' घृणास्पद : रिया चक्रवर्ती वरून समस्त बंगाली मुलींबद्दल “चर्चा” केल्या जाताहेत…! – InMarathi

घृणास्पद : रिया चक्रवर्ती वरून समस्त बंगाली मुलींबद्दल “चर्चा” केल्या जाताहेत…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सुशांत सिंग राजपूत ची केस दिवसेंदिवस भयानक वळण घेत असल्याचं दिसत आहे. दररोज काहीतरी नवीन ब्रेकिंग न्यूज त्याबाबत बाहेर येत आहे आणि एकंदरच ही आत्महत्या नसून एक मर्डर आहे असंच चित्र समोर येत आहे.

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी ह्या प्रकरणाच्या मागे हात धुवून लागला असल्याचं सुद्धा दिसत आहे. शिवाय काही राजकीय वृत्तपत्रांनी मीडियाचं तोंड बंद करण्यासाठी केलेले केविलवाणे प्रयत्न सुद्धा लोकांच्या समोर आले आहेत.

 

arnab goswami inmarathi
maharashtranama.com

 

बॉलिवूड, राजकारण आणि अनेक घटक ह्या प्रकरणात गुंतलेले असल्याची शंका सतत सोशल मीडिया वर व्यक्त होत आहे.

ह्या प्रकरणात मुख्य संशयितांच्या यादीतली रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब ह्यांची कसून तपासणी सीबीआय आणि इडी मिळून करत आहेत.

पण सध्या सोशल मीडिया वर एक वेगळीच चर्चा झडत आहे. ती म्हणजे रिया चक्रवर्ती ही बंगाली असल्याने बंगाली मुली ह्या अशाच असतात, इतरांना त्या फसवतात अशा प्रकारचे स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

tweet inmarathi

 

शिवाय ह्यामध्ये बंगाली मुली ह्या प्रचंड डॉमिनंट असतात, हुशार असतात, आणि समोरच्याची ऐपत बघून त्याला आपल्या जाळ्यात अडकवतात. अशा प्रकारचे विधान सुद्धा त्यात केल्याचे आढळून येईल!

यामधून खूप वाद निर्माण होण्याची शक्यता असून एखाद्या समुदायातल्या सगळ्याच मुलींना सरसकट एकच लेबल लावल्यामुळे वेगळाच मेसेज समाजात पसरवला जात आहे.

यावर बऱ्याच लोकांनी ह्या पोस्टमधले मुद्दे खोडून काढून त्यांना योग्य शब्दात उत्तरे दिली आहेत. ती सुद्धा आपण खालील फोटोमध्ये पाहू शकतो!

 

tweet 2 inmarathi

 

ह्या अशा स्टेटमेंट वर लोकांनी सुद्धा त्यांचा विरोध व्यक्त करून मांडलं की एका व्यक्तीमुळे कोणत्याही विशिष्ट समुदायाला दोष देणं हे खूप चुकीचं आहे!

 

tweet 3 inmarathi

 

ह्या ट्विट मुळे लोकांनी स्टिरियोटाइप होण्याबाबत त्यांची नाराजी सुद्धा व्यक्त केली. मुळात ही पोस्ट कोणी केली? का केली? हे महत्वाचे नसून ह्यामागची मानसिकता आणि कारणं जाणून घेणं जास्त गरजेचं आहे!

हे असं एखाद्या समुदायाला एका विशिष्ट चष्म्यातून बघायला सुरुवात कुठून झाली? तर ती आपल्या कल्चर मधून, आपल्याला दाखवल्या जाणाऱ्या सिरियल्स किंवा फिल्म्स मधून!

आज पारसी लोकं म्हंटली की आपल्यासमोर सुटाबुटातली व्यक्ति उभी राहते. जीचे अगदी ऊंची शौक असतात. जीला केक किंवा बेकरी आयटम खायला आवडते. जी व्यक्ती सर्रास मद्यपान करते, वगैरे वगैरे!

पण आपल्या डोक्यात पारसी लोकांची ही प्रतिमा कुणी निर्माण केली तर सिनेमा आणि सिरियल्सनी!

अगदी याप्रमाणेच आपल्या ह्या कलाकृतींमध्ये देखील आपल्या देशातल्या प्रत्येक राज्याची, विभागाची अशी एक विशिष्ट प्रतिमा आपल्यासमोर निर्माण केली गेली आहे.

