' ही कुत्री प्रत्येक माणसाचं स्वप्न शब्दशः जगली आहे! जाणून घ्या, तिचा भावूक जीवनप्रवास! – InMarathi

ही कुत्री प्रत्येक माणसाचं स्वप्न शब्दशः जगली आहे! जाणून घ्या, तिचा भावूक जीवनप्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

संवेदनशीलता ही कमी जास्त प्रमाणात प्रत्येक व्यक्ती मध्ये असते. काही जण त्याबद्दल मोकळेपणाने बोलतात; तर काही जणांना आपल्या संवेदना सांगण्यासाठी शब्द सापडत नसतात.

एखाद्या रस्त्यांवरून जाताना आपल्याला एखाद्या छोट्या प्राण्याला मोठ्या गाडीची धडक झाल्याचं दृश्य दिसतं आणि नंतर किती तरी वेळ आपल्या डोळ्यासमोरून ती घटना जातच नाही.

दोन महिन्यांपूर्वी केरळ मध्ये एका हत्तीणीला एका माणसाच्या चुकीमुळे किंवा खोडसाळपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता. ह्या घटनेने पूर्ण देश हळहळला होता.

 

elephant killing inmarathi
flyingnation.com

 

इतकंच नाही, तर कोणत्याही औषधाची निर्मिती ही प्राण्यांवर प्रयोग केल्याशिवाय होतच नाही हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. म्हणजे, प्राणी आणि त्यांचा जीव हा आपण अगदीच गृहीत धरला आहे.

विज्ञान तर प्राण्यांचा जीव पणाला लावतेच; पण, त्याही पुढे जाऊन एखाद्या देवाला प्रसन्न करण्यासाठी प्राण्यांची बळी देणं ही आपल्या समाजाने मान्य केलेली गोष्ट आहे.

जर्मनी सारखे काही देश आहेत जे, की सध्या Vegan ही फक्त शाकाहारी अन्न घेण्याची पद्धत आवडीने आत्मसात करत आहेत. हा बदल खूपच स्वागतार्ह आहे. प्राण्यांचा जीव धोक्यात घालण्याची ही पद्धत आजची नाहीये.

१९५० च्या दशकात सोव्हिएत युनियन देशाने अमेरिकन स्पेस रिसर्च संस्था NASA मार्फत ‘लायका’ नावाच्या एका जिवंत कुत्र्याला अवकाशात पाठवलं होतं.

या मिशन ला Spuntik 2 हे नाव देण्यात आलं होतं. ३ नोव्हेम्बर १९५७ रोजी या मिशन ने पूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

 

sputnik 2 inmarathi
history101.com

 

‘रॉकेट सायन्स’ च्या सुरुवातीपासूनच अवकाशात सजीव सृष्टी निर्माण करता येईल का? या कुतुहलापोटी प्राण्यांना अवकाशात पाठवण्यात आलं होतं आणि काहींना सुखरूप परत आणण्यात सुद्धा आलं होतं.

Microgravity म्हणजेच ‘सुक्ष्मगुरुत्वाकर्षण’ चा अभ्यास करण्यासाठी कित्येक अंतरळवीरांनी मासे, उंदीर, जेलिफिश, झुरळ, खेकडा अश्या कितीतरी प्राण्यांना अंतराळात अभ्यास करण्यासाठी पाठवलं आहे.

‘लायका’ ही कुत्री मॉस्को च्या एका रस्त्यावर सापडली होती. रस्त्यावर सापडल्याने तिची भूक आणि थंड वातावरण सहन करण्याची सहनशक्ती इतर कुत्र्यापेक्षा नक्कीच जास्त असणार या अंदाजाने तिला अंतराळात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘लायका’ सोबत दोन अजून दोन कुत्र्यांना अवकाश यात्रेसाठी एकाच वेळी ट्रेनिंग देण्यात आली होती. एका छोट्या पिंजऱ्यात ठेवून त्यांना जेली खाऊ घालण्यात येत होती. कारण, अवकाशात तेच त्यांचं अन्न असणार होतं.

‘लायका’ चं खरं नाव हे Kudravka किंवा Little Curly हे होतं. त्याला शॉर्ट करून Laika म्हणजेच एका रशियन शब्दाचं नाव देण्यात आलं होतं.

‘लायका’ च्या दुर्दैवाने तिचा हा अवकाश दौरा हा फक्त वन वे ठरला. ‘लायका’ अवकाशात किती वेळ जगू शकली हे काही कळलं नाही. कदाचित हा काळ काही तासांचा असेल किंवा काही दिवसांचा असेल.

 

laika dog inmarathi
fantascienzaitalia.com

 

Sputnik 2 या तिला पाठवण्यात आलेल्या अवकाशयान ला एप्रिल १९५८ मध्ये आग लागली इतकंच फक्त नासाला कळलं.

