' श्रीराम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम परस्पर सौहार्दाचा घंटा नाद… – InMarathi

श्रीराम मंदिर आणि हिंदू-मुस्लिम परस्पर सौहार्दाचा घंटा नाद…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राममंदिर हा गेली अनेक वर्षं चर्चेचा आणि राजकारणाचा विषय होता. भारताचे माननीय पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राममंदिराचे भूमिपूजन पार पडले.

 

modi-rammandir inmarathi
indianexpress.com

 

मात्र भूमिपूजन पार पडल्यानंतर सुद्धा या विषयावरील चर्चा थांबली नाहीच! विविध मिम्स, बड्या मंडळींना लक्ष्य करून टीका करणं, तापलेलं राजकारण या गोष्टी आताही पाहायला मिळत आहेत.

‘राममंदिराची निर्मिती होणार असल्याने, फक्त हिंदूधर्मीय खुश आहेत का?’ हा प्रश्न चर्चेत आहे. राममंदिराच्या निर्मितीमुळे मुस्लिम धर्मीय नाराजच आहेत, अशी आवई उठवण्यात येत आहे.

खरंतर यात काहीही तथ्य नाही. अनेक मुस्लिम धर्मीय आनंदाने व उत्साहाने राममंदिर निर्मितीचे स्वागत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही यासंदर्भात ट्विट करून आपली भावना व्यक्त केली.

 

kaif-tweet inmarathi

 

‘मी अलाहाबादमध्ये वाढलो. त्यामुळे बालपणी रामलीला पाहिल्याचे मला आठवते. प्रभू राम म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहणारा देव आहे. त्यांची शिकवण असलेलं ऐक्य आपण जपायला हवं. तिरस्काराचा पुरस्कार करणाऱ्यांना दूर ठेवले पाहिजे.’

असं त्यांनी यात म्हटलं आहे.

सर्वधर्मसमभाव असणाऱ्या भारतामध्ये, हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. नव्याने उभारण्यात येत असलेलं राममंदिर सुद्धा हिंदू-मुस्लिम ऐक्याचं नवं प्रतीक ठरणार, यात शंका नाही.

याचंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे, या मंदिराच्या जडनघडणीमध्ये सर्व धर्मीयांचा समावेश आहे.

राममंदिराकरिता २१०० किलो वजनाच्या एका घंटेची निर्मिती करण्यात आली आहे. या घंटेचे डिझाईन एका मुस्लिम कारागिराने बनवले आहे.

इकबाल मिस्त्री हे घंटांचे डिझाईन तयार करण्यात तज्ज्ञ आहेत. म्हणूनच त्यांना या घंटेचे डिझाईन बनवण्याचा मान मिळाला आहे.

 

dau-and-iqbal inmarathi
newslivenation.in

 

या घंटेचा नाद तब्बल १५ कि.मी. परिसरात घुमणार आहे.

दाऊ दयाळ आणि इकबाल मेस्त्री, हे या घंटेच्या निर्मितीमधील प्रमुख शिल्पकार आहेत. ही घंटा बनवण्याचे काम जवळपास एक महिना सुरु होतं.

पितळ, सोनं, चांदी, तांबं, शिसं, जस्त, कथील, लोह, पारा अशा अष्टधातूंचा वापर करून, या घंटेची निर्मिती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील जलसेर नगर येथे हे काम सुरु होतं.

रोज आठ तास काम करून, महिन्याभरात भल्या मोठ्या घंटेची निर्मिती केली गेली. हिंदू आणि मुस्लिम धर्मातील एकूण २५ कारागीर हे काम करत होते.

 

ghanta-work inmarathi
khabar.ndtv.com

 

या घंटेबद्दल माहिती देताना ते म्हणतात;

“ही घंटा अखंडपणे निर्माण केलेली आहे. विविध भाग एकत्र करून बनवण्यात आलेली नाही. त्यामुळेच हे काम अधिक कठीण होते.”

ही घंटा बनवण्याची संधी मिळाली याचा इकबाल मिस्त्री यांना खूप आनंद झाला आहे. “ही संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो” असं ते आवर्जून म्हणतात.

दयाळ यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या;

“हे काम महिनाभर सुरु होते. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे सुद्धा संपूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. सलग महिनाभर एकही चूक न करता हे काम पूर्ण केलं गेलं.

गरम धातू साच्यात ओतण्यासाठी ५ सेकंदांचा जरी उशीर झाला, तरीही काम पूर्णपणे बिघडते. त्यामुळे अशाप्रकारचे काम योग्यप्रकारे पूर्ण होण्याची शाश्वती नसते, पण हे काम उत्तमरीत्या पूर्ण झालं याचा आनंद आहे.”

 

ghanta-making inmarathi
newsindiabuzz.com

 

मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर, ही घंटा बनवण्याचं काम सुरु झालं होतं. एटा जिल्ह्यातील, विकास मित्तल यांच्याकडे हे काम देण्यात आलं होतं.

ही भारतातील सर्वांत मोठी घंटा आहे. निर्मोही आखाडा यांच्याकडून मिळालेलं हे काम मित्तल यांनी आनंदाने स्वीकारलं. ‘ही घंटा राममंदिराला दान करण्यात येणार आहे’ असं मित्तल यांनी सांगितलं.

राममंदिराच्या भूमिपूजनानंतर सुद्धा बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरु आहेत. असं असताना, ही घंटा हिंदू-मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

दोन्ही धर्मातील कारागिरांनी एकत्र येऊन बनवलेली ही घंटा मोठ्या दिमाखात मंदिरात विराजमान होईल. राममंदिराचा विषय म्हटलं, की आपसूकपणे या घंटेची चर्चा सुद्धा होईल.

इकबाल मिस्त्री यांनी बनवलेलं डिझाईन आणि हिंदू-मुस्लिम कारागिरांची चर्चा सुद्धा नक्कीच होईल.

पुढील अनेक वर्षं, हिंदू-मुस्लिम ऐक्याचा घंटानाद राममंदिरात मोठ्या उत्साहाने होत राहील…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?