'केवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल

केवळ आवड म्हणून खाल्ला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काळानुसार जसजसा माणसाच्या जीवनशैलीत बदल होत गेला त्याच नुसार माणसाच्या आहार पद्धतीत सुद्धा बदल झाला. पौष्टिक अन्नपदार्थांपेक्षा सोपे व सोयीस्कर असलेल्या अन्ना कडे आपण वळू लागलो. वेळ वाचवण्याचा नादात, संतुलित अन्न या संकल्पनेकडे आपले दुर्लक्ष होत गेले.

आपल्या असंतुलित आहारा मुळे आपण त्या उणिवा पूर्ण व्हाव्या म्हणून आपण मल्टी व्हिटॅमिन टॅबलेट व प्रोटीन शेक्स व अनैसर्गिक उत्पादनान वर अवलंबून राहणे सुरू केले.

ह्या सगळ्याचा फायदा पण झालाच पण त्याचप्रमाणे दुष्परिणामही झाले. जसे की किडनी स्टोन, हॉर्मोन्स चे संतुलन बिघडणे, मासिक पाळीचे वय कमी होणे, हृदय विकार, अॅसिडीटी, रक्तदाबाचा त्रास ईत्यादि.

तसे पाहिले तर आपली भारतीय आहार पद्धत ही भरपूर प्रमाणात विकसित आहे. आपल्या कडे वनस्पती, मसाले, भाज्या, धान्य व त्यांचे योग्य व विशिष्ट कारणांसाठी फायदे होणारे व्यंजन, पदार्थ हे अगदी विचार करून बनवलेगेले आहेत.

आजकाल तर पदोपदी आपल्याला याची प्रचिती येते आहे. आपले स्वयंपाक घर हे कोणत्या औषधालयापेक्षा कमी नाही हे या महामारी काळात, जीवन रक्षक काढ्यानी दाखवून दिले.

असच एक दुर्लक्षित व फक्त आपल्या चविष्ट असण्या साठी प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे दही भात. “दही भात” इतका सोपा, चविष्ट पदार्थ आपण सगळेच आनंदाने खात आलोय.

 

curd rice inmarathi
recipes.timesofindia.com

लहान पणी, वरण भाताचा कंटाळा आला किंवा काही तरी वेगळं चटकदार खायची इच्छा झाली की आपली आई किंवा आजी हमखास आपल्याला दही भात खाऊ घालत असल्याचे कित्येक जणांना आठवत सुद्धा असेल.

पण हा इतका चविष्ट व सगळ्यांच्याच आवडीचा दही भात फक्त महाराष्ट्रापुरता सीमित नसून दक्षिण, गुजराती, जैन आहाराचा सुद्धा एक अमूल्य भाग आहे.

फक्त आवड म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या दही भाताचे आपल्या आरोग्यासाठीचे फायदे काय आहेत ते आपल्याला माहितीच नाही. तर आज तेच जाणून घेऊया.

 

दही भाताचे फायदे –

१) वजन कमी होणे –

 

weight loss inmarathi
thehealthsite.com

 

भात खाल्ला तर वजन वाढते असे आपण सगळे जाणून आहोत, त्या मुळे कित्येकजण आवडत असूनही भात खाणे बंद करतात. ज्या मुळे, भातात असलेले पौष्टिक तत्व आपल्याला मिळत नाही.

पण भातात दही मिसळून खाल्ले तर वजन वाढण्या ऐवजी ते कमी होते. कारण दह्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्या मुळे, पुष्कळ वेळ भूक लागत नाही.

 

२) बद्धकोष्ठतेपासून मुक्ती –

 

stomach inmarathi
thehealthsite.com

 

दह्यात भरपूर प्रमाणात लाईव्ह बॅक्टेरिया, व गुड फॅट असते. हे दोन्ही घटक आपली हेल्थ सुधारून, पाचन व्यवस्था अधिक सुदृढ बनवतात. ज्या मुळे, शरीरात अतिरिक्त गॅस उत्पन्न होत नाही.

