'समुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर

समुद्रघोडा : एक अद्भूतातील अद्भुत जलचर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

समुद्रघोड्याबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकले असेल, त्यांच्या बद्दल जाणून घेताना जे कुतुहूल चालवलर जाते ते कायमचेच, कारण त्यांच्याशी निगडीत प्रत्येक नवीन गोष्ट आपल्या मनात अजून प्रश्न निर्माण करते. आज याच जलचराबद्दल जी काही माहिती जगभरात उपलब्ध आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

समुद्रघोडा हे नाव ऐकल्यावर लक्षात येत की याचं समुद्राशी काहीतरी नातं असावं आणि हो ते खरंही आहे. जगभरात सीहॉर्स म्हणून प्रसिद्ध असलेला हा एक विचित्र दिसणारा जलचर होय.

इंग्रजी ‘एस’ या अक्षराप्रमाणे त्याचा आकार असतो. तो मासा या प्रकारातच मोडतो, पण माशासारखा दिसत नाही. शास्त्रीयदृष्टय़ा हा जलचर हिप्पोकॅम्पस या गटातला आहे.

समुद्रघोडय़ाच्या पन्नास प्रजाती आहेत. समुद्रघोडा हा खरं तर बॉनी प्रकारातला मासा आहे. पण माशाप्रमाणे त्यांच्या अंगावर खवले नसतात. त्याऐवजी त्यांच्या संपूर्ण शरीरावर असलेल्या कडय़ांमध्ये व्यवस्थित असलेल्या हाडांच्या पट्टय़ांतून त्यांची पातळ त्वचा ताणलेली असते.

 

seahors InMarathi

स्रोत

प्रत्येक प्रजातीच्या समुद्रघोडय़ांच्या अंगावरची कडी वेगवेगळ्या संख्येची असते. समुद्रघोडे वरच्या बाजूने म्हणजे उभे पोहतात. बाकीचे मासे आडवे पोहतात. प्रत्येक समुद्रघोडय़ाच्या डोक्यावर तुरा असतो. मात्र तो प्रत्येकाचा वेगळा असतो.

जसे हाताच्या बोटांचे ठसे प्रत्येक माणसाचे वेगवेगळे असतात, तसाच प्रकार याबाबतीत असतो. समुद्रघोडय़ांना माशांप्रमाणे वेगाने आणि चांगल्या त-हेने पोहता येत नाही. कदाचित म्हणूनच ते आपल्या घरात आराम करतानाच जास्त दिसतात. त्यांचे तोंड लांब असते.

अन्न चोखण्यासाठी त्यांना उपयोग होत असावा. सरडय़ाप्रमाणे त्यांचे डोळे वेगवेगळ्या दिशांना एकाच वेळी पाहू शकतात. शिंपले, लहान मासे, कवचधारी जलचर आणि प्लँकटन हे या जलचरांचे मुख्य अन्न आहे.

 

seahors 1 InMarathi

 

समुद्रघोडय़ांची उत्क्रांती पाइप माशापासून झाली असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तीन कोटी वर्षापूर्वी हा प्राणी अस्तित्वात होता, असे मिळालेल्या जीवाश्मांवरून दिसून येते.

समुद्रघोडा पाइप माशापासून उत्क्रांत झाल्याने त्याच्या सरळ शरीराशी समुद्रघोडय़ाच्या शरीराची तुलना शास्त्रज्ञांनी केली. त्यात त्यांना आढळून आलं की, आपल्या उभ्या आकारामुळे लांबचे भक्ष्यदेखील त्याला पकडणं शक्य होतं. शिकार करण्याच्या आणि अन्न खाण्याच्या दृष्टीने समुद्रघोडय़ांचा नाजूक वक्राकार उत्क्रांत झाला आहे.

समुद्रघोडे आणि पाइप मासा हे दोघेही लहान सागरी जीवांवर जगतात. त्यांच्यावर हल्ला करून त्यांना आपल्या लांबुडक्या तोंडात शोषून घेतात. पण पाइप मासा आपल्या भक्ष्याकडे स्वत: पोहत जातो, तसं समुद्रघोडे करत नाहीत. ते आपले भक्ष्य आपल्याजवळून कधी जाईल, याची वाट पाहत बसतात.

 

seahorse-marathipizza01

स्रोत

समुद्रीघोडे उष्ण आणि समशीतोष्ण उथळ पाण्यात ते आढळतात. समुद्रातील गवताच्या आडोशाला, प्रवाळांच्या जगतात किंवा दलदलीच्या ठिकाणी ते राहतात.

युरोपातील थेम्स एस्टय़ुअरी, उत्तर अमेरिकेपासून खाली दक्षिण अमेरिकेच्या समुद्रांत समुद्रघोडय़ांच्या वसाहती आहेत. त्यांचे आकारही अडीच सेंटीमीटरपासून एक फुटापर्यंत असे विविध असतात. त्याहीपेक्षा मोठे समुद्रघोडे उरुग्वेच्या भोवती असलेल्या नोवा स्कोटीया या समुद्रात आढळतात.

भूमध्य समुद्रात समुद्रघोडय़ाच्या तीन प्रजाती आढळतात. गवताच्या आडोशाला राहत असताना ते आपला रंग गवताच्या रंगाप्रमाणे बदलतात. समुद्रघोडे आपापले राहण्याचे क्षेत्र निश्चित करतात.

 

seahors 2 InMarathi

 

नर समुद्रघोडे साधारण एक चौरस मीटरच्या क्षेत्रात वावरत असतात तर माद्या त्यापेक्षा शंभर पटीने अधिक क्षेत्रात वावरत असतात. समुद्रघोडे आपला रंग बदलू शकतात. काही असामान्य परिस्थितीत त्यांचे रंग भडक होतात.

अशी आहे ही रंजक आणि अद्भुत समुद्री घोड्यांची दुनिया!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?