' जपानचा हा सैनिक तब्बल ३० वर्षं लढत होता दुसरे महायुद्ध!

जपानचा हा सैनिक तब्बल ३० वर्षं लढत होता दुसरे महायुद्ध!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण अनेक कथा ऐकल्या असतील. युद्धबंदी म्हणून एक – एक, दोन – दोन दशकं शत्रू राष्ट्रात राहून मग सुटका झाल्याची.

सावरकरांना तर दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. एका जन्मात दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झालेले बहुदा सावरकर एकमेव स्वातंत्र्य सैनिक असावे.

राष्ट्र बलिदान मागते,आणि ते देण्यासाठी प्रत्येक राष्ट्रात असंख्य असे योध्ये असतातच. तर, आज आपण पाहणार आहोत जपानच्याचं अशा योध्या बाबत, जो दुसरं महायुद्ध संपल्यानंतर सुद्धा जवळपास तीस वर्षे एकटा युद्ध लढत होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांचं नाव आहे हिरू ओनोडा. (Hiroo Onoda) जपानच्या सर्वसामान्य घरातला हिरू जपान मधल्याच एका ट्रेडिंग कंपनीत कामाला होते.

 

hiroo onada inmarathi
historythings.com

 

तिथे जर्मनी मध्ये हिटलरच्या नाझी पक्षाने सत्ता हस्तगत केली. हळूहळू त्याने युरोप पादाक्रांत करण्यास सुरवात केली आणि दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली.

कालांतराने १९४० साली जपानने त्रिराष्ट्रीय करारावर सही करून अक्ष राष्ट्रांसोबत हात मिळवून दुसऱ्या महायुद्धात उडी मारली.

महायुद्धात उतरायच्या आधीच जपानी सैनिक चीन मध्ये उतरले होते. अधिकृतरित्या युद्धात उतरल्या नंतर जपान मध्ये सैन्य भरती सुरू झाली. आणि याच भरती दरम्यान हिरू जपानच्या इंपेरियल सैन्यामध्ये भरती झाले.

हिरू यांची एकूणच क्षमता बघता त्यांना नाकानो या जपानी इंपेरियल सेनेच्या इंटेलिजन्स संस्थेत ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले. तिथल्या ट्रेनिंग दरम्यान त्यांना गोरिला वॉर अर्थात गनिमी कावा बाबत बारकावे शिकवले गेले.

प्रतिकूल परिस्थिती मध्ये जीव कसा वाचवावा आणि शत्रूशी कसा लढा द्यावा याबाबत शिकवले गेले.

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिसेंबर १९४० मध्ये फिलिपीन्सच्या लुबांग बेटावर जाण्याचे आदेश मिळाले. वरिष्ठाकडून त्यांना सक्त आदेश होते की त्यांना ज्या मिशनवर पाठवत आहेत त्याला अनेक वर्ष लागू शकतात.

 

hiroo onada 2 inmarathi
outdoorrevival.com

 

त्या बेटावर केवळ नारळ खाऊन सुद्धा दिवस घालवावे लावतील. पण या परिस्थितीत सुद्धा त्यांना जिवंत राहून शत्रू बद्दलची एकूण एक माहिती जमा करून जपानला पाठवायची आहे.

युद्धविराम नंतर जपानी सैन्य त्यांना परत घेण्यासाठी इथे येईल. बेटावर उतरल्या नंतर काही अवधीतच हिरू यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. तिथल्या जपानी सैन्याला भेटून ते आपली माहिती त्यांना देऊ लागले.

काही दिवसांनी शत्रू राष्ट्रांच्या सैन्याने तिथल्या जपानी सैन्यावर जोरदार हल्ला करून तिथून त्यांना पळवून लावले.

या स्थिती मध्ये जपानी सैन्याने ४ – ४ च्या ग्रुप मध्ये राहून जंगलात राहण्याचा प्लॅन बनवला. त्यातही बहुतांश जपानी सैनिक पकडले गेले.