 

३) रोगप्रिकारशक्ती वाढवणे –

 

Immunity-inmarathi
hehealthsite.com

 

माणसाची रोगप्रतिकरकशक्ती मुख्यतः पोटाशी संबंधित असते. ती वाढवायची असेल तर पचन शक्ती वाढवण्याची गरज असते. दही भातामुळे पचन प्रक्रिया सुधारते व माणसाची रोगप्रतिारकशक्ती वाढते.

 

४) शरीराचे तापमान कमी करणे –

 

body temprature inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

दक्षिणेतील लोक आपल्या जेवणा नंतर, दही भाताचे नियमित सेवन का करतात या बद्दल कधी आपण विचार केला आहे का? कारण दक्षिणेकडील तापमान सतत उष्ण असते व दही भाताने आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

 

५) तणाव कमी करणे –

 

reduce stress inmarathi
zenefits.com

 

दह्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडंट्स व चांगले फॅट असते. हे घटक आपल्या शरीरातील तणाव उत्पन्न करणाऱ्या घटकांना कमी करून, ताण तणाव कमी करण्यास मदत करतात.

 

६) सुदृढ हाडं –

 

healthy bones inmarathi
josephmuciraexclusives.com

 

कॅल्शियम जे हाडं मजबूत बनवायला व व्हिटॅमिन डी (कॅल्शियम साठवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते), हे दोन्ही घटक दह्यात असतात त्यामुळे आहारात नियमित दह्याचे सेवन केल्यामुळे योग्य प्रमाणात शरीराला कॅल्शियम मिळते.

जास्तीच्या कॅल्शियमच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स पण होऊ शकतात, त्या मुळे दही भात रोज खाल्ल्याने योग्य मात्रेत कॅल्शिअमचा पुरवठा जाऊन आपली हाडे मजबूत राहतात.

 

७) रक्तदाब नियंत्रणात ठेवणे –

 

blood pressure inmarathi

 

दह्यात असलेली पौष्टिक तत्व जसे मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन्स या मुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी दही भात अवश्य आपल्या आहारात समाविष्ट करून घेण्याची गरज आहे.

 

८) नितळ त्वचा –

 

Skin care InMarathi

 

इंग्रजीत एक म्हण आहे “व्ही आर व्हॉट व्ही ईट”, त्या मुळे शरीराला योग्य आहार दिल्यामुळे त्याचे परिणामही तसेच होतात. आपल्या त्वचे करता दह्यातील अँटी ऑक्सीडंट्स फार उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपल्या त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतात.

 

६) मासिक पाळीचा त्रास कमी होणे –

 

periods-inmarathi
newstrack.com

 

दह्यातल्या कॅल्शिअम व पोटॅशियम मुळे स्नायू आपल्या मसल्स रिलॅक्स होतात व मासिक पाळीच्या वेळी होणारी पोट दुखी सुद्धा कमी होते.

 

जर आपण दही भाताला आपल्या आहाराचा भाग करणार असाल तर ही काळजी घ्या –

१) रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे. शरीरास दही बसण्याची संभावना असते.

२) आपण लॅक्टोज इंटोलरंट आहोत का ही चाचणी करून घेणे.

वेस्टर्न आहारतज्ञ देखील आहारातील “कर्ड, योगहर्ट” किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करून घेण्याची एक उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

काही लोकांना दह्याचा त्रास होतो. दही खाल्ल्यावर सर्दी, खोकला ह्या सारख्या समस्या होतात. तर त्या लोकांसाठी दह्यातील आंबट पणा कमी करण्याची एक सोपी रेसिपी दिलेली आहे.

 

curd rice featured inmarathi
worldhab.com

 

भातात, १ वाटी दही व चवीनुसार मीठ मिसळून घा. त्या नंतर थोडे तेल तापवून फोडणी करतो त्याच प्रमाणे मोहरी, जिरं, कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करा व दही मीठ मिसळलेला भात त्या फोडणीत मिक्स करून, २-३ मिनिटे परतून घ्या.

ह्याला “कर्ड राईस” म्हणतात. दक्षिणेतील लोक, नुसता दही भात खाण्या ऐवजी ह्या प्रकारे फोडणी दिलेला कर्ड राईस पसंत करतात. असा हा स्वस्त आणि मस्त दही भात आपल्या अरोग्या साठी अत्यंत गुणकारी असतो, आपल्या आवाक्यात असतो व सोयीस्कर सुद्धा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?