 

rustom inmarathi
freepressjpurnal.in

 

पंजाब मधली लोकं एकतर ड्रग्स घेतात किंवा लस्सी पितात किंवा कुठेही नाचायला तयार असतात. हरियाणामधली प्रत्येक व्यक्ति ही पैलवान असून कुस्ती लढायला तयार असते.

राजस्थान मधली सगळी लोकं ही राजवड्यांमध्ये राहात असून भरजरी कपडे आणि दागिने घालून मिरवत असतात. युपी बिहार मधली लोकं ही नेहमी गुन्हेगारीच्या वर्तुळातच असतात आणि सदैव देशी बंदूक घेऊन फिरत असतात.

अगदी हयाप्रमाणेच बंगाली लोकं ही जादूटोणा करण्यात कुशल असतात हे देखील आपण ऐकलं किंवा पाहिलं असेल. इंटरनेट वर सर्च केलं तर बाबा बंगाली नावाच्या वशीकरण मंत्राचा प्रचार करणाऱ्या बाबा बद्दल भरपूर माहिती उपलब्ध होईल.

पण आपण यापैकी कीती गोष्टी स्वतः अनुभवल्या आहेत ह्याचा कधी विचार करत नाही. जे आपल्याला दाखवलं जातं त्यावर आपण सहज विश्वास ठेवून मोकळे होतो आणि त्या त्या विभागातल्या लोकांविषयी आपल्या मनात एक वेगळी इमेज बनवून बसतो!

ह्याच पद्धतीने बंगाली मुलींना सुद्धा एका विशिष्ट साच्यात बसवण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसत आहे. 

देवदास मधली पारो असो किंवा परिणिता मधली ललिता असो बंगाली मुलींची एक ठराविक प्रतिमा अशा कित्येक सिनेमांमधून आपल्या मनात तयार केलेली आहे!

 

bollywood actress inmarathi

 

काजळ घातलेले बोलके डोळे, शृंगार, संगीताची आवड, बंगाली पद्धतीने नेसलेली साडी, मिठाईची आवड, जेवणात असणाऱ्या माशांची रेलचेल अशा कित्येक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात!

एवढच कशाला अनुराग कश्यपच्या “गँग्स ऑफ वासेपूर” च्या पहिल्या भागातलं दुर्गा हे पात्र सुद्धा बंगालन ह्याच नावाने ओळखलं जातं. आणि त्या पात्राला सुद्धा एका विशिष्ट साच्यातच दाखवण्यात आलं.

त्या सिनेमातल्या मुख्य पात्राच्या पत्नीचा दर्जा हा कधीच तिला दिला गेला नाही.

ह्याच कारण एकच की आपल्या सिनेमांमधून बंगाली मुलींची प्रतिमा ही बऱ्यापैकी कामुक आणि प्रवाहाविरुद्ध पोहणारी अशी करण्यात आली आहे. त्यामुळे जेंव्हा ती तिची कामुकता मुक्तपणे मांडते तेंव्हा समाजातली लोकं घाबरून तिच्यापासून ४ हात दूर होतात!

मग ती नुकत्याच नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या बुलबुल सिनेमातली नायिका असो किंवा भुलभुलैया सिनेमातली विद्या बालन ने साकारलेली मंजुलिका!

 

bulbul inmarathi
hindustantimes.com

 

हे सगळं सांगण्याचा प्रपंच एवढ्यासाठीच केला की कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव किंवा चारित्र्य कसं आहे हे त्या व्यक्तीच्या भाषेवरून किंवा राज्यावरून ठरवणं योग्य नाही.

व्यक्ती तितक्या प्रकृती हा नियम आपणच समजून घेतला पाहिजे. आणि आपल्या डोक्यात तयार झालेल्या लोकांबाबतच्या टिपिकल प्रतिमा ह्या पुसून टाकल्या पाहिजेत. नाहीतर समाजात दुफळी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही!

रिया चक्रवर्ती वर लागलेले आरोप खूप गंभीर आहे. पोलिस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था त्यांची तपासणी करून योग्य तोच निर्णय देतीलच.

पण गरज आहे ती आपण अधिक सुजाण बनण्याची आणि कोणत्याही कम्युनिटी ला टार्गेट न करता आपली मतं परखडपणे कुणालाही न दुखावता मांडण्याची.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?