गनिमी काव्याच्या उपयोगाने हिरू त्या जंगलात जम बसवून गेले. रसद नसल्या कारणाने जंगलात मिळेल त्यावर दिवस काढून किंवा जवळच्या गावात दमदाटी करून ते अन्न मिळवू लागले. पण शत्रू सैन्याच्या हाती नाही सापडले.

१९४५ च्या डिसेंबर मध्ये जेव्हा हिरू त्यांच्या साथीदारांसोबत जवकच्या गावात अन्नासाठी फिरत असताना त्यांना कळलं की महायुद्ध संपलं आहे आणि जपानचा पराभव झाला आहे.

अमेरिकेने जपान वर दोन अणुबॉम्ब टाकून युद्धाची सांगता केली आहे.

 

japan nuclear attack inmarathi
en.wikipedia.org

 

ही बातमी कानावर पडल्यावर त्यांच्या समूहाने एकतरी बैठक बोलावली. त्यांचं यावर एकमत झाले की जपानी सैन्याला जंगलातुन बाहेर काढण्यासाठी ही योजना असू शकते.

शिवाय एवढा मोठा बॉम्ब अजून कोणी पाहिला पण नाही ज्याने शहरं उध्वस्त होतील. यावर एकमत झाल्यावर हिरू आणि त्यांचा साथीदारांनी त्यांचं काम चालू ठेवण्याचे ठरवले.

जपानी सैन्या सोबत रोजची चकमक आणि लूटमारीला वैतागलेल्या गाववाल्यांनी आपल्या सरकारला यावर तोडगा काढायला सांगितला.

तेव्हा विमानातून काही पत्रके फेकले गेले ज्यावर लिहिलं होतं की युद्ध संपलं आहे आणि जपानने आत्मसमर्पण केलं आहे. तर जपानी सैन्य आपल्या मायदेशी परत जावे.

या पत्रकावरची माहिती काय हिरू आणि त्यांच्या साथीदारांच्या गळ्याखाली उतरत नव्हती. ते अजून हेच मानत होते की युद्ध चालू आहे आणि जपान नक्की जिंकेल आणि त्यांना त्यांचं सैन्य घ्यायला येईल.

हेच अनेक वर्षे चालू राहिले. गावाबाहेर गोळीबार कमी झाला. सामान्य लोकांची वर्दळ वाढू लागली. सैन्य जवान यांची संख्या कमी होऊ लागली.

पण जंगलात लपलेल्या जपानी सैनिकांकडून जेव्हा गोळीबार होत असे तेव्हा अल्पवधितच तिथे फिलिपीन्सचे जवान येई. त्यामुळे जपानी सैन्याला वाटू लागले की इथे सैन्य जवानचं सामान्य वेशात फिरत आहेत.

आणि युद्ध संपले अन जपान पराभूत झाला ही शत्रूची चाल आहे.

हिरू यांच्या चार जणांच्या ग्रुप मधल्या एकाने समर्पण व्हायची आपली इच्छा बोलून दाखवली आणि तो शरण गेला. तस बाकी तिघांनी शत्रूंना आपला सुगावा लागेल समजून आपले राहण्याचे ठिकाण आणि आपला प्लॅन बदलला.

 

hiroo onada 3 inmarathi
9gag.com

 

कालांतराने तिघांपैकी दोन जवानांना मारण्यात स्थानिकांना यश आलं. जेव्हा त्यांचे देह जपानला पाठवण्यात आले तेव्हा जपानी सेना हैराण झाली. हे युद्धबंदी किंवा मृत झाले असावे अस मानून त्यांनी विषय सोडून दिला.

पण जपान मध्ये हे देह आल्यावर त्यांना कळून चुकले की जपानी सैन्य अजून फिलिपीन्स मध्ये आहे.

आणि हिरू ओनोडा एकमेव असे जवान आहेत ज्यांचा काही सुगावा लावलेला नाही. आलेले देह पाहून जपानी सैन्याने ते जिवंत असल्याचे मानून फिलिपीन्स मध्ये एक सर्च पार्टी पाठवली.

परंतु एकटे राहिलेले हिरू लपून राहण्यात आता तरबेज झाले होते. या सर्च पार्टीला काय ते सापडले नाहीत. १९७४ मध्ये नारिओ सुझुकी या जपानी युवकाने वर्ल्ड टूरचा प्लॅन बनवला.