१९४७ पासूनच अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश प्राणी असलेले रॉकेट्स अवकाशात पाठवत होते. आकाश आणि अंतराळ मध्ये एक ११० किलोमीटर अंतराची एक लाईन आहे ज्याला ‘कर्मन लाईन’ म्हणतात.

अंतराळात जाणाऱ्या पहिल्या जिवंत प्राण्याचं नाव fruit flies म्हणजेच फळांवर जगणारे काही किडे होते. पहिला प्राणी ज्याने अंतराळात प्रवेश केला त्याचं नाव अल्बर्ट 2 असं होतं.

अल्बर्ट 1 हे मिशन अयशस्वी झालं होतं. पण, अल्बर्ट 2 हे माकड १४ जून १९४९ रोजी ‘कर्मन लाईन’ पर्यंत पोहोचलं होतं. अल्बर्ट 2 ला फ्लाईट मध्ये अनेस्थेशीया देण्यात आला होता. पण, परत येताना एक झटका बसला आणि त्यात अल्बर्ट 2 मरण पावला.

अमेरिका हे सतत माकडांना पाठवून अंतराळाचं वातावरण चेक करत असत, तर रशिया हे नेहमी कुत्र्यांना पाठवून त्यांचा अंतराळ अभ्यास करत असते.

 

albert 2 monkey inmarathi
universetoday.com

 

१९५० आणि १९६० च्या दशकात रशिया ने जवळपास ५७ कुत्र्यांना अंतराळात पाठवण्यासाठी तयार केलं होतं आणि पाठवलं सुद्धा होतं.

‘लायका’ नंतर रशिया ने अजून २ कुत्र्यांना अंतराळात पाठवले होते. त्यांचं नाव बेलका आणि स्ट्रेलका असं होतं. १९ ऑगस्ट १९६० रोजी हे दोघेही अंतराळात पोहोचले होते आणि सुखरूप जिवंत परत सुद्धा आले होते.

सप्टेंबर १९५१ मध्ये अमेरिकेने योरीक नावाच्या माकडाला इतर ११ उंदरांसोबत अंतराळात पाठवलं होतं आणि हे सगळे जिवंत परत आले होते असा दावा अमेरिकेने केला होता.

‘लायका’ ला ट्रेनिंग देणाऱ्या Adilya Kotovskaya या ९० वर्षीय रशियन ट्रेनर ने ‘लायका’ बद्दल बोलताना हे सांगितलं होतं,

“पृथ्वी च्या ९ कक्षांपैकी ‘लायका’ ही अशी एकमेव कुत्री होती जिने जिवंत पणे वरच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि तिच्या त्यागामुळे इतर मिशन कसे असावेत याची माहिती नासाला मिळाली.

 

laika dog inmarathi1
independent.co.uk

 

कुत्री निवडण्याचं कारण म्हणजे त्यांना मूत्र विसर्जनासाठी पाय उचलावा लागत नाही. त्यामुळे त्यांना सर्वात कमी जागा लागते.”

२०१० मध्ये Animal Rights कडून वाढत्या दबावामुळे नासाने माकडांना अंतराळात पाठवण्याचं मिशन हे रद्द केलं होतं.

रशियाच्या एका अंतराळवीराने ‘लायका’ या ३ वर्षाच्या कुत्रीच्या आठवणीत हे सांगितलं होतं की, “टेक ऑफ च्या काही दिवस आधी मी ‘लायका’ ला घरी नेलं होतं. ३ दिवस आधी मी तिला यान मध्ये बसवलं.

त्या यानात तिला अजिबात हलता येत नव्हतं. अगदी काही इंच ती हलू शकत होती. तिच्या यानाला सेन्सर बसवण्यात आले होते आणि तिला आम्ही स्पेससूट घातला होता.

३ नोव्हेम्बर १९५७ रोजी सकाळी ५.३० वाजता तिच्या यानाने टेक ऑफ केलं. तिच्या हृदयाचे ठोके तीन पटीने वाढले होते. १०३ मिनिटात ते यान अवकाशात पोहोचलं होतं.

पण, heat shield खराब झाल्याने यानातील तापमान अचानक पणे ९० डिग्री पर्यंत वाढलं आणि त्यामुळे आम्ही ‘लायका’ ला वाचवू शकलो नाही.”

२०१५ मध्ये रशिया ने ‘लायका’ चा पुतळा तयार केला आणि ‘लायका’हे ती सापडली होती त्या रस्त्याला नाव दिलं.

 

laika dog inmarathi2
guiarus.com

 

UAE च्या अजमन या भागाने ‘लायका’ च्या नावाचं पोस्ट स्टॅम्प तयार करून तिला आपली श्रद्धांजली वाहिली. ‘लायका’ ची स्टोरी ही Youtube वर सुद्धा जगभरातील ६४ लाख लोकांनी बघितली आहे.

प्राण्यांना बोलता आलं असतं, तर त्यापैकी कित्येक प्राण्यांना त्यांचा जीव वाचवता आला असता हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?