमकी कुठे साठवावी हे सुचत नाही.

मात्र शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी किमान रक्कमेची मर्यादा नाही.

 

savings inmarathi

 

तुमच्याकडे कितीही रक्कम असो, त्यानुसार तुम्ही मार्केट रेट तसेच त्यात होणा-या घडामोडींचा अंदाज घेत व्यवहार करु शकता.

त्यामुळे छोट्या रकमेपासून सुरुवात करत तुम्ही मोठ्या नफ्याचे ध्येय गाठू शकता.

 

५. कोणत्याही क्षणी परतावा :

इतर कोणत्याही पर्यायांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर मुद्दल परत मिळवण्यासाठी आपल्याला ठराविक कालावधीपर्यंत थांबावं लागतं.

अनेकदा आपल्याला अडचणीच्या काळातही आपले हक्काचे पैसे काढता येत नाहीत, किंबहूना त्याची वाट पहावी लागते. अन्यथा अतिरिक्त नफ्यावर पाणी सोडावं लागतं.

मात्र शेअर मार्केटमधील गुंतवणूकीत कोणत्याही प्रकारची वाट पहावी लागत नाही. रोजच्या निरिक्षणाच्या आधारे तुम्ही दररोज व्यवहार करु शकता, इतकेच नव्हे तर तुम्हाला गरज असेल तेंव्हा काही मिनिटांमध्ये घरबसल्या पैसे काढून घेऊ शकता.

 

money inmarathi

 

त्यासाठी कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही की वेळ वाया घालवण्याचं दुःख नाही.

 

६. तुम्हीच स्वतःचे बॉस :

पैसे गुंतवताना तुम्हाला संबंधित संस्था, त्यांचे नियम, तेथिल वरिष्ठ यांपासून अनेकांची मदत घ्यावी लागते. घरातल्या ज्येष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे लागतं, यामध्ये अनेकदा मतभेद होण्याचीही शक्यता असते.

मात्र शेअरमार्केटमध्ये ड्रेडिंग करताना तुम्हीच तुमच्या आर्थिक व्यवहारांचे बॉस असाल. कारण तुमची गुंतवणूक, त्यात रोज होणारे चढउतार, त्यात होणारा नफा यासारख्या सगळ्या बाबी तुम्हाला स्वतःला क्षणाक्षणाला पडताळून पाहता येतात.

 

Indian-Stock-Market-Tips-marathipizza01

तुम्हाला संपुर्ण निर्णय स्वातंत्र्य असल्याने कुणावरही अवलंबून रहावे लागत नाही, त्यामुळे या प्रोसेसमधून अनेकांना आर्थिक व्यवहाराच्या अनेक गोष्टी शिकताही येतात.

अर्थात पहिल्यांदाच या क्षेत्रात गुंतवणूक करत असाल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण त्यासाठी काही व्यावसायिक मार्गदर्शकांची मदत तुम्ही घेऊ शकता.

 

७.  सोपी प्रक्रिया :

शेअर मार्केट ही गुंतवणूकीची अत्यंत सोपी प्रक्रिया आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण घऱबसल्या एका क्लिकवर ही प्रक्रिया करता येते. ना कोणते फॉर्म्स ना ताटकळणा-या रांगेची कटकट.

या प्रक्रियेत रिस्क असल्याचं अनेकांकडून सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात काळजीपुर्वक प्रत्येक व्यवहार केला तर ही पारदर्शक प्रक्रिया असल्याचं तुम्हाला नक्कीच लक्षात येईल.

 

share market on click inmarathi

 

या क्षेत्रात प्रत्यक्ष व्यवहारास सुरुवात केल्यानंतर शेअर मार्केटचे हे फायदे तुम्हाला निश्चितच जाणवतील, मात्र इतर व्यवहारांप्रमाणेच ही सारी पैशाची दुनिया आहे हे विसरु नका.

या व्यवहारात पुर्णपणे धोका नसला तरी तुमचे कान आणि डोळे सतत उघडे असणं गरजेचं आहे. मुख्यतः अतिघाई धोक्याची ठरु शकते, त्यामुळे एखादा निर्णय़ घेताना त्याची पुर्ण माहिती करून घ्या आणि खात्री झाल्यानंतरच व्यवहार करा.

शेअर मार्केटची सगळी माहिती इंटरनेटवर अनेक ठिकाणी उपलब्ध असते, तसंच त्याबाबत मार्गदर्शन करणारे व्यावसायिकही आहे, त्यांच्याशी चर्चा करून मगच निर्णय घ्या.

 

adviser inmarathi

 

अभ्यास करून, माहिती घेऊन मग निर्णय घेतलात तर शेअर मार्केटमधून चांगला घसघशीत फायदा कमवू शकाल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?