त्याने काही गोष्टी शोधायचा या हिशोबाने आपली टूर सेट केली होती. त्याला तीन गोष्टी शोधायच्या होत्या. ओनोडा, पांढरा अस्वल आणि हिम मानव!

तीन दशक जिथे शत्रू राष्ट्र, फिलिपीन्सची सेना, खुद्द जपानी सेनेला हिरू ओनोडा सापडले नाही तिथे नारीओ सुझुकी या तरुणाने त्यांना शोधून काढल.

सुझुकीने सुद्धा सगळी हकीकत त्यांना सांगितली पण तरी हिरू यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. सदर सगळी माहिती जपानला परत गेल्यावर सुझुकीने जपानी सैन्यदलाला दिली.

 

nario suzuki inmarathi
minagahet.blogspot.com

 

जपानचे दुसऱ्या महायुद्धात नेतृत्व करणारे कमांडर याशीमाटा जे निवृत्त होऊन सामान्य जीवन जगत होते त्यांना हिरू यांच्या बाबत समजले. ते तडक सुझुकीने सांगितलेल्या ठिकाणी फिलिपीन्स मध्ये उतरले.

ओनोडा यांना सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट करून सांगितले. युद्ध संपलेले असून त्यांनी आता जपानला परतावे अशी त्यांनी विनंती केली.

कमांडर याशीमाटा यांचं ऐकून हिरू यांना जबरदस्त धक्का बसला. विनाकारण त्यांचे ३० वर्ष या जंगलात वाया गेले शिवाय त्यांनी नाहक अनेक सामान्य नागरिकांचे प्राण घेतले.

तरी ते हे सहन करू नाही शकले की लाखो जपानी नागरिकांना आपले प्राण गमावल्यानंतर जपानने शरणागती पत्करली.

लवकरच ओनोडा यांना वर्तमानात काय चालले आहे याची माहिती मिळाली आणि त्यांनी तत्कालीन फिलिपीन्सचे राष्ट्रपतीना आपली तलवार सोपवून शरणागती पत्करली.

युद्ध चालू आहे या गैरसमजातुन आजपर्यंत युद्ध करणाऱ्या हिरू ओनोडा यांना त्यांच्या सगळ्या आरोपातून मुक्त करण्यात आले. जपान मध्ये परतल्यावर जपानने त्यांना एका हिरोसारख स्वीकारलं.

त्यांना त्यांच्या साहस, देशप्रेम आणि त्यागाच्या ३० वर्षाच्या सर्व्हिस बद्दल पूर्ण वेतन सुद्धा देण्यात आलं.

जेव्हा त्यांनी देश सोडलेला आणि ते परत आपल्या देशात आले तेव्हा भरपूर बदल झाला होता. ते ज्या आपल्या संस्कृतीला मानत होते ते त्या संस्कृती मध्ये कुठे तरी हरवून गेली होती.

त्यासाठी त्यांनी आपलं उर्वरित जीवन घालवण्यासाठी ब्राझीलच्या एका लहान गावात निघून आले. तिथेच लग्न करून ते स्थायिक सुद्धा झाले.

 

hiroo onoda inmarathi
famouspeople.com

 

१९९६ मध्ये हिरो ओनोडा फिलिपीन्सच्या त्याच बेटावर परतले जिथे त्यांनी आपली ३० वर्ष घालवली. ज्या गावात त्यांनी लूटमार केली त्याच गावाला त्यांनी १०००० डॉलरचं दान केले.

कालांतराने त्यांनी आपली डॉक्युमेंटरी पण बनवली.“No Surrender, My Thirty Year War”. शेवटी १७ जानेवारी २०१४ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी हिरू ओनोडा यांनी शेवटचा श्वास घेतला.

हिरू ओनोडा म्हणतात,

Never Complain. When I did, my mother said that if I didn’t like my life, I could just give up and die.

She reminded me that when I was Inside her, I told her that I wanted to be born, so she delivered me, breastfed me and changed my diapers. She said that I had to be brave